सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

निपुण महाराष्ट्र वाचन चाचणीचे साहित्य

 शिक्षण विभागातर्फे पाठवलेल्या सूचना येथे दिसतील, आपल्या मोबाईल सेटिंग मध्ये नोटिफिकेशन 'ऑन' ठेवा.


हे तुम्हाला माहीत आहे का?


निपुण महाराष्ट्र वाचन चाचणीचे साहित्य, महाराष्ट्रातील विविध भागातील तज्ज्ञ शिक्षकांनी मिळून तयार केले आहे. एकाच विभागातील भाषेचा प्रभाव नसावा, बोली भाषेनुसार विद्यार्थी चाचणीवर फरक पडू नये यासाठीही काळजी घेण्यात आली आहे.

👇👇👇 सराव साहित्य👇👇👇


निपुण महाराष्ट्र अभियान माहिती PDF

निपुण महाराष्ट्र टप्पा 2

 




निपुण महाराष्ट्र टप्पा 2

*मा आयुक्त व मा संचालक एस सी इ आर टी यांच्या दि.19.12.25 व्ही.सी.मधील सूचना*


✅ निपुण महाराष्ट्र ॲप टप्पा 2मध्ये 100% शाळा व 100% शिक्षक सहभागी होतील याची खात्री करणे


✅ सर्व शिक्षकांनी लॉगिन करून घेणे आवश्यक आहे


✅ लॉगिन संदर्भात काही अडचणी असल्यास केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन घेणे .


 ✅मुख्याध्यापकांनी स्वतःची सद्यस्थितीतील शाळा संपर्क क्रमांक इत्यादी माहिती शालार्थ 2.0 येथे अद्यायवत करणे व त्यास डीडीओ 2 ची मान्यता घेणे 


✅शिक्षकांची माहिती शालार्थ पोर्टलमध्ये अद्ययावत करणे व त्यास डीडीओ 1ची मान्यता घेणे


 ✅मुख्याध्यापकांनी कलम 6 उ प्रमाणे सर्व इयत्ता व तुकडीला शिक्षक नियुक्त करणे 


✅दिनांक 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत शिक्षकांनी ॲप वर लॉगिन करून चाचणी घेणे त्यानंतर चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल ठराविक कालावधीत चाचणी व नोंदणी पूर्ण होतील याची खात्री करणे. 


✅परीक्षा घेताना शिक्षकांनी अचूक माहिती नोंदविणे कोणत्याही शिक्षकावर शिस्तभागाची कारवाई होणार नाही याची नोंद घ्यावी 


✅विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या मजकुराचा फोटोच अपलोड करणे आवश्यक आहे 


✅परीक्षा घेताना इतर कोणीही बोलू नये फक्त विद्यार्थीच बोलतील विद्यार्थ्यांचा आवाज जाईल याची दक्षता घ्यावी.


✅निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये पालकांचे मोबाईल नंबर अपलोड करण्याची सुविधा देखील सुरू आहे त्याप्रमाणे पालकांचे मोबाईल नंबर अपलोड करणे


✅ डीडीओ 1 व डीडीओ 2यांनी रोज query काढणे व सर्व शिक्षकांचे लॉगिन पूर्ण झाले आहेत याची खात्री करणे 


✅तालुकास्तरावर query solve होत नसल्यास ॲप वर गुगल फॉर्म भरण्यात यावा राज्यस्तरावरून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल


✅मुख्याध्यापकाकडे जर केंद्रप्रमुखांचा चार्ज असेल तर प्रथम केंद्रप्रमुख लॉगिन मधून लॉग आऊट होणे आवश्यक आहे त्यानंतर मुख्याध्यापक लॉगिन सुरू करावे व पुढील माहिती भरावी 


✅पाचवी विद्यार्थी शून्य असतील तरीही लॉगिन करणे बाबत सूचना द्यावेत 


✅शून्य शिक्षकी शाळेत ज्या शिक्षकांची नेमणूक केली आहे त्या शिक्षकांनी देखील ॲपवर मॅन्युअली माहिती भरावी व लॉगिन करून चाचणी घेण्यात यावी


 ✅दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील निपूण महाराष्ट्र अँप वर चाचणी बाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे

 

✅ज्या शाळेमध्ये मराठी भाषा द्वितीय अथवा तृतीय भाषा असेल त्या शिक्षकांनी देखील लॉगिन करणे आवश्यक आहे.



*दिनांक 22 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत वरील सूचनेप्रमाणे 100%शाळेतील 100%विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण करावी तसेच राज्यस्तरावरून दिलेल्या नियोजनाप्रमाणे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यातील चाचणी बाबत कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे*



ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...