गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

मुख्यमंत्री माझी शाळा सुन्दर शाळा टप्पा क्र.३

परिपाठ

शिष्यवृत्ती सराव परीक्षा

PM_POSHAN_योजनेतंर्गत_स्वयंपाकी_तथा_मदतनीस

परस बाग स्पर्धेत भाग घेण्यासाठी.....

 

PAT 2 गुणनोंद तक्ते 2 री ते 8 वी

 

ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

https://drive.google.com/file/d/17v7filn0YEgIstxiuukup7vHZH0yKM3N/view?usp=drivesdk




संचमान्यता सन २०२५-२६ बाबत.

 क्रमांक : एसएसएन-२०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२



दिनांक : १४.१०.२०२५


प्रति,


१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


विषय :- संचमान्यता सन २०२५-२६ बाबत.


संदर्भ :-


१) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४


२) मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना उद्देशून केलेले निवेदन जा.क्र.२२७५/२०२५


३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा /२०२५/टि-८/व्हीआयपी/ई-२२८३१२०, दि.०३.१०.२०२५


उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाकीत मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी यु-डायस प्लस मध्ये शिक्षक/शिक्षकेतर संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थी पट ग्राह्य धरण्याच्या तारखेस मुदतवाढ मिळण्याबाबत मार्गदर्शनपर आदेश होण्याबाबत विनंती सदंर्भ क्र. ३ अन्वये प्राप्त झाली आहे.


२. त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येत आहे की, चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी संच मान्यता निर्धारणासाठी दि.३० सप्टेंबर रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी, २० ऑक्टोबर रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी. तथापि, सदर सवलत ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी लागू असेल.


141025 7000 (आबासाहेब कवळे)


उपसचिव, महाराष्ट्र शासन


प्रत माहितीस्तव :


मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. श्रीकृपा कॉलनी, जगन्नाथ बाबा नगर, दाताळा रोड, ता. जि. चंद्रपूर - ४४२ ४०१.


प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी :


आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५ शुद्धीपत्रकाबाबत.

 जा.क्र. मरापप/बापवि/२०२५/५२१७.



दिनांक: १५/१०/२०२५


प्रति,


१) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई - ४०००३२


२) मा. विभागीय प्रसिद्धी उपसंचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण


३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई ४०००३२


४) मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई - २०


५ ६) सर्व जिल्हा माहिती अधिकारी


) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/जळगांव/रत्नागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक


७) मा. वृत्तपत्र संपादक


विषयः समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५ शुद्धीपत्रकाबाबत.


महोदय,


महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भातील शुद्धीपत्रक यासोबत जोडलेले आहे.


सदर शुद्धीपत्रकास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.


आपला विश्वासू,


स्थळप्रतीवर मा. आयुक्त यांची स्वाक्षरी असे.


(कैलास दातखीळ)


उपायुक्त,


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४


प्रत माहितीसाठी सविनय सादरः-


१) मा. खाजगी सचिव, मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.


२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२,


३) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.


४) मा. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-३०,


५) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.


६) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.


प्रत माहिती व उचित कार्यवाहीसाठी: -


१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व


२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व.


३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प)



इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे सप्टेंबर २०२५














 प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद सर्व.

विषयः- इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे सप्टेंबर २०२५ (केंद्र/राज्य हिस्सा) लेखाशिर्ष २२०२-३८०६/२२०२-३८१५ ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) आदेश.


संदर्भ: शासन निर्णय क्र. शापोआ २०२४/प्र.क्र.१४४/एस.डी.३/१०९३४८०, दिनांक १२ जून, २०२५.


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विदयार्थ्यांना मध्यांन्ह भोजन देण्यात येते. योजनेअंतर्गत शाळास्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे माहे सप्टेंबर २०२५ करिता इंधन भाजीपाला देयकाची अदायगी करण्याकरीता शाळास्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे इंधन भाजीपाला अनुदान MDM PORTAL मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर संगणकीय प्रणालीद्वारे देयक जनरेट केले असून सदर जिल्ह्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यांना अनुदान देण्यात येत आहे. आदेश क्र.८ अन्वये एकुण अनुदान केंद्र हिस्सा रक्कम रु. २५,९५,५४,६७३/- व राज्य हिस्सा रक्कम रु. १७,१४,२९,८७४/- अशी एकूण रक्कम रु. ४३,०९,८४,५४७/- (अक्षरी रक्कम रुपये त्रेचाळीस कोटी नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस फक्त) आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये PFMS प्रणाली अंतर्गत राज्य स्तरावरील SNA मध्ये आपल्या जिल्हयांकरीता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


१. उक्त अनुदानातुन करण्यात येणारा खर्च लेखाशिर्ष २२०२-३८०६ (केंद्र हिस्सा) दत्तमत ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) मागणी क्रमांक ई-२ व लेखाशिर्ष २२०२-३८१५ (राज्य हिस्सा) दत्तमत ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) मागणी क्रमांक ई-२ खर्च टाकण्यात यावा.


२. ज्या कारणासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे, त्याच कारणासाठी ती खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी.


३. विवरण पत्रात नमूद केलेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मासिक खर्च अहवाल संचालनालयास सादर करावा. त्याशिवाय पुढील अनुदान वितरण करण्यात येणार नाही.


४. उक्त अनुदानातुन देयके अदा करतेवेळी शासनाच्या प्रचलीत नियमांचे पालन करण्यात यावे.


५. जिल्हा निहाय मंजूर अनुदानाचा तपशील यासोबतच्या विवरण पत्र अ व ब मध्ये देण्यात आला आहे.


६. करारनाम्यातील अटी व शर्तीची पूर्तता केल्याची खात्री करून देयकाची अदायगी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांची राहील.


सोबतः अनुदानाचे विवरण पत्र "अ व ब" माहे सप्टेंबर-२०२५,


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीसाठी सविनय सादर,


१. मा. अवर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ३२.

२. मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयातील कार्यासन २६ फ (अंदाज शाखा).




ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...