*संजय नागे दर्यापूर*
*9767397707*
*दि. 7 जून 2025*
*2025 चे संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*
*➡️अद्याप संवर्ग एक व संवर्ग दोन ला होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही लवकरच ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल*
*➡️ जिल्हानिहाय रिक्त पदे पोर्टलवरअपलोड करण्याचे काम पूर्ण झालेली असून पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील*
*➡️ रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या बरोबर लवकरच संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी सुद्धा देण्यात येईल*
*➡️ संवर्ग एक व संवर्ग दोन ला फॉर्म भरण्याच्या सुविधेबाबत पोर्टलवर अद्याप वेळापत्रक प्रकाशित झालेलं नाही ते सुद्धा लवकर प्रकाशित होईल*
*➡️त्याकरिता संवर्ग एक व संवर्ग दोन मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी प्रक्रियेबद्दल अद्यावत राहावं*
*✳️संवर्ग एक व संवर्ग दोन चे सर्वसामान्य मुद्दे*
*➡️ संवर्ग एक च्या ज्या शिक्षकांना होकार द्यायचा आहे त्यांना फक्त जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर दाखवल्या जातील*
*➡️ पती-पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील*
*➡️ विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन च्या याद्या जाहीर करण्याकरिता व यादीवरील आक्षेप प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अर्ज भरून घेतल्या जात आहेत*
*➡️ या ठिकाणी फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन चे अर्ज भरून घेतल्या जात आहेत या ठिकाणी पसंती क्रम देण्याची सुविधा नाही*
*➡️ संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकाराची सुविधा मिळेल व संवर्ग दोनच्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल*
*➡️ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर होणार नाही*
*➡️ज्या संवर्ग एक च्या शिक्षकांची नावे बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही यादीमध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही*
*➡️ परंतु ज्या शिक्षकांना संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करायची असेल त्यांनी होकार पोर्टलवर नोंदवावा*
*✳️मोबाईल वरून ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व संवर्ग भाग 2 चे शिक्षक खालील प्रमाणे फार्म भरू शकता*
*➡️ यापूर्वी आपण आपले प्रोफाइल पोर्टलवर अपडेट केलेले आहे आता संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*
https://ott.mahardd.com/
*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*
*➡️ आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*
*➡️ लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल*
*➡️ मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील . त्यापैकी आपण "जिल्हाअतंर्गत" या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील "अर्ज" हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*
*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपणास*
*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा*
*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा*
*असे दोन टॅब दिसतील*
*➡️ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी "संवर्ग भाग 1 अर्ज करा" त्यावर क्लिक करा*
*➡️अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा*
*➡️त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल*
*➡️ त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा*
*➡️ क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील*
*➡️जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे*
*(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)*
*➡️ त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)*
*➡️(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)*
*➡️आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा*
*➡️ Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल*
*➡️ अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म मोबाईल वरून भरू शकतात*
*✳️आता संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरत असताना*
*➡️ "संवर्ग भाग 2 अर्ज करा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर disclaimer दिसून येईल त्या disclaimer बाजूच्या बॉक्सला टिक करा*
*➡️त्याखाली आपणास आपले नाव आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल*
*➡️त्याखाली आपणास तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या अंतर किलोमीटर मध्ये नोंदवा अर्थातच ते 30 किलोमीटरच्या वर असेल*
*➡️व त्याखालील रकान्यात "विशेष संवर्ग भाग 2 चा प्राधान्यक्रम निवडा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर drop down मधून आपला विशेष संवर्ग भाग 2 मधील आपल्याला लागू पडणारा प्राधान्य क्रमांक 1 ते 7 मधून निवडा*
*✳️ वरील प्राधान्यक्रम 1 ते 7 मधील प्राधान्य क्रमांक 1 निवडल्यास*
*➡️आपण जर दोघेही जिल्हा परिषदचे कर्मचारी असाल तर आपल्याला पर्याय क्रमांक एक निवडावा लागेल आपण पर्याय क्रमांक एक निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला ( 1) primary, 2) other than primary ) हे दोन पर्याय दिसून येतील*
*➡️ आपण जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला त्यापैकी पहिला( 1) primary, पर्याय निवडावा लागेल*
*➡️ त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडला असेल तर अशा शिक्षकांना जोडीदाराचा खालील रखान्यांमध्ये शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल*
*➡️ जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती खालील रखान्यांमध्ये दिसून येईल*
*➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता*
*✳️ पर्याय क्रमांक 2 निवडल्यास (2) other than primary )*
*➡️ आपला जोडीदार जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर*
*आपल्याला पर्याय क्रमांक दोन (2) other than primary ) निवडावा लागेल*
*➡️ पर्याय क्रमांक दोन निवडल्यानंतर आपल्याला खालील रकान्यामध्ये आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी टाकावा लागेल जोडीदाराचे नाव व जिल्हा परिषद कार्यालयाचे नाव टाकावे लागेल*
*➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण सवर्ग 1 व संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता*
*✳️ पर्याय क्रमांक 2 ते 7 निवडल्यास*
*➡️ पती-पत्नी एकत्रीकरण घेणाऱ्या शिक्षकाचा जोडीदार जिल्हा परिषदेचा कर्मचारी नसून इतर विभागाचा कर्मचारी असेल तर*
*➡️आपल्याला दोघांमधील अंतर टाकायचे आहे व आपल्या जोडीदाराची मागितलेली माहिती सबमिट करायची आहे*
*➡️ पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा*
*➡️ submit केल्यानंतर आपल्याला आपण आपल्याला आपण दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला दोन ओटीपी प्रविष्ट करावे लागतील व आपला जोडीदार इतर संवर्गात असेल तर या ठिकाणी फक्त एकच ओटीपी प्रविष्ट करावा लागेल*
*➡️ आपण भरलेला फॉर्म आपण पोर्टलवरूनच डाउनलोड करू शकता*
*➡️परंतु आपण भरलेली माहिती आपणास चुकीची वाटत आहे तर अशा परिस्थितीत आपण आपला फॉर्म withdrawal सुद्धा करू शकता*
*काही अडचण आल्यास call करा*

