बुधवार, १७ जून, २०२६

स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब पुण्यतिथी ।।

 ।। स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब पुण्यतिथी ।। 🚩*


`"पुत्र असावा शिवबासारखा... ही प्रत्येक मातेची इच्छा असते,`

पण त्यासाठी आधी स्वतः 'जिजाऊ' व्हावं लागतं..."


*आदरणीय पालक बंधू-भगिनींनो,* 🙏


आज १७ जून... अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची पुण्यतिथी.


जिजाऊ आऊसाहेब हे केवळ एक ऐतिहासिक नाव नाही, तर तो `'आदर्श पालकत्वाचा`' सर्वोच्च विचार आहे. अंधार दाटलेला असताना, गुलामगिरीच्या छाताडावर पाय देऊन उभे राहणारे 'स्वराज्य' त्यांनी घडवले. बाल शिवबांच्या हाताला धरून त्यांनी केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे 'शिल' आणि 'चारित्र्य' दिले.


आजच्या पालकांसाठी जिजाऊंचा संदेश:

आजच्या आधुनिक युगात आपल्या मुलांवर योग्य संस्कार करणे, त्यांच्यात राष्ट्रप्रेम, जिद्द आणि नैतिक मूल्ये रुजवणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. आऊसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आपण आपल्या पाल्यांना केवळ पदव्या मिळवणारे नव्हे, तर समाजाचे आणि देशाचे नेतृत्व करणारे 'तेजस्वी चारित्र्य' बनवूया!


या पवित्र दिनी, *आपल्या पाल्यांना सुसंस्कारी आणि पराक्रमी बनवण्याचा दृढ संकल्प करूया. हीच आऊसाहेबांच्या चरणी खरी आदरांजली ठरेल!*


`शिवसंस्कारांचे बीज रोवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन!` 💐🙏


 

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...