अनेक कर्मचारी बांधवांकडून ग्रॅच्युटी (उपदान) गणना कशी होते याची माहिती विचारली जात आहे, त्यामुळे थोडं सविस्तर हा लेख लिहीत आहे..
खर तर उपदान हे कोणत्या प्रकारचे आहे त्यावरून त्याची गणना वेगवेगळ्या पद्धतीने / नियमानुसार केली जाते..
सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity ) आणि
मृत्यु उपदान ( Death Gratuity ) हे उपदानाचे मुख्यत्वे २ प्रकार आहेत..
*१) सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity )* :-
अंतिम वेतनाच्या एक चतुर्थांश × एकूण सहामाही कालावधी.. या सुत्रानुसार सेवानिवृत्ती उपदान गणना केली जाते..
उदा- एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन 63000 रु आहे ( बेसिक 42000 + DA 21000 ) आणि सेवा कालावधी हा 15 वर्ष व 6 महिने असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युटी रक्कम पुढीलप्रमाणे..
सेवानिवृत्ती उपदान / ग्रॅच्युटी = अंतिम वेतनाच्या एक चतुर्थांश × एकूण सहामाही कालावधी..
= अंतिम वेतन × 1/4 × एकूण सहामाही कालावधी ची सेवा ..
= 63,000 × 1/4 × 31
= 15,750 × 31
= 4,88,250 रु
इथे एकूण सहामाही कालावधी 15 वर्ष नुसार 30 व पुढील 6 महिन्याचा 1 असा एकूण 31 झालेला आहे..
(टीप- सेवानिवृत्ती उपदानात एकूण सेवा कालावधी कमाल गणना 33 वर्ष नूसार 66 पर्यंतच ग्राह्य आहेत.. )
*२) मृत्यु उपदान ( Death Gratuity ) गणना*
सेवेत असतांना मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांना ( त्यांच्या कुटूंबास ) मिळणाऱ्या उपदानाची गणना खालीलप्रमाणे होते..
1. सेवा 1 वर्षापर्यंत -
उपदान = अंतिम वेतनाच्या 2 पट ..
2. सेवा 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत - उपदान = अंतिम वेतनाच्या 6 पट ..
3. सेवा 5 वर्ष ते 11 वर्षांपर्यंत- उपदान = अंतिम वेतनाच्या 12 पट..
4. सेवा 11 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत - उपदान = अंतिम वेतनाच्या 20 पट.
उदा- एखाद्या मयत कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन 63,000 रु व एकूण सेवा 15 वर्ष 6 महिने असेल तर त्या कुटुंबास
मिळणारे मृत्यू उपदान =
= 63,000 ×20
= 12,60,000 रु.
(12 लाख 60 हजार रु)
5. सेवा 20 वर्षांपेक्षा जास्त असल्यास..
मृत्यु उपदान रक्कम सूत्र हे पुढीलप्रमाणे असते..-
अर्हताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहामाही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम वेतनाच्या ३३ पटींच्या मर्यादेत
समजा एखाद्या मयत कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन 63,000 ( 42000+21000) असेल आणि एकूण सेवा एकूण सेवा 22 वर्ष 6 महिने असेल तर त्याच्या कुटुंबास मिळणारी डेथ ग्रॅच्युटी पुढीलप्रमाणे..
मृत्यु उपदान = अंतिम वेतन × 1/2 × एकूण सहामाही सेवा
= 63,000 × 1/2 × 45
= 31500 × 45
= 14,17,500 रु
( 14 लाख ,17 हजार 500 रु.)
(मृत्यु उपदानातही सेवा कालावधी कमाल मर्यादा 33 वर्ष नुसार आहे.)
माहितीस्तव.. धन्यवाद..
(सदर सेवानिवृत्ती / डेथ ग्रॅच्युटी लाभ DCPS/NPS धारक सेवानिवृत्त / मयत कर्मचाऱ्यांना ही लागू आहेत.. तसेच ग्रॅच्युटी ची कमाल मर्यादा आजच्या वित्त विभाग 10 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णया नुसार 1 सप्टेंबर 2024 पासून 14 लाख रु वरून 20 लाख रु करण्यात आलेली आहे..
6 व्या वेतन आयोगात ग्रॅच्युटी कमाल मर्यादा ही 7 लाख रु होती..)
आपलाच
विनायक चौथे
राज्य सोशल मिडिया प्रमुख
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
( *आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱9834383772📲
share करा......
subscribe करा.......
गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....
📲Share all educational group📲📲📲📲📲)