* विदधार्थ्यांना चित्राचे बारकाईने निरीक्षण करू दद्यावे. चित्रावर आधारित प्रश्न विचारून विविध गणितीय शब्दांची यादी फळ्यावर लिहावी.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचे वर्णन विद्यार्थ्यांना करण्यास सांगावे. त्यावेळी वर्णनात कोणकोणते गणितीय शब्द येतात? त्यांची यादी करावी. दैनंदिन जीवन आणि गणित यावर अनौपचारिक गप्पा-गोष्टी कराव्यात.
> वरील चित्रे पाहा. चित्रवर्णन करा.
चित्रवर्णन करताना कोणकोणते गणिती शब्द आले? त्यांची यादी करा.
> सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कोणकोणते गणिती शब्द वापरतो/बोलतो ? सांगा.

