गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

टाचण पहिलीचे पूर्ण वर्षाचे 2025-26

 टाचण पहिलीचे पूर्ण वर्षाचे 2025-26

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी

शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

घोषवाक्य फ्लेक्स

दक्षता समिती"चे पुनर्गठण करणेबाबत शालेय शिक्षण विभागाचा कालचा महत्त्वपूर्ण जी.आर.

 *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी "दक्षता समिती"चे पुनर्गठण करणेबाबत शालेय शिक्षण विभागाचा कालचा महत्त्वपूर्ण जी.आर.*

संविधान शपथ व संविधान जागृती प्रश्न मंजुषा 2025

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .* 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt *"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷* *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

 

दि.26नोव्हेंबर संविधान दिन साजरा करणे बाबत GR

 




👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

https://youtube.com/shorts/UAKM6XMVmfo?si=nKlnHclOgwf3DCMA

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻



संविधानदिनानिमित्त विविध उपक्रम

 



*२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील. अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस ठरेल.*




१) उपक्रमाचे नाव:- संविधान दिन प्रभात फेरी


उद्दिष्टे:- १) विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे,


२) नागरिक म्हणून कर्तव्यभावना विकसित करणे,


३) समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-


विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक तयार करावेत.


शाळेपासून गाव किंवा परिसरात प्रभात फेरी काढावी.


फेरीदरम्यान घोषवाक्ये, देशभक्तीपर गीते सादर करावीत,


२) उपक्रमाचे नावः- संविधान व्याख्यानमाला / सेमिनार


उद्दिष्टे: १) विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे.


२) संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देणे,


३) विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासासाठी प्रेरित करणे,


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-


संविधान अभ्यासक, प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे.


३) उपक्रमाचे नावः संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा


उद्दिष्टे: १) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे.


२) संविधानाच्या मूल्यांबद्दल कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे. 


३) दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-

स्पर्धेचे विषय ठरवावेत (उदा. "आपले संविधान आपला अभिमान").


आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी.


निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत.




४) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition)


उद्दिष्टेः १) विद्याथ्यर्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.


२) गटाने कार्य करण्याची सवय लावणे.


३) स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण करणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-


संविधानाशी संबंधित प्रश्नसंच तयार करणे,


गट किंवा वर्गनिहाय स्पर्धा घेणे,


विजेत्या गटांना प्रमाणपत्र व बक्षीस देणे


५) उपक्रमाचे नावः संविधान विषयक पथनाट्य


उद्दिष्टे: १) समाजात संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे,


२) विद्यार्थ्यांमध्ये नाट्याद्वारे अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे. 


३) सामाजिक समरसतेचा संदेश देणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः-


विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण द्यावे व सराव करवून घ्यावा.


शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करावे.


नाटकामधून संविधान दिनाचा संदेश द्यावा.


६) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित पोवाडा / गाणी सादरीकरण


उद्दिष्टे: १) लोककलेच्या माध्यमातून संविधानाबद्दल अभिमान निर्माण करणे.


२) ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती विकसित करणे.


३) राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः


विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित पोवाडे, गाणी शिकवणे.


शाळेच्या कार्यक्रमात सादरीकरण करणे.


सर्वोत्तम सादरीकरणास पारितोषिक देणे,


(७) उपक्रमाचे नावः मानवी साखळी निर्मिती


उद्दिष्टेः १) संविधानातील "एकता व अखंडता" या मूल्यांचा अनुभव देणे.


२) विद्यार्थ्यांमध्ये सामुहिक कार्यासाठी आवश्यक समन्वय वाढवणे.


३) सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावni


शाळा प्रांगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातात हात घालून साखळी तयार करावी.


"आम्ही भारताचे लोक" या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करावी.


साखळीदरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करावे.


८) उपक्रमाचे नावः सेल्फी पॉईंट "I love Constitution":-


उद्दिष्टेः- १) विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडणे.


२) सकारात्मक प्रचाराद्वारे संविधान दिन लोकप्रिय करणे.


उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:


शाळेत "संविधान दिन सेल्फी पॉईंट" तयार करावा.


विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतीक, भारतीय ध्वजासह छायाचित्रे घ्यावीत.


"माझा देश-माझा अभिमान" सारखे घोषवाक्य वापरावे.


९) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा:-


उद्दिष्टे:- १) विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला वाव देणे.


२) संविधानातील प्रतिके, चिन्हे यांची ओळख करून देणे.


३) सृजनशील माध्यमातून देशभक्ती जोपासणे.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...