शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

विषयः राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण बाबतची कार्यवाही करणेबाबत.






 राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CHC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. गटस्तरावर उपलब्ध करून दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.


राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी असल्यामुळे निसर्गच होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी Draft Box मध्ये असल्याचे आढळूनयेत आहे. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत त्यापैकी नादुरुस्त संच वगळता उर्वरित कार्यरत संचाचा उपयोग करुन आधार विषयक सर्व प्रलंबित कामकाज होणे आवश्यक आहे. उका आधार नोंदणी संघ (Aadhar Enrollment Kit) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.


१. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करून घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याशीनुसार आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे.


२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात. भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी.


३. तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजासाठी येणार आहेत अशा शाळा निश्चित करणे आवश्यक आहे.


४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुदा


क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.


५. संचमान्यता आधार कॅलिड विद्यार्थी संखेच्या आधारापर होणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील mis-match, invalid आणि आधार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार बाबतची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.


६. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील आधार प्रलंबित शाळांचा आढावा घेऊन तालुक्यास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार नोंदणी संचाच्या कामकाजाचे अचूक नियोजन करावयाचे आहे. नियोजन करतांना केंद्रनिहाय करण्यात यावे तसेच एखाद्या शाळेत जास्त विद्यार्थी प्रलंबित असल्यास आधार नोंदणी संब (युनिट) सदरहू शाळेस प्रलंबित कामाकरीता उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.


७. गटशिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटर यांचेकडून शाळांकडील आधार नोदणी व अपडेशन यांचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संबंधित ऑपरेटर यांचेकडून सर्व कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.


८. तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आधार नोंदणी संच किरकोळ कारणांमुळे नादुरुस्त झाले असल्यास, कार्यालयाकडे उपलब्ध निधीमधून दुरुस्ती करुन घेण्यात यावे व नादुरुस्त संब त्वरीत सुरु करुन घेण्यात यावेत.


९. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करून देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.


१०. दि. ३० सप्टेंबर, २०२५ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्यावत करून सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.


११. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील. त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌🪀 

👇👇👇टच👇👇👇

https://chat.whatsapp.com/KocyMKaCdt1DH7A63ljcLL?mode=ems_copy_t


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

4. सरल ड्रॉपबॉक्स बाबत कार्यवाही करणे:-


१. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता Drop Box मध्ये दिसणारे तसेच शाळास्तरावर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत


attach (प्रवेशित) करणे आवश्यक आहे.


२. सरल प्रणाली अंतर्गत कार्यरत स्कूल पोर्टलवरील (School Portal) मधील Drop Box मध्ये अद्यापही १३.८४ लक्ष विद्यार्थी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सोबत जिल्हानिहाय विवरण तक्ता जोडण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्ह्यांनी कार्यवाही करावी.


४. शाळा लॉगिनवरील Drop Box मध्ये दिसणारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणेकरीता त्यांची Drop Box मधील

५. प्रस्तुत बाबत शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन प्रलंबित शाळा व तालुक्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत तसेच याबाबत नियमितपणे आढावा घेऊन Drop Box मध्ये दिसणारे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.


६. Drop Box मध्ये दिसणारे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांना इन केलेनंतरच सदर विद्यार्थ्यांची नोंद SARAI प्रणालीमध्ये कायमस्वरूपी संग्रहित होते तसेच शाळेला कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद प्रलंबित आहे हे स्पष्टपणे दिसते, त्यामुळे आवश्यक असल्यास follow-up करुन पुढील कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी.


७. तसेच वरिष्ठ कार्यालयास विद्यार्थ्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेत, Drop Box च्या माध्यमातून मागील शाळेने विद्यार्थ्यांची नोंद सोडली आहे की नाही आणि नवीन शाळेने प्रवेश मंजूर केला आहे की नाही याचा आढावा घेता येतो.


क. अपार आयडी (APAAR-Automated Permanent Academic Account Registry) बाबत कार्यवाही करणे


१. केंद्रशासन निर्देशानुसार शाळांमध्ये प्रवेशित सर्व इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना U-DISE+ प्रणालीचा वापर करून APAAR ID (१२ अंकी एकमेव ओळख क्रमांक) उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत.


२. APAAR ID मार्फत सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये एकाच विद्यार्थ्यासाठी कायमस्वरूपी एकच ओळख क्रमांक उपलब करुन देण्यात येतो तसेच अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे व इतर माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे, तसेच विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थांमध्ये बदल केल्यास पूर्व माहिती आपोआप नवीन संस्थेस हस्तांतरित होणार आहे.


३. APAAR ID हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकमेव युनिक आयडी असल्यामुळे विद्यार्थ्यांची पुनरावृत्ती (Duplication) बाबतच्या नोंदी टाळता येतात. APAAR ID मुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या व शासन योजनांसाठी पात्रतेची सोपी पडताळणी करता येऊ शकते.


४. राज्यातील विद्यार्थ्यांच्या APAAR ID जनरेशन बाबतचा आढावा घेण्यात आला असता अद्यापही २० टक्के विद्यार्थ्यांचे APAAR ID तयार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. APAAR ID विद्यार्थ्यांच्या भविष्याकरीता महत्वाचा क्रमांक असल्यामुळे सदर बाबीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि (माध्यमिक) यांनी सदर कामास प्राधान्य देण्यात येऊन प्रलंबित विद्यार्थ्यांचे APAAR ID दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे.


वरील सर्व कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने सर्व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी.


Palker

(महेश पालकर)


शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत माहितीकरीता सविनय सादरः


१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे


*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

विषय - केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक १ ते ८ सप्टेंबर 2025 या कालावधीत राबविणे बाबत

 

*तंत्रस्नेही शिक्षक* 
 🌷 *आपलाच मित्र* 
🌷 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *
💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

नवोदय सराव चाचणी 29





 ✅ *`नवोदय सराव चाचणी 29`*

विषय - मराठी 

https://bit.ly/4p1aQ8v

➖➖➖➖➖➖➖➖

✅ *`शिष्यवृत्ती सराव पेपर क्र. 30`*

विषय - इंग्रजी (Dictionary Skill)

https://bit.ly/4p8hhHa

➖➖➖➖➖➖➖➖

✅ *`इयत्ता दुसरी घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट - मराठी`*

https://bit.ly/4mKwYmg

➖➖➖➖➖➖➖➖

✅ *`पदोन्नतीसाठी शिक्षकांना TET अनिवार्य`*

https://bit.ly/4naheIU 

➖➖➖➖➖➖➖➖

आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा

 




https://youtu.be/FZbW0DolKBo

🛑👆🏻आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/CaAXQiAT_Rk

🛑👆🏻I Got Karmyogi सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक प्रशिक्षण नोंदणी व कोर्स कसा पूर्ण करावा?सहज सोपी पद्धत

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/uyRBetJNKmY

🛑👆🏻अमृत वृक्ष अँपवर अनिवार्य रजिस्ट्रेशन कसे करावे? स्टेप बाय स्टेप फक्त 2 मिनिटात

➖➖➖➖➖➖➖➖

🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲 

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

https://chat.whatsapp.com/ENml39n2WFJFMbsHDYNU7L?mode=r_c


 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*                              

==================

फळ्यावरील उपक्रम -ABCD

 



निर्मिती व संकलन

पी पी पेंधे 9834383772

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*



दैनंदिन पाठ टाचण

 


तारीख विशेष उपक्रम-आजची तारीख 3.

 




*आजची तारीख 3.*तारीख विशेष उपक्रम*

1) तीन ,Three, 👉👉III(रोमन संख्या चिन्हात )

2) 3 ही विषम संख्या आहे. 

3) 3 ही मुळ संख्या आहे.

4) 3 ही सर्वात लहान विषम मुळ संख्या आहे.

5) एखाद्या संख्येला 3 ने निःशेष भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. 

6) 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 

7) 3 व 5 ही पहिली जोडमुळ संख्येची जोडी आहे. 

8) 3चे अवयव = 3×1. 

 9)3 चा वर्ग 9

10)3चा घन 27 11)3 तिघाडा काम बिघाडा ही म्हण आहे.

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

पाठटाचण- इयत्ता तिसरी

 


दैनिक पाठटाचण (Daily Lesson Plan)


इयत्ता: तिसरी तारीख: २ सप्टेंबर, २०२५(मंगळवार) विषय:पर्यावरण (Environmental Studies - EVS) उपविषय:आपली शरीररचना (Our Body Structure)


---


१. ध्येय (Learning Objectives):


· विद्यार्थे आपल्या शरीराच्या मुख्य अवयवांची ओळख करून घेतील.

· शरीरातील मुख्य हाडे (कवटी, छाती, मणके) यांची माहिती मिळवतील.

· शरीराची काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करतील.


२. साधनसामग्री (Teaching Aids):


· मानवी शरीराचा नकाशा (चार्ट)

· व्हिडिओ क्लिप (शरीरावरील एखादा मनोरंजक व्हिडिओ)

· पांढरा / काळा फलक आणि खडू / मार्कर

· रंगीत चित्रे


३. पाठ्यपुस्तकीय संदर्भ (Textbook Reference):


· [तुमच्या राज्याच्या शैक्षणिक मंडळाच्या पाठ्यपुस्तकाचे नाव आणि पान क्रमांक येथे लिहा]


---


४. शिकवणीची रूपरेषा (Teaching Procedure):


अ) प्रस्तावना / प्रवेश (Introduction) (१० मिनिटे):


· विद्यार्थ्यांना शरीरावर एक लहान गाणे किंवा कविता म्हणून दाखवा. (उदा., "हेड, शोल्डर्स, नीज अॅन्ड टोज")

· त्यांना विचारा: "आपण आजारी पडलो तर डॉक्टर आपल्या शरीराचा कोणता भाग तपासतो?" यावर संवाद साधा.


ब) मुख्य शिकवणी (Main Teaching) (२० मिनिटे):


· शरीराचा नकाशा (चार्ट) दाखवा.

· शरीराचे मुख्य भाग (डोके, मान, हात, पाय, छाती) यांची ओळख करून द्या.

· आतील अवयवांपैकी सोप्या भाषेत मेंदू, फुफ्फुसे, हृदय यांची माहिती द्या.

· हाडे आणि सांधे यांची कल्पना द्या. "आपण चालू किंवा धावू शकतो याचे श्रेय आपल्या हाडांना जाते" असे सांगा.

· एक छोटा व्हिडिओ क्लिप दाखवून शिकवणी रोचक बनवा.


क) विद्यार्थ्यांचा सहभाग (Student Activity) (१० मिनिटे):


· जोडीने काम: एक विद्यार्थी शरीराचा एक भाग सांगेल आणि दुसरा विद्यार्थी तो शरीरावर दाखवेल.

· फलकावर शरीराचे साधे चित्र काढा आणि विद्यार्थ्यांना येऊन भागांची नावे लिहिण्यास सांगा.

· "माझ्या शरीराची काळजी मी कशी घेईन?" यावर मुलांना विचारा. (उत्तरे: स्वच्छ राहणे, पौष्टिक आहार खाणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे).


ड) मूल्यमापन (Assessment) (५ मिनिटे):


· तोंडी प्रश्न विचारा: १. मेंदू कोठे असतो? २. आपल्या हृदयाचा आवाज कसा काढता येतो? ३. चालण्यासाठी कोणते अवयव काम करतात?


---


५. गृहपाठ (Homework):


· पाठ्यपुस्तकातील दिलेली उदाहरणे सोडवणे.

· किंवा, "आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपण कोणकोणते नियम पाळतो?" यावर ५ ओळी लिहिणे.


६. पाठाचा सारांश (Summary): आज आपण आपल्याशरीराच्या मुख्य अवयवांची ओळख करून घेतली. आपण निरोगी राहण्यासाठी शरीराची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे ते शिकलो.


---


टीप (Note): ही एक सामान्य पाठयोजना आहे. तुमच्या वर्गाच्या गरजा आणि अभ्यासक्रमानुसार यात बदल करणे गरजेचे आहे. इतर विषयांची (गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी) पाठयोजना हवी असल्यास कळवा.

शाळेचे फ्लेक्स..👨‍💻

 

शंभर दिवस वाचन कार्यक्रम - पहिली दुसरी

 

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


हमारा विद्यालय - हमारा स्वाभिमान" या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबाजावणी करणेबाबत.

 







उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्र व सहपत्राची प्रत या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे. (प्रत संलग्न)


संदर्भीय शासन पत्रात कळविलेनुसार अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्यावतीने दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये "हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान" हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्यधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. त्यामुळे महाराष्ट्रतील सर्व शाळांमध्ये (सर्व माध्यमांतून चालना-या) हा उपक्रम राबविण्याबाबत नमूद केले आहे.


सदर विषयी शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ०१.०९.२०२५ रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान" हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक ०१.०९.२०२५ रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल, त्या जिल्हातील शाळांमध्ये सदर उपक्रम दि.०२.०९.२०२५ रोजी राबविण्याबाबत सूचित करण्यात यावे.


Digitally signed by Sachindra Pratap Singh Date: 29-08-2025 22:3

 (सचिन्द्र प्रताप सिंह भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य. पुणे.

प्रत आवश्यक कार्यावाहीस्तवः-

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)


प्रत माहितीस्तवः


अवर सचिव एस.डी.४ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई- ३२

GR -लोकसेवा अर्जाचे निवारण ऑनलाईन पद्धतीने करणे

 




प्रस्तावना-


मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. त्यांनतर मा. मुख्यमंत्री यांनी १५० दिवसांचा कृती आराखडा या विषयावर दि.०७मे, २०२५ रोजी मंत्रालयीन अधिकारी व राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना हक्क परिषदेद्वारे (video conferencing), मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृह निर्माण) यांच्या उपस्थितीत संबोधित केले आहे. यास अनुसरून शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी आगामी १५० दिवसांमध्ये त्यांचे कार्यालय ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वकष सुधारणा करून कार्यालय नागरीकांना सोईचे कसे होईल यासाठी विशेष मोहीम रावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांतील ई-प्रशासन प्रभावीपणे होण्यासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.


शासन परिपत्रक:-


राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी आगामी १५० दिवसांमध्ये त्यांचे कार्यालय ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करून कार्यालय नागरीकांना सोईचे कसे होईल यासाठी विशेष सुविधा पुरवणे अपेक्षीत आहे. यास अनुसरुन पुढील सूचना निर्गमीत करण्यात येत आहेत.


(৭) विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांचे ई-प्रशासन प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणा-या ऑनलाईन सेवांचे आपले सरकार पोर्टलशी त्वरील एकात्मिकरण करावे व सदर सेवा सर्व नागरिकांना विहित मुदतीत उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

शासन निर्णय क्रमांकः प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/ एसडी-२

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

(२) शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांचे (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व)) ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणारे सर्व संकेतस्थळांचे / पोर्टलचे तात्काळ एकात्मिकरण करुन घेणे आवश्यक आहे जेणे करुन नागरिकांना एकाच लॉगीन वरुन सर्व पोर्टल वरील ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन घेता येतील व नागरीकांना विविध सेवा उपलब्ध करुन घेणे सोईचे होईल.


(३) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या कार्यालयाद्वारे लोकसेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत अधीसूचीत केलेल्या सेवा यांचा निकाली काढण्याचा कालावधी या विषयीची सविस्तर माहीती पोर्टल वर अद्यावत करण्यात यावी. तसेच नागरीकांनी मागणी केलेली सेवा ही विहित मुदतीत न मिळाल्यास अपील प्राधिकारी यांची संपुर्ण माहीती देखिल पोर्टल वर अद्यावत करावी.


(४) विभागाचे ई प्रशासन प्रबळ व प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या कार्यालयाद्वारे पुरविण्यात येणा-य ऑनलाईन सेवा या मुख्यत्वे ऑनलाईन माध्यमातूनच देण्यात यावी. ऑनलाईन माध्यमाने पुरविण्यात येणा-या सेवांचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात यावे. तसेच या सेवाचे निवारण देखील ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात यावे.


(५) अपवादात्मक परीस्थितीमध्ये उदाः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार गुणपत्रक/प्रमाणपत्रे, गुणपत्रक/प्रमणपत्राच्या दुय्यम प्रती, तसेच सदर गुणपत्रक व प्रमाणपत्रांना प्रमाणित करुन द्यावयाचे असल्यास या सेवांविषयी प्रथमतः अर्जदारास ऑनलाईन माध्यमाने तसे सुचीत करणे आवश्यक आहे. तद्नंतर अर्जदारास सदर सेवा ऑफलाईन अथवा पोस्टल पध्दतीने उपलब्ध करुन देता येतील.


(६) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या सर्व कार्यालयांमध्ये नागरीकांच्या मदतीसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात यावा. जेणेकरुन आलेल्या नागरीकांना कार्यालयातच ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो व सेवा उपलब्ध करुन घेण्याविषयी उचित मार्गदर्शन देखील करता येऊ शकतो. तसेच ऑनलाईन सेवा/ तक्रारींच्या अनुषंगाने काही प्रश्न असल्यास त्यांचे त्वरीत निवारण होऊ शकेल.


(७) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयाद्वारे लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उपलब्ध सेवांचा सविस्तर चारमाही तपशील मंत्रालय विभाग स्तरावर नियमित उपलब्ध करुन देण्यात यावा.


(८) १५० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे ई प्रशासन प्रबळ करण्यासाठी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व आयुक्त,


शासन निर्णय क्रमांकः प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/ एसडी-२

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) यांनी सदर सुचनांच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०९०११८१५२३०५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


TUSHAR VASANT MAHAJAN


(तुषार महाजन)


उप सचिव, महाराष्ट्र शासन



प्रति,

१) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

३) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

५) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

६) मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण विभाग), मंत्रालय मुंबई.


७) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.


८) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक


९) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.


१०) विभागीय आयुक्त, सर्व महसुली विभाग.


११) जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे.

Simple English sentences lesson 28









Simple English sentences lesson 26
👇👇👇👇👨‍💻👇👇👇👇








तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇


https://youtu.be/H9Gclt6gqEM?si=mGfRRwk8ALJc1j_9

Simple English sentence  lesson 24




तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇


https://youtu.be/YBAv9n7GpuU?si=NJxHWChlZysBR8tH



 निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...