गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?

 *🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?*


➡️ CTET परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या परीक्षेला आता साधारणपणे 17 दिवसांचा कालावधी आहे. 


➡️ या काळात पुढील पद्धतीने अभ्यास केल्यास ही परिक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकता.


        *📕 CTET परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी काय महत्वाचे आहे ?*


➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या.


➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा.


➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या.


➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा.


➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा.


➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात. 


➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या.


➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल.


➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे.


*🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*


1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)

2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)

3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)

4. गणित (30 प्रश्न)

5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न


*📘📚  CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके*


*1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास,  हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS  घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.


*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे  (CTET 50  प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)


*3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.*


*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*


*🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*


1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)

2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)

3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)

4. गणित व विज्ञान (60 प्रश्न)

किंवा

    4. सामाजिक विज्ञान (60 प्रश्न)


*📘📚  CTET –पेपर  2 संदर्भ पुस्तके*


*1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.


*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे  (CTET 50  प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)


3.  *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी  ते 10 वी पुस्तके वाचावीत.*


*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...