मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

गुरूजी

 


*गुरूजी*

************

ही लिंक भरा

तो ऐप डाऊनलोड करा

ही माहिती भरा

तो सर्व्हे करा

एक्सेल भरा

भले तुम्ही मरा

पण माहिती मात्र

लवकर भरा.

ही चाचणी घ्या

ती परीक्षा घ्या

पॅट काय

नि चॅट काय

अध्ययन स्तर होताच तर

निपुण पण आला

सारं करता करता 

मास्तर मात्र मेला.

समित्या केल्या

अहवाल लिहिले

साहेबांनी येऊन

सारे काही पाहिले.

गुरूजी म्हणाले

अजून काय राहिले?

प्रशिक्षण जास्त

शिक्षण कमी

तरीही गुरूजी देतात

शिक्षणाची हमी.

जुनी पेन्शन

बदलीचं टेन्शन

आपलेच दात

आपलेच ओठ

कुठे करणार मेन्शन!

गुरूजी थकला

कर्जात वाकला

जबाबदारीच्या

ओझ्याखाली झुकला.

ओझं पेलवेना

मनातलं बोलवेना

मग एक दिवस सकाळी

गुरूजी उठला

घाम फुटला

छाती भरली

धरणी फिरली

श्वास अडकला छातीत

स्वप्ने विरली मातीत.

आयुष्यभर

कर कर केले

बातमी झाली

गुरूजी गेले....

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...