कृती १: खाली दिलेल्या कविता वाच म्हणण्याचा प्रयत्न कर. भाषेच्या विविधतेचा आनंद घे.
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला !
पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
२
चला मुलांनो सहल काढ्या आपण साऱ्या मित्रांची,
भाकरी घ्या रे बांधुनी सारे सहलीकरिता जेवणाची.
गाणी गाऊ मजेत जेवू फळे चाखुया रानाची,
मजेत खेळू, मातीत लोळू शर्यत लावू पळण्याची.
शिकू आनंदे मराठी : विद्यार्थी कृतिपुस्तिका