बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

शंका निरसन - श्री गणेश स्थापना, महत्व, आरती ची माहिती

 






🐀🐀🐀🐀🐀🐀🐀

  *श्री गणेश जीवन परिचय*

१] वडील = *भगवान शंकर*

२] आई = *देवी पार्वती*

३] मोठा भाऊ = *कार्तिकेय*

४] बहीण = *अशोकसुंदरी*

५] 2 पत्नी = *रिद्धी व सिद्धी*

६] 2 पुत्र = *शुभ व लाभ*

७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = *दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत*

८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = *देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून*

९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = *डिंक*

१०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = *प्रणव*

११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = *गाणपत्य*

*१२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात?* = *कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने*

१३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = *भगवान शंकर*

*१४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = *हत्तीचे शिर बसवून*

*१५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = *लेखनिक*

१६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = *मोदक,लाडू*

१७] आवडता रंग व फुल = *लाल,जास्वंदीचे*

१८] प्रिय पत्री = *दूर्वा,शमीपत्र*

*१९] हातातील मुख्य अस्त्रे =* *पाश,अंकुश*

*२०] नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे =* *सुमुख,एकदंत,कपिल,गजकर्णक,लंबोदर,विकट,विघ्ननाश,विनायक,धुम्रकेतू,गणाध्यक्ष,भालचंद्र व गजानन*

*२१] श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली ? =* *समर्थ रामदास स्वामी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही..*

*आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.*

*ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.*


*श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच माझी गणेशास प्रार्थना आणि आपण सर्व भक्तास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏*


*घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?" हे अवश्य वाचा.....*


कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत

ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.


आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.


वैशिष्ट्ये :

(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता  वेगवेगळे आहेत.


(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.


(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.


(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.


(५) यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.


(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.


आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया...


१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |

भावे ओवाळीन म्हणे नामा |


वरील कडवे नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ...


विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.


२) त्वमेव माता च पिता त्वमेव |

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव | 

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |

त्वमेव सर्व मम देव देव |


हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ...

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.


(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा | 

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||


हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ…

श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.


(४) अच्युतम केशवम रामनारायणं |

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |

जानकी नायक रामचंद्र भजे ||


वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ…

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.


हरे राम हरे राम |

राम राम हरे हरे |

हरे कृष्ण हरे कृष्ण | 

कृष्ण कृष्ण हरे हरे |


हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे.

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.


अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो. 


*सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...