अपूर्णांक: लहान-मोठेपणा, चढता-उतरता क्रम
इयत्ता चौथी - पाचवी | स्पर्धा परीक्षा सराव प्रश्नसंच (एकूण प्रश्न: ३०)
✅ ONLY घरचा अभ्यास
📢 पालकांसाठी महत्त्वाची सूचना:
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेले हे ग्रुप्स केवळ गरजू विद्यार्थ्यांसाठी आहेत.
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तेनुसार योग्य ग्रुपमध्येच जॉईन व्हावे ही नम्र विनंती.
राजगुरुनगरमध्ये राहुनसुध्दा मला हुतात्मा राजगुरुंबद्दल दोन वाक्यांपलीकडे काहीच माहिती सांगता येत नाही असं सारखं वाटायचं... म्हणून साधारण ७ ते ८ वर्षांपूर्वी मी हुतात्मा राजगुरुंच्या जीवनावर आधारित डॉ. कृ. पं. देशपांडे यांची ‘अग्निकंकण’ ही कादंबरी वाचली होती... आज ती कादंबरी माझ्याकडे संग्रहात नाहीये... पण, त्या कादंबरीतला एक प्रसंग मला अजूनही पुसटसा आठवतोय... कदाचित त्या कादंबरीतला तेवढा एकच प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला म्हणून फक्त तोच प्रसंग लक्षात राहिला... तो असा की...
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली असते... त्यावेळी राजगुरुंच्या आई पार्वतीबाई राजगुरुंना भेटण्यासाठी लाहोर येथील तुरुंगात येतात...
मरणाच्या दारात उभ्या ठाकलेल्या आपल्या मुलाला पाहून पार्वतीबाईंचा हुंदका बाहेर पडतो... आणि त्या रडायला लागतात...
रडणाऱ्या आईला राजगुरु मात्र अगदी कणखरपणाने म्हणतात...
“अगं माई रडतेस काय अशी ? उलट मी फासावर जाणार म्हणून तू पेढे वाटायला हवेस... माई, तुझा शिवराम मरण्यासाठी नाही तर, या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुनर्जन्म घ्यायला निघाला आहे... जे या जन्मात मला साधता आलं नाही ते मी पुढच्या जन्मात साध्य करीन...”
किड्या-मुंग्यांप्रमाणे मरणारे अनेकजण असतात... पण, फासावर जातांना भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देता आले नाही म्हणून तिची माफी मागणारे... मातृभूमीच्या सर्वोच्च ध्येयासाठी मरणालाही हसत हसत सामोरे जाणारे राजगुरु मात्र एकमेव...
खरंच धन्य आहेत ते राजगुरु ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले... आणि धन्य ती माऊली जिने अशा शूर क्रांतीवीर पुत्राला जन्म दिला...
अशा थोर क्रांतिकारकाच्या जन्माने पावन झालेल्या राजगुरुनगरमध्ये राहण्याचं अन् अभिमानाने ‘मी राजगुरुनगरकर आहे’ अस सांगण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी विधात्याचा खूप खूप ऋणी आहे..
प्रथम सत्र चाचणी - सर्व विषय प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका