शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४
बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४
इयत्ता चौथी- घटक : ६ मायेची पाखर
प्र 1 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तरः
२) सर्वजन भाऊराव पाटलांना काय म्हणत ?
उत्तरः
३) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत होते ?
उत्तरः
४) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?
उत्तर :
५) अण्णांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे नाव काय ?
उत्तर :
६) वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?
उत्तर :
७) लेखकाला झोप का येत नव्हती ?
उत्तर :
८) लेखकाने अण्णांच्या म्हणण्यावरुन जेवनात काय खाल्ले ?
उत्तर :
९) नकळतचं लेखकांच्या तोंडातून कोणते शब्द बाहेर पडले ?
उत्तर :
प्र २ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१).......... ........... संस्थेच्या आवारात एक मोठे झाड होते.
२) स्वतःची.............त्याच्या अंगावर घातली.
३) अण्णानीं ...........शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या.
४) अण्णा, आपण खरे खुरे या मुलांचे..............आहात.
५) सर्वजन भाऊरावांना.............म्हणत असत.
६) आपणास..........आयुष्य मिळो.
७) शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण................म्हणून ओळखता.
प्र 3वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) टाळाटाळ करणे :
२) पोटात कावळे ओरडणे :
३) झटत राहणे :
४) पोटाशी धरणे :
५) डोळा लागणे :
प्र 4अ) कोण कोणास म्हटले.
अ) " अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात"
ब) नुकतचं जेवण झालय माझं
क) स्वयंपाक घरात काही शिल्लक असले तर घेऊन ये
ड) "आपणास उदंड आयुष्य मिळो !"
प्र 5. थोडक्यात उत्तरे लिहा.
१) अण्णांना सर्वजण कर्मवीर म्हणून का ओळखतात ?
२) लेखकाला झोप का लागत नव्हती ?
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४
विरुद्ध अर्थाचे शब्द (संकलन पी पी पेंधे )
विद्यार्थ्यांनो काही विरूद्धलिंगी शब्द पाठ असणे गरजेचे आहे त्यांचे वारंवार वाचन करून। लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी खालील शब्द अभ्यासा
विरुद्धलिंगी शब्द
माळी माळीण भगवान-भगवती
सुतार सुतारीन पाटील पाटलीण
तेली तेलीण बोका-भाटी
कोल्हा कोल्हीण बालक बालिका
धोबी धोबीण अध्यक्ष अध्यक्षा
नाग नागीण कुत्रा कुत्री
कोळी कोळीण वानर वानरी
लोहार लोहारीण नवरा बायको
डोंबारी डोंबारीण बोकड-शेळी
हत्ती हत्तीण उंट-सांडणी
सिंह सिंहणी सम्राट-सम्राज्ञी
मुलगा मुलगी शुक सारिका
खडा खडी कवी-कवयित्री
पिता माता दास-दासी
लोटा लोटी गाय बैल
देव देवी सासरा सासू
कुत्रा कुत्री एडका मेंढी
हंस हंसी पेटारा पेटी
घोडा घोडी आत्मज आत्मजा ।
दास दासी मावळा मावळण
दांडा दांडी नायक-नायिका
दीर जाऊ। पंडित-पंडिता
बेडूक बेडकी धोबी-धोबीण
राघू मैना विद्वान-विदुषी
एडका मेंढी राजा-राणी
व्याही विहीण देव-देवी
जनक जननी श्रीमान-श्रीमती
बोकड शेळी विदुष-विदुषी
वानर वानरी वाघ्या-मुरळी
कोंबडा कोंबडी । मोर लांडोर
गायक गायिका वर वधू
संचालक संचालिका पुत्र-कन्या
नर्तक नर्तिका खोड-कालवड
विधूर-विधवा
कोळी-कोळीण
पाटील पाटलीण।
कोकिळ कोकिळा
गवळी गवळण
सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४
Unit 2 Row your boat/ Garden of Words
Read the rhyming words. (अ.नि.क्र.४०५)
Bag -tag
frog-dog
boy-toy
fast-last
arm-farm
mark-bark
hero-zero
role-pole
gun-sun
rub-cub
no-SO
cat-bat
pan-fan
map-lap
cap-gap
card-hard
mask-task
jar-far
mud-bud
but-nut
📓📙📘📕📓📙📘📕📓📙📘📕📓📙
Find Match the rhyming words.
mud mad bud had
Card hard sun good
but nut sun boot
mask dust task brush
sun gun Copy carrot
jar bag far job
rub rular tab cub
zero hero more four
no do so to
role pole pool goal
The hare and the tortoise
Copy the given words in four lines. (अ.नि.क्र.४११)
carrot
ran
stop
eat
slow
see
few
slept
full
race
Write English words for Marathi words. खालील मराठी शब्दांसाठी इंग्रजी शब्द लिहा.
गाजर =
कासव =
ससा =
शर्यत =
थोडे =
हाळू =..
रविवार, २५ ऑगस्ट, २०२४
इयत्ता तिसरी- चला करूया वजाबाकी
१) मकरंद यांनी त्यांच्या बागेत ६८ रोपे लावली. त्यातील ५६ रोपे आंब्याची तर उर्वरित रोपे चिंचेची आहेत, तर त्यांनी चिंचेची किती रोपे लावली ?
३) इयत्ता तिसरीच्या वर्गातील एकूण ४५ विद्यार्थ्यां - पैकी आज केवळ ३४ विद्यार्थी उपस्थित आहेत, तर किती विद्यार्थी अनुपस्थित आहेत ?
२) अभयकडे २५ रुपये होते. त्याच्या मामांनी त्याला आणखी काही रुपये दिले, आता त्याच्याजवळ ५७ रुपये झाले, तर मामांनी त्याला किती रुपये दिले असतील ?
४) नरेशजवळ ५७ मेंढ्या आहेत. सुरेशजवळ ७८ मेंढ्या आहेत, तर नरेशजवळ सुरेशपेक्षा कित मेंढ्या कमी आहेत ?
५)आलिशाने तिच्याजवळील ५५ रुपयांतून ३० रुपयांचा मास्क खरेदी केला, तर आता तिच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहिली?
शैक्षणिक post
निर्मिती व संकलन
*(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*
(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)
👇👇👇👇👇link👇👇👇👇👇
उपक्रमशील शिक्षक रवी ढगे- आंतरराष्ट्रीय भाषा ज्ञान
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची प्रसिद्ध दैनिक लोकमत संपादक भारत दाढेल यांच्या माध्यमातून आजच्या संडे स्टोरी मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संडे स्टोरी-भारत दाढेल, नांदेड
शाळेतील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी मुलांना दर शनिवारी 'गोष्टीचा शनिवार' या उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेली थोरामोठ्यांची पुस्तके वाचण्यास दिली जातात. मुलांना वर्गखोलीत बसून वाचन करण्याचा कंटाळा येतो, तेव्हा वर्गाबाहेर मोकळ्या वातावरणात शाळेच्या परिसरातील एखाद्या झाडाखाली बसून वाचन घेतले जाते. चौथी ते सातवीतील सर्व विद्यार्थी या पुस्तक वाचन चळवळीत सहभागी झाले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वृक्ष वाचनालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. दर शनिवारी परिसरातील झाडांना दोरी बांधून त्यावर पुस्तकांची योग्य मांडणी केली जाते. मुलांना आवडणारी पुस्तके त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात. हा उपक्रम चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांना या वयात वाचनाची आवड निर्माण झाली की त्यांचे भावविश्व अधिक समृद्ध होते. त्यामुळे हा उपक्रम चर्चेत आला आहे.
मुलांना जापनीज भाषा शिकवली
• भविष्यवेधी शिक्षणाचा आधार घेऊन लर्निंग टू लर्न यानुसार विद्यार्थ्यांना जापनीज भाषा शिकण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे गावखेड्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषेची ओळख होऊन ते या भाषेद्वारे संवादही साधत आहेत.
• या उपक्रमाबद्दल त्यांचा २६ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विशेष सन्मानही करण्यात आला होता.
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...
















































