मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार-बहुतांश रजिस्टर ही SQAAF मूल्यांकनासाठी अत्यंत उपयुक्त

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सदर PDF मध्ये वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांना अत्यंत आवश्यक व उपयुक्त रजिस्टर दिले आहेत. बहुतांश रजिस्टर ही SQAAF मूल्यांकनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच वर्ग शिक्षकांना आपले शालेय रेकॉर्ड गुणवत्तापूर्ण ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.


 *रजिस्टर एक असो वा अनेक कुरियर सेवा मोफत राहील.*

72 तासात आपले साहित्य शाळेवर पोहोच होईल.


संपर्क -7248908428

 साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.


विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल - सप्टेंबर

 विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन




सभा क्रमांक-


माहे - सप्टेंबर


दिनांक-03/09/2025


शाळा जिल्हा परिषद शाळा.


केंद्र


तालुका


जिल्हा


शाळा अध्यक्ष श्री.......वार दिनांक 03/09/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री..... ..यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


विषय क्र- 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे.


ठराव क्र- मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आ



विषय क्र- . विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा शालेय दर्शनी भागात लावण्याबाबत.


ठराव क्र- शाळेच्या दर्शनी भागात विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. आपण देखील आपल्या शाळेत विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा ही लावणे बंधनकारक आहे. याबाबत देखील सभेत चर्चा करण्यात आली. सर्वानुमते ठरविण्यात आले कि विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणे. प्रतिज्ञा पाठांतर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्यात मदत करणे. असे यावेळी सभेत ठरविण्यात आले.

विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल -ऑगस्ट

 विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन




सभा क्रमांक-


माहे - ऑगस्ट 


दिनांक-03/08/2025


शाळा जिल्हा परिषद शाळा.


केंद्र


तालुका


जिल्हा


शाळा अध्यक्ष श्री.......वार दिनांक 03/08/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री..... ..यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


विषय क्र- 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे.


ठराव क्र- मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आ



विषय क्र- . विद्याथ्यांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करणे.


ठराव क्र- विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन एक महत्त्वाची उपक्रम आहे, जो त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक विकासास मदत करतो. संस्कार वर्गामध्ये विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, आदर्श वर्तन, आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जावे. याबाबत या सभेत चर्चा करण्यात आली. या सभेत काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आले कि, विद्यार्थ्यांचे मानसिक आणि भावनिक विकास, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व, व या विषयांची निवड करण्याचे ठरविण्यात आले. शिष्टाचार आणि वर्तन, परस्पर संवाद कौशल्य, सहकार्य आणि संघभावना, तणाव व्यवस्थापन आणि समस्या सोडवणे, धर्म, संस्कृती, आणि परंपरा या विषयावर अध्यक्ष यांच्या मत्ते संस्कार वर्ग विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजात एक चांगले नागरिक बनवण्यास मदत मिळेल. ठराव मंजूर करण्यात आला.


सूचक


विषय क्र- 4. विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख उद्देश समजणे.


ठराव क्र- 4 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेतील सर्व उपाययोजना करणे. विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत जागरूक करणे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या अधिकारांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव होते. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करणे, तसेच त्यांना मदतीसाठी योग्य मार्गदर्शन करणे. शाळेतील विविध घटना आणि परिस्थितींची निरीक्षण आणि मूल्यांकन करणे. सुरक्षिततेविषयक कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे आणि चर्चासत्रांचे आयोजन करणे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, आणि स्थानिक समुदायाच्या सहकार्याने सुरक्षा विषयक उपाययोजना विकसित करणे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना आणि प्रतिसाद योजना तयार करणे. या उद्देशांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व संरक्षणासाठी एक मजबूत पाया निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि संरक्षित वातावरणात शिक्षण घेता येते. या सर्व विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख उद्देश या बाबीवर सखोल अशी चर्चा करण्यात आली. व तसा ठराव मंजूर करण्यात आला.

विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन

 विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन



सभा क्रमांक-


माहे - जुलै


दिनांक-01/07/2025


शाळा जिल्हा परिषद शाळा.


केंद्र


तालुका


जिल्हा


शाळा अध्यक्ष श्री सोमवार दिनांक 01/07/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री..... ..यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


विषय क्र- 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे.


ठराव क्र- मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आ



कॅमेरा बसविण्याबाबत.


ठराव क्र- 2 शाळा व शालेय परिसरात CCTV कॅमेरे बसवणे हे सुरक्षितता आणि अनुशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. यामुळे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संरक्षण करण्यात मदत होते. अनधिकृत प्रवेश किंवा असामाजिक कृत्यांपासून संरक्षण. शिक्षक आणि प्रशासकांना शालेय परिसरातील घडामोडींचे निरीक्षण करण्याची संधी. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वर्तनाचे नियंत्रण साधणे. CCTV कॅमेऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होते, ज्यामुळे त्यांचे वर्तन सुधारते. कुठल्या प्रकारच्या अपघात किंवा विवादाच्या वेळी योग्य साक्ष्य मिळवणे. विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा विचार करणे. कॅमेरे योग्य ठिकाणी आणि योग्य कोनात बसवणे. डेटा सुरक्षितता आणि व्यवस्थापनाचे नियम पाळणे. या सर्व बाबींवर विद्यार्थी सुरक्षा समितीच्या या बैठकीत विचार करण्यात आला. व तसा ठराव मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचे ठरविण्यात आले. सदर ग्रामपंचायत आपल्या शाळेसाठी CCTV कॅमेरे बसवून देणार आहे. मागील जून महिन्याच्या ठरावाप्रमाणे CCTV कॅमेरे बसवून देण्याचे ठरविण्यात आलेले आहे. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.


सूचक


अनुमोदक

विकसित महाराष्ट्र 2047 चे उद्दिष्ट

 




प्रस्तावना :-

विकसित महाराष्ट्र - २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विकसित महाराष्ट्राची संकल्पना मूर्त स्वरुपात मांडण्यासाठी संदर्भ क्र.१ येथील दिनांक १७.०४.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली "सल्लागार समिती" तसेच मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली "समन्वय समिती" स्थापन करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ येथील दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्याचे Vision Document तयार करण्याकरिता क्षेत्रनिहाय १६ गट स्थापन करण्यात आले असून प्रत्येक गटासाठी संयोजक नियुक्त करण्यात आले आहेत. सदर संयोजकांनी सर्व प्रशासकीय विभागांच्या सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव व संबंधित क्षेत्रातील तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करुन तसेच नागरिक सर्वेक्षणाद्वारे प्राप्त सूचना यांचा समावेश करुन Vision Document चा अंतरिम मसुदा तयार केला आहे. या मसुद्याची छाननी करुन अंतिम मसुदा तयार करण्यासाठी गाभा समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या Vision Document चा अंतरिम मसुदा अंतिम करण्यासाठी खालीलप्रमाणे गाभा समिती गठीत करण्यात येत आहे.


अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम



गाभा समितीने Vision Document च्या मसुद्याची छाननी करुन दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ पर्यंत अंतिम मसुदा तयार करावा.


२. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२५०९१५१३३४४१४६१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,


CHARUSHILA DEVENDRA CHAUDHARI


(चारुशीला चौधरी) सह सचिव, महाराष्ट्र शासन


प्रति,


१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.


२) श्री.प्रविण परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), मुंबई.


३) श्री.ओ.पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.


४) श्रीमती व्ही. राधा, अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.


५) श्रीमती अश्विनी भिडे, मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.


६) श्री. सौरभ विजय, प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.


७) डॉ. अनबलगन, सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.


८) डॉ. श्रीराम वेदिरे, मा. मुख्यमंत्री यांचे सल्लागार, मंत्रालय, मुंबई.


प्रत,


१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.


२) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


३) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


४) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


५) मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


६) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


७) सर्व सन्माननीय सदस्य, विधानपरिषद विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


८) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.


पृष्ठ ३ पैकी २


शासन निर्णय क्रमांका विमहा-२०२५/प्र.क्र.०५/का.१४१४


९) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास) विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.


१०) मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.


११) सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री महोदय यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई. १२) मुख्य कार्यकारी अधिकारी, नीति आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली.


१३) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई.


१४) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद), विधानभवन, मुंबई.


१५) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा), विधानभवन, मुंबई,


१६) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, मुंबई.


१७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.


१८) सर्व विभागीय आयुक्त/ सर्व जिल्हाधिकारी / सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी.


१९) आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, १८ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत मंत्रालय, मुंबई-५२.


२०) सर्व महानगरपालिकांचे आयुक्त.


२१) निवडनस्ती, कार्यासन-१४१४, नियोजन विभाग.


सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

तारीख विशेष उपक्रम- दिनांक 15

 




*👉 आजची तारीख 15. तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) पंधरा ( पंचदश) Fifteen पंद्रहं.👉👉 XV👉(रोमन संख्याचिन्हात)

2) 15 ही विषम संख्या आहे. 

3) 15 ही संयुक्त संख्या आहे.

4) 15 असा अंक आहे ज्याचे अवयव 3&5 जोडमुळ संख्या आहे.

5) 15 ने भाग देण्यासाठी ज्या संख्येस 3 व 5 ने भाग जातो त्या पुर्ण संख्येस 15 ने भाग जातो.

6)15 चे अवयव =3×5

7)15 चा वर्ग 225 आहे. 

 8)15 चा घन 3375आहे. 

 9)15 चे विभाजक1,3,5, 15 आहे. 

 10) 15 ही त्रिकोणी संख्या आहे 1+2+3+4+5.



practice for English sentences

 practice for English sentences

👇👇👇👇👨‍💻👇👇👇👇



रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवयात वाढ




👇👇👇👇👇👇👇

 https://youtu.be/0FoNurXpG4k?si=-9xporh7YTQQpGMI

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....


 📲Share all educational group📲📲📲📲📲

सुंदर फूल तयार करूया

 











👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/OD2FClltIS8

*टाकाऊ पिशवीपासून सुंदर फूल तयार करूया सोपे कार्यानुभव*

कोणालाही TET👆🏻👆🏻 द्यावी लागणार नाही. काळजी करू नका

 *कोणालाही TET👆🏻👆🏻 द्यावी लागणार नाही. काळजी करू नका*

    * खालील जजमेंट अभ्यासा*

      *मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ श्री सुरेश एस.. पाकळे साहेब यांनी आपल्या बाजूने जजमेंट करून दिलेले आहे*👇👇👇👇👇

>

पुस्तके.... सारांश

 









वेड्यांच्या दवाखान्यासमोर एकाची कार पंक्चर झाली. तो पटकन गाडीतून खाली उतरला. चार नट काढून मागचं चाक काढलं. पंक्चर झालेलं चाक काढून तिथे स्टेपणी लावली आणि परत जेव्हा चार नट लावायला गेला तेव्हा लक्षात आलं की, चार नट बाजूच्या गटारात पडले आहेत. जे आता काढणे शक्य नाही. 

अवघड परिस्थिती झाली. समस्या वेगळीच होती. गाडी हवेत, चारी नट बाजूच्या गटारात पडलेले, सापडत नव्हते. पंक्चरच्या जागी लावायला नवीन चाक आहे. पण नट नसल्यामुळे ते बसू शकत नाही. त्याने वेड्याच्या दवाखान्याकडे बघितलं. एक वेडा गॅलरीत उभा राहून त्याच्याकडे बघत होता.


"मला मदत करणार का? मला शहरात जायचंय ?” समोरच्या कारवाल्याने त्या वेड्याला विचारलं.


"मग जा की.”


"नाही. गाडी नाहीये."


"ती काय समोर उभी आहे."


"अहो, ती पंक्चर आहे."


"प्रॉब्लेम काय आहे?"


त्याने सगळं त्या वेड्याला सांगितलं.


तो म्हणाला, “सोपं आहे. समस्येमध्येच समाधान आहे. तुमच्याकडे तीन चाकं आहेत. प्रत्येक चाकाला चार नटं आहेत. आणि एक चाक तीन नटांवर राहू शकतं. तुम्ही प्रत्येक चाकाचा एक एक नट काढा आणि चौथ्या चाकाला तीन नट लावा. "


आता मात्र याचे डोळे मोठे झाले. चमकून त्याने, "खरंच की.' असं म्हटलं.


खरंतर समस्या ही आधीपासून नव्हती. फक्त त्या समस्येकडे बघायला दृष्टी नव्हती. हे असं शक्यच नाही, या विचारानेच त्याला बांधून ठेवलं होतं. इंग्रजीत आपण त्याला म्हणतो, चॅलेंज युवर अझम्शन्स. म्हणजे आपण मानलेल्या गोष्टींवर प्रहार करा. समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहा.


त्याने भराभरा प्रत्येक चाकाचा एक एक नट काढला आणि चौथ्या चाकाला तीन नट लावून गाडी तयार झाली.


त्याने त्या वेड्याकडे बघितलं आणि म्हणाला, “अरे, तुला

कोणी अॅडमीट केलं इथे? तू तर अजिबात वेडा नाहीस.'


तो म्हणाला, “मी वेडा आहे पण एवढी साधी गोष्ट न कळायला मी मूर्ख नाही."


 *असंच होतं. ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आपण आजूबाजूला चाललेल्या अनेक गोष्टी अशाच आहेत, असं मानून बसतो त्या वेळेला त्यात नवीन मार्ग दिसत नाही. नवीन मार्ग न दिसल्यामुळे आपण अनेकदा तिथेच फिरत राहतो.* *समस्या ज्या कारणासाठी आपल्या आयुष्यात आली आहे त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही.* 


पुस्तक : 

माझ्या आयुष्यात असं का घडतं.?

टीईटीचे वेळापत्रक जाहीर....(संकलन पी पी पेंधे )

 

तारीख विशेष उपक्रम- दिनांक 14

 




*👉 आजची तारीख 14 .तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) चौदा ( चतुर्दश)Fourteen चौदहं👉XIV👉(रोमन संख्याचिन्हात)

2) 14 ही सम संख्या आहे. 

3) 14 ही संयुक्त संख्या आहे.

4) 14 असा अंक आहे ज्यातील दोन्ही अंक पुर्ण वर्ग आहे.

5) 14 ने भाग देण्यासाठी ज्या संख्येस 2 व 7 ने निःशेष भाग जातो त्या पुर्ण संख्येस 14 ने भाग जातो.

6)14 चे अवयव =2×7

7)14 चा वर्ग 196 आहे. 

 8)14 चा घन 2744 आहे. 

 9)14 चे विभाजक1,2,7, 14 आहे. 

 10) 14 वर्षे वनवास तसेच 14 रत्ने असतात.



इयत्ता सातवी, आठवी आणि नववी मधील विद्यार्थी ची बाल परिषद

 नमस्कार,



सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने दरवर्षी ऑनलाईन राष्ट्रीय बाल परिषद आयोजित केली जाते. तंबाखुमुक्त आरोग्यसंपन्न वातावरण निर्माण करण्यासाठी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेले सकारात्मक उपक्रम, त्यातून मिळालेले अनुभव आणि कार्य करताना येणाऱ्या अडचणी राज्य व देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी शालेय मुलांनी, मुलांसाठी आणि मुलांमार्फत चालवलेली ही बाल परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे.


प्रत्येक जिल्ह्यातून ४० विद्यार्थी या बालपरिषदेच्या प्रशिक्षणाची सहभागी होऊ शकतात. *इयत्ता सातवी, आठवी आणि नववी मधील विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात.*


तंबाखूमुक्त समाजासाठी कार्य करणाऱ्या तुमच्या धडपडीला योग्य दिशा मिळवण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी ही संधी आहे.

खालील लिंकच्या साहाय्याने नोंदणी करा.


👉 नोंदणी लिंक: https://forms.gle/1s45xPaZnm28V4817


चला, आपण मिळून तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न आणि आरोग्यदायी भविष्यासाठी पुढे जाऊया!

शिष्यवृत्ती विशेष

 *बुद्धिमत्ता*


 `महत्वाचे दिन`


०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)

०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन

१० जानेवारी == जागतिक हास्य दिन

१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन

२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन

२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन

३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

————————————————————

१४ फेब्रुवारी == टायगर डे

१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन

२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन

२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन

२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन

————————————————————

०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन

०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन

१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन

२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन

२२ मार्च == जागतिक जल दिन

२३ मार्च == जागतिक हवामान दिन

————————————————————

०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन

०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन

१० एप्रिल == जलसंधारण दिन

११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन

14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 

२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन

२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

०३ मे == जागतिक उर्जा दिन

०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन

११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

१३ मे == राष्ट्रीय एकता दिन

१५ मे == जागतिक कुटुंब दिवस

१७ मे == जागतिक संचार दिवस

२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन

२४ मे == राष्ट्रकुल दिन

३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन

————————————————————

०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन

०५ जून == जागतिक पर्यावरण दिन

१० जून == जागतिक नेत्रदान दिन

१४ जून == जागतिक रक्तदान दिन

१५ जून == जागतिक विकलांग दिन

२१ जून == जागतिक योग दिन

२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन

२७ जून == जागतिक मधुमेह दिन

२९ जून == जागतिक सांखिकी दिन

———————————————

०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन

११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन

२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

२६ जुलै == कारगिल विजय दिन

२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

————————————

०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन

१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन

२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन

२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन

०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन

०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन

११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन

१४ सप्टेंबर == हिंदी दिन

१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस

१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन

२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन

०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती

०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन

०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन

०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन

१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन

१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन

२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन

३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन

३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस

—————————

०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन

०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन

१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन

१४ नोव्हेंबर == बालदिन

१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन

२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन


०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन

०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन

०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन

०४ डिसेंबर == नॊदल दिन

06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन 

०७ डिसेंबर == ध्वज दिन

०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन

१० डिसेंबर == मानवी हक्क दिन

२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन

२३ डिसेंबर == किसान दिन

२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

13 सप्टेंबर ची सर्वात मोठी बातमी - सरकारी कर्मचारी

 




https://youtu.be/jXm2sr5FWpc?si=Wdj-v1Ref_TbPiKJ

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....


 📲Share all educational group📲📲📲📲📲

2025-26 शिष्यवृत्ती आणि इतर शुल्काच्या निधीबाबत

 



सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्यासाठी योजनानिहाय निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे. सदरील निधीपैकी वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला निधी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्यासाठी मंजूर एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे योजनानिहाय एकूण रु. २३०.०० कोटी (अक्षरी रूपये दोनशे तीस कोटी फक्त) इतका निधी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांना वितरीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.


शासन निर्णय क्रमांका शिवृत्ती-२०२५/प्र.क्र.५५/शिक्षण-१


🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*
२. सदर योजनेकरिता संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे नियंत्रक अधिकारी राहतील. नियंत्रक अधिकारी यांनी उपरोक्त प्रमाणे वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीच्या मर्यादेत विहित प्रयोजनातून खर्च करावा. तसेच उपलब्ध तरतूद महाडीबीटी पोर्टलद्वारे पात्र विद्यार्थ्यांना विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून वितरीत करावी. या अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलद्वारे निधी वितरणाबाबत निर्गमित केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

३. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्तीच्या योजनाकरीता मागील व चालू आर्थिक वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे नियंत्रक अधिकारी यांनी शासनास सादर करावी तसेच चालू वर्षातील निधी उपयोगिता प्रमाणपत्रे तपासण्याच्या अधिन राहून खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील. सदर निधी खर्च करतांना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/परिपत्रके आणि वित्तीय नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उप विभाग १ ते ५. दि.१७.०४.२०१५ मधील अटी व शर्तीचे पालन करून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थसंकल्प-३, दि.०७.०४.२०२५ अन्वये विभागास देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

पृष्ठ ३ पैकी २

शासन निर्णय क्रमांकः शिवृत्ती-२०२५/प्र.क्र.५५/शिक्षण-१

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२५०९१२१६०१२८६९३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Digitally signed by RUPALI SANJOG KABARE Date: 2025.09.12 16:02:39 +05'30'

(रुपाली कबरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण यांचे खाजगी सचिव.

२. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे स्वीय सहाय्यक.

३. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.

४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.

६. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई.

७. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.

८. सर्व प्रादेशिक उप संचालक, इतर मागास बहुजन कल्याण

९. सर्व सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण

१०. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ ११. निवड नस्ती (शिक्षण-१)


शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

आपले राष्ट्रीय प्रतिके

 










https://youtube.com/shorts/ntLu08la8os?si=5h9dtjlyNJfjLm-K

▪️▪️▪️▪️▪️▪️

*आपले राष्ट्रीय प्रतिके.*

राष्ट्रीय फूल 

राष्ट्रीय पक्षी

राष्ट्रीय चिन्ह 

राष्ट्रीय प्राणी 

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

▪️ *लाईक करा..*

▪️ *कमेंट्स करा.*

▪️ *सबस्क्राईब करा..*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...