शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६
दि. १७ सप्टेंबर, २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्याबाबत.
दि. १७ सप्टेंबर, २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२१४/एस.डी.-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. दिनांक :- ११ सप्टेंबर, २०२६
संदर्भ :-
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सेसंअ-२०२६/प्र.क्र.९५/रवका-२, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२६.
प्रस्तावना :-
आपल्या देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयान्वये दि. १७ सप्टेंबर, २०२६ ते दि. १७ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राज्यात "सेवा संकल्प अभियान" राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असलेले विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये विशेषतः "विकसित भारत" संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, "नमो सेवागाथा" कार्यक्रम तसेच शिक्षण, करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता व विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासंदर्भातील उपक्रमांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयान्वये सूचविल्याप्रमाणे विविध उपक्रम शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये "सेवा संकल्प अभियान" राबविण्याकरिता खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत. :-
१) “विकसित भारत २०४७" चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा :-
१.१ चित्रकला स्पर्धा
सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी "विकसित भारत" या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करावी. स्पर्धेत विद्यार्थ्यांना विकसित भारत, राष्ट्रनिर्मिती, नवभारताची संकल्पना, स्वच्छ व सक्षम भारत, पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य व रोजगार इत्यादी बाबींच्या माध्यमातून आपली कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्पर्धेत निवड झालेल्या उत्कृष्ट चित्रांचे शाळास्तरीय प्रदर्शन आयोजित करावे.






































