सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

इयत्ता पहिली-२)परिचित प्रसंगातील संभाषण व संवाद समजून ऐकता येणे

   



Online study with PRASHANT PENDHE या इ १ली मातृभाषा विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी  क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे यामध्ये इ १ली मातृ‌भाषेच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे


या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढले आहेत. तसेच हे प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत


शाळापातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत करण्यात आला आहे याशिवाय विविध प्रश्नांसाठी समांतर प्रश्नसंच देण्यात आले असून या सर्व प्रश्नसंचांतील उपप्रश्नांची रचना काठिण्यपातळीनुसार केली आहे चाचणी सोडविताना विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा, बुद्धीला चालना मिळावी या हेतूने या प्रश्नपेढीत पाठ्यपुस्तकाबाहेरील साहित्याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शिक्षकांनी शालेय पातळीवर क्षमता चाचणी तयार करताना पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारे, बडबडगीते, गाणी, कविता, कथा यांचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

२)परिचित प्रसंगातील संभाषण व संवाद समजून ऐकता येणे.


शिक्षकांसाठी सूचना


मुलांच्या अनुभवविश्वातील ८ ते १० वाक्यांपर्यंतचे लहान संभाषण, छोटा संवाद शिक्षकांनी योग्य प्रकारे वाचून दाखवावा व प्रश्न विचारून प्रतिसादाच्या नोंदी प्रपत्रात घ्याव्यात.


१ (संभाषण / संवाद)


सुमन:👇

आई, मला जेवायला वाढ; खूप भूक लागली आहे.


आई :👇

ठीक आहे, पहिल्यांदा तू हातपाय धुऊन ये !


सुमन :👇

आधी जेवायला दे, मग हात धुते.


आई👇

नाही. हातपाय धुतल्याशिवाय जेवायला मिळणार नाही.


सुमन :

कशासाठी गं हात धुवायचे? माझे हात चांगलेच आहेत

की ! बघ !


आई👇

अग, तरीही त्यावर खूप घाण असते. हात धुतले नाहीत तर ती जेवणाबरोबर पोटात नाही का जाणार ?


सुमन :👇

हो ! मग काय बिघडलं !


आई :👇

पोटात घाण गेल्याने आपण आजारी पडतो.


सुमन :👇

खरंच ! मग येते धुऊन.


संच १ उत्तरे सांगा.


१. सुमनने आईला काय मागितले ?

२. आईने सुमनला काय करायला सांगितले ?

३. त्यावर सुमन काय म्हणाली ?

४. जेवणापूर्वी हात का धुवावेत ?

५. पोटात घाण गेल्याने काय होते ?


२ (संभाषण / संवाद)


बेडकाने मुलांना विचारले, "तुम्ही दगड का मारता ?"


"हा आमचा खेळ आहे."


"तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो."


"आमची चूक आम्हाला कळली, इथून पुढे आम्ही नाही दगड मारणार!


संच - १ उत्तरे सांगा.

💐👬💐👬💐👬📲👬📲👬🙏

१. मुले कोणाला दगड मारत होती ?

२. बेडकाने मुलांना काय विचारले ?

३. खेळ म्हणून मुले बेडकांना काय मारत होती ?'

४. मुलांना काय कळाले ?

५. मुलांनी काय करायचे नाही असे ठरविले ?



ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...