शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठविण्याबाबत
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२५-२६/3584 प्रति,
दिनांक: 27 NOV 2025
१) मा. आयुक्त, महानगरपालिका, बृहन्मुंबई.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.
विषयः सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठविण्याबाबत.
संदर्भ:
१) या कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२५-२६/२९२३ दि. २६ सप्टेंबर, २०२५ रोजीचे पत्र.
२) केंद्र शासनाचे D.०.२३-२/२०२५-Stats (Part २) दि. १८/११/२०२५.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांची सविस्तर माहिती शाळास्तरावरून यु-डायस प्लस https://udiseplus.gov.in/ प्रणालीमध्ये दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत अंतिम करण्यासाठी कळविण्यात आले आहे. परंतु, माहिती पूर्ण झालेली नसल्याने केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधील माहिती केंद्र शासनाकडे सादर करतांना पुढील
बाबींची माहिती तपासून सादर करण्यात यावी.
शाळांमध्ये भौतिक सुविधांची (यामध्ये प्रामुख्याने शाळांमध्ये इमारत, वर्गखोली, मुला व मुलींकरिता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, किचन शेड, रॅम्प, क्रिडांगण, संरक्षक मित, संगकीय साहित्य, प्रयोगशाळा) वस्तुनिष्ट माहिती असल्याची खात्री करणे.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन, अपार आयडी पूर्ण झाले असल्याची खात्री करणे.
ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थ्याने ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना Import करून घेण्यासाठी कळविण्यात यावे. विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षण घेत असेल / साठी प्रवेश घेतला असेल/ड्रॉपआऊट झाला असेल याप्रमाणे अभिप्राय यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावे.
जिल्ह्यांमध्ये दुबार नोंदणी झालेली असल्यास अशा विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्या विद्यार्थ्यांना Inactive करण्यासाठी कळविण्यात यावे.
श्रीमती कमलादेवी गौरीदन मित्तल आयुर्वेदिक रुग्णालय इमारत, १/१० वा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, (प), मुंबई ४०० ००२. ई-मेल: mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mabedu.gov.in रकिलरळ - https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in
Release Requset - विद्यार्थ्यांने राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेत / इतर राज्यामधील शाळेत प्रवेश घेत असल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक ऑनलाईन पध्दतीने यु-डायस प्लस प्रणालीत संबंधित शाळेला Request पाठवित असतात, अशा विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती घेवून Request Approve करावे. केंद्र शासनाकडून इतर राज्यामध्ये प्रवेशित झालेले आहेत परंतू, अद्यापपर्यंत Request Approve केलेली नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, ती माहिती तपासणीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदरची माहिती जिल्हा व तालुका लॉगिनमध्ये केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. २७ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांची माहिती अर्धवट भरली असल्याचे दिसून आले आहे. तरी तात्काळ माहिती पूर्ण भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षकांची सविस्तर माहिती (व्यावसायिक, शैक्षणिक, प्रशिक्षण, संवर्ग, संगणक ज्ञान इ) अचूक असणे आवश्यक आहे.
सन २०२५-२६ या वर्षापासून यु-डायस प्लस प्रणालीमधील सर्व माहिती शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी व इतर शासकीय संकेत स्थळांवरती ऑनलाईन पध्दतीने जोडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेली माहिती अचूक तपासून सदर माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने दि. ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत अपलोड करण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
(संजय यादव, मा27/11/25 राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहितीस्तव :
👇👇👇👇👇👨💻📲👇👇👇👇👇👇
>
जिल्हास्तरीय स्पर्धा
🌹🌷💐🌷🌹
पाईपलाईन विभागीय विद्या प्रसारक मंडळ टेमघर ता भिवंडी जिल्हा ठाणे
*सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त* आणि
स्व. दादू गोविंद म्हात्रे व स्व. मंजुळाबाई करसन तरे यांच्या स्मरणार्थ
आयोजित
*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा* २०२५
वर्ष - १ ले .
*परीक्षक*
श्री तुषार देवरे सर (कल्याण).
श्री नरेश वाळंज सर (भिवंडी)
*निकाल जाहीर*
*लहान गट - ३री ते ७वी*
* *प्रथम क्रमांक* -
* कु.अभंग स्वप्नील पाटील ४ थी
शारदा विद्या मंदिर प्राथमिक शाळा अनगाव. (भिवंडी)
*द्वितीय क्रमांक* -
कु.विधि मुकेश केणे ५वी
ओंकार इंग्लिश स्कूल सोनार पाडा , (कल्याण)
*तृतीय क्रमांक* -
वेदांत अनंता जाधव ६ वी
सौ.शा.ना लाहोटी विद्यालय अनगाव, (भिवंडी )
*उत्तेजनार्थ* -
मनहा जमीर अहमद शेख ७ वी
पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय (भिवंडी)
*उत्तेजनार्थ* -
रश्मी मनोज काळे ४ थी
जि. प. शाळा मानकोळी (भिवंडी)
-----------------------------------------------------
*मोठा गट (आठवी ते बारावी*)
*प्रथम क्रमांक*
सिद्धी हेमंत गपाट
सौ. शा.ना लाहोटी विद्यालय अनगाव
*द्वितीय क्रमांक*
प्राजक्ता रमेश शेलवले
विद्या मंदिर हायस्कूल शिवळे, मुरबाड
*तृतीय क्रमांक*
सारा संतोष घरत
NES Englis मिडीयम भिवंडी
* *उत्तेजनार्थ*
* तन्वी भरत जाधव
*शारदा विद्या मंदिर , (भिवंडी)
* *उत्तेजनार्थ*
* अल्फीया अल्ताफ शेख
* हिरा इंग्लिश स्कूल (भिवंडी)
*
*विजयी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन सहभागी स्पर्धकांचे विशेष कौतुक*!!!!!!!
🌷💐🌹🌷🌹
CTET application start 27 11 2025 to 18 12 2025
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...



























































