मंगळवार, २३ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे 


https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared
 केंद्र = पडवळपाडा 

 खेळाची लिंक 
टच करा 👇👇
तिसरा दिवस

*मार्गदर्शक सूचना*     *दिवस तिसरा. शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

       *क्रीडा दिन*


नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे, नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो. असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.


*उद्दिष्ट्ये:-* विद्यार्थ्यांच्या पायाभुत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-


१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्द्ल् जागरुकता वाढविणे,


२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.


३. तरुणांच्या मनात सांधिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे,


४ . राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे.


५ . खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे,


६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषतःभारताचे स्वदेशी खेळ)


७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनासाठी सकारात्मक वृत्ती विकसित करणे.


८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि गायनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.


९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.


१० . खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.

       शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने खालील 👇🏻 *मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.*


शालेयस्तरावर पहिल्या सत्रातील१ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यासाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे. 

          *इयत्ता१ली ते५ वी*  साठी सापशिडी, पत्ते, शार्यत, गोट्या, सांगरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोसिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अशा  प्रकारचे खेळ घ्यावेत*

 " *इय्ता६ वी ते १२ वी* साठी बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबडुी, विटी दांडू, भालाफेक, मलखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, तीन पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत. तसेच यासाठी केंद्र शा्सनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत देण्यात येत आहे.  स्वदेशीस खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी. शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास 'त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंना यथोचित सन्मान केला जावा. स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू , शाळा व्यवस्थापन समितीतील संदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. पालक आणि नागरी समाज सेवाभावी संस्था यांचे मदत घेण्यात यावी. सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याना देखील समावेश करण्यात यावा.

 अपेक्षित परिणाम विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल. विद्यार्थ्याच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल, वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.  विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती ,  निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.


                    *संकलन*

           *तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...