*"माझ्याकडे वेळ नाही....."?*
_हे खरंच सत्य आहे का? की एक फक्त बहाना आहे? एवढे वाचून तुम्हीच सांगा_ 🤔💬
बारा तासाचा प्रवास चार तासांवर आला, तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*
बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं, तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*
चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदांत मिळतो, तरी माणूस म्हणतो–
*वेळ नाही*
कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची,
आज तो सेकंदात दिसतो –
तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*
घरात वरखाली जायला लागणारा वेळ आणि श्रम, आता लिफ्टने सेकंदात संपतोय,
तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*
बँकेच्या रांगेत तासनतास थांबणारा माणूस, आता मोबाईलवर काही सेकंदांत व्यवहार करतो,
तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*
एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या, आता काही तासांत होतात, तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*
अॅक्टिवा चालवताना एका हातात हँडल, दुसऱ्या हातात मोबाईल, कारण थांबून बोलायला
*वेळ नाही*
ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी तयार करतो, कारण
*वेळ नाही*
पुस्तक वाचायला
*वेळ नाही*
आई-वडिलांना फोन करायला
*वेळ नाही*
निसर्गात रमायला
*वेळ नाही*
पण –
आयपीएलसाठी *वेळ आहे*
नेटफ्लिक्ससाठी *वेळ आहे*
सटरफटर रील्ससाठी *वेळ आहे*
राजकारणावर चर्चा करायला *वेळ आहे*
एकमेकांच्या चाड्या लावायला *वेळ आहे*
सोशल मीडियावर निगेटिव्ह कमेंट्स व शिव्या द्यायला *वेळ आहे*
जगात चांगले काय आहे ते शोधायला *वेळ नाही*
कौतुकाचे दोन शब्द टाईप करायला *वेळ नाही*
स्वतःसाठी पण *वेळ नाही*
परिवारासाठी पण *वेळ नाही*
जग सोपं झालं, गती वाढली,
तंत्रज्ञान जवळ आलं, अंतरं संपली, सोयी वाढल्या, संधी वाढल्या…
पण माणूस *वेळ नाही* म्हणत स्वतःपासून दूर गेला.
शांत बसून स्वतःशी बोलायला,
स्वतःला समजून घ्यायला,
किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला…
*वेळ नाही*
आणि मग एक दिवस वेळच निघून जातो.
शेवटच्या क्षणी कळतं –
*वेळ होता…....रे*
पण आपणच *वेळ नाही* असं म्हणत जगत होतो.
म्हणून आजच ठरवा –
स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा, नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा, मन:शांतीसाठी थोडा वेळ देऊन बघा, जे चांगले वाटते त्याचे भरभरून मोकळेपणाने कौतुक करायला वेळ काढून बघा...
.
.
आणि मग सांगा...
.
.
कारण *वेळ नाही* हे सत्य नाही...
*ती फक्त एक सवय झाली आहे…आणि ती बदलायलाच हवी.*
☝️☝️🤔💭🤔💭🤔👍👍
आपलाच मित्र
श्री. सुभाष बडे सर
Founder: ShabasGuruji.com