गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

परीक्षेचे नवीन वेळापत्रक, परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

 



*🎯 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2025 जाहिरात प्रसिद्ध, 2410 पदांसाठी होणार केंद्र प्रमुख परीक्षा, जाणून घ्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक, परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम*


*पुणे :* महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. 01/12/2025 ते 05/12/2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून 2410 पदांची भरती विविध जिल्हा परिषदेत भरण्यात येणार आहेत.


📌 *समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) वेतनश्रेणी :- एस १५ : ४१८००-१३२३००*


*📌शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-*

     शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अर्हता अनिवार्य असेल.

1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

2. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

3. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. 

4. दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.

5. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.

*6. वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.*


*📌निवड प्रक्रिया स्वरूप:-*

      लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

*परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-*

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

*📌परीक्षेचे शुल्क :*

१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. 950/-

२. दिव्यांग उमेदवारः रु. 850/-


*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-*

✅२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी

         *दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*

✅ नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज

     *दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*

✅ऑनलाईन परीक्षा दिनांक

    *दि. ०१/१२/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५*


*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*

 ✅ केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

 *✅ पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*

     *📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*

        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*

*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*

3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)

4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते

 *📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम* 

1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण

2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण

3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण

4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण

5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण

6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण

7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण

              *एकूण - 100 गुण* 

*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.

2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स

3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)

4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ 

5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

          *Best of Luck*

*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...