*साबण तयार करणे प्रात्यक्षिक*
https://youtu.be/SxqcIcAau0w?feature=shared
*जिल्हा परिषद शाळा नंदगाव ता. किनवट जि. नांदेड*
येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त
साबण बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना घरगुती उद्योग, (लघुउद्योग) साबण बनविणे याची माहिती मिळावी अर्थात व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी मुंबई येथील *आदरणीय सौ.अनघा बापट मॅडम* यांच्याकडून साबण बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल शाळेला उपलब्ध करून देण्यात आले.
आजच्या जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी साबण कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक घेतले व विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे सादरीकरण सुद्धा केले.
*शाळेला व्यवसायिक शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ.अनघा बापट मॅडम यांचे खूप खूप आभार*🙏🙏🙏
