तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇टच हेअर 👇👇
सर्व परीक्षार्थी व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*
*----🅿︎🅿️🅿️----*
प्रति,
मा. आयुक्त महोदय,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे.
विषय : फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी केंद्रप्रमुख परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती.
महोदय,
मी खाली सही करणारा अर्जदार, विनम्रपणे आपणांस कळवितो की केंद्रप्रमुख पदासाठीची परीक्षा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद निवडणुका निश्चितपणे होणार आहेत. त्यामुळे केंद्रप्रमुख परीक्षेस अर्ज केलेल्या अनेक शिक्षकांची निवडणूक कामकाजासाठी (Election Duty) निश्चित नियुक्ती होणार आहे.
तसेच, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी CTET परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांवर एकाच कालावधीत निवडणूक कर्तव्य व सलग परीक्षा यांचा अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण येत आहे. याचा थेट परिणाम परीक्षेतील उपस्थिती व कामगिरीवर होण्याची शक्यता आहे.
वरील सर्व वास्तव परिस्थितीचा विचार करून, केंद्रप्रमुख पदाची परीक्षा योग्य कालावधीसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी नम्र व कळकळीची विनंती आहे. यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल व परीक्षा न्याय्य व तणावमुक्त वातावरणात पार पडेल, असा आम्हाला विश्वास आहे.
आपण आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार कराल, ही अपेक्षा.
आपला विश्वासू,
Send to
mscepune@gmail.com
