Most important first to 5th educational information शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शुक्रवार, २४ जुलै, २०२६
इयत्ता २ री - बुद्धिमत्ता टेस्ट-श्री प्रशांत प्रल्हाद पेंधे यांच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शनाखाली
श्री प्रशांत प्रल्हाद पेंधे यांच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शनाखाली
| प्र. क्र. | सराव प्रश्न | ऑनलाइन टेस्ट / सराव लिंक |
|---|---|---|
| १ | गाय : वासरू :: कुत्रा : ? (अ) पिल्लू (ब) शेळी (क) घोडा (ड) मांजर | सोडवा / लिंक १ |
| २ | आंबा : फळ :: गुलाब : ? (अ) झाड (ब) फूल (क) भाजी (ड) पान | सोडवा / लिंक २ |
| ३ | सोमवार : आठवडा :: जानेवारी : ? (अ) महिना (ब) वर्ष (क) दिवस (ड) ऋतू | सोडवा / लिंक ३ |
| ४ | चिमणी : पक्षी :: वाघ : ? (अ) सरीसृप (ब) प्राणी (क) मासा (ड) कीटक | सोडवा / लिंक ४ |
| ५ | पेन्सिल : लिहिणे :: रबर : ? (अ) रंगवणे (ब) खोडणे (क) कापणे (ड) चिकटवणे | सोडवा / लिंक ५ |
| ६ | डोळे : पाहणे :: कान : ? (अ) बोलणे (ब) ऐकणे (क) चालणे (ड) खाणे | सोडवा / लिंक ६ |
| ७ | तांदूळ : भात :: गहू : ? (अ) पोळी (ब) भाजी (क) दूध (ड) फळ | सोडवा / लिंक ७ |
| ८ | नदी : पाणी :: जंगल : ? (अ) वाळू (ब) झाडे (क) रस्ता (ड) दगड | सोडवा / लिंक ८ |
| ९ | शिक्षक : शाळा :: डॉक्टर : ? (अ) बाजार (ब) दवाखाना (क) बाग (ड) घर | सोडवा / लिंक ९ |
| १० | मधमाशी : मध :: रेशीम किडा : ? (अ) रेशीम (ब) दूध (क) लोणी (ड) तेल | सोडवा / लिंक १० |
पहिली ते पाचवी शिष्यवृत्ती channel
🅶︎🆁︎🅾︎🆄︎🅿︎ 🄰🄳🄳 🅃🄷🄸🅂👇
येथे टच करून ग्रुपवर ॲड व्हावेएक पेड माॅं के नाम " अंतर्गत शाळा, वृक्षारोपण उपक्रम
*व्हिडिओ झूम करून बघावा*
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
👇👇"एक पेड माॅं के नाम "
अंतर्गत शाळा, महाविद्यालय
, काॅलेज ,गाव,येथे
वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत
👇👇👇
सदर उपक्रमात सर्व सरकारी, खाजगी, शाळा, काॅलेज, महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या पोर्टल वर आपलीं नोंदणी करायची आहे.तसेच आपल्या आईसोबत झाड लावल्याचा फोटो अपलोड करायचा आहे.
👉हे सर्व प्रक्रिया कशी करावी यासाठी वरील व्हीडीओ मार्गदर्शक ठरेल.
👉सदर व्हिडीओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवा
👉
विद्यार्थी,शाळा, काॅलेज, महाविद्यालय , केंद्र, तालुका, जिल्हा, राज्य ग्रुपमध्ये पाठवा.
👉 जेणेकरून व्हिडिओ पाहून पालक व विद्यार्थी आपले नाव नोंदणी करून फोटो अपलोड करतील
👉विद्यार्थी सहभागी होण्यासाठी लिंक
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏
Water harvesting environment
शाळेबाबत माहीती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇Eco clubs for mission life विद्यार्थी प्रमाणपत्र
येथे तुम्ही दिलेल्या **"एक पेड माँ के नाम"** उपक्रम आणि WhatsApp ग्रुप्सच्या लिंक्स सर्व ठिकाणी पाठवा 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र शिक्षण विभाग उपक्रम
🌱 "एक पेड माँ के नाम" 🌳
No Private Class | ONLY घरचा अभ्यास
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच ऍड व्हावे ही नम्र विनंती.
संकलन
तंत्रस्नेही शिक्षक
PRASHANT PENDHE
💐 धन्यवाद 💐
इयत्ता चौथी 24 जुलै घरचा अभ्यास
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
गुरुवार, २३ जुलै, २०२६
शिक्षण सप्ताह - दिवस तिसरा (क्रीडा दिन
जिल्हा परिषद ठाणे | केंद्र = पडवळपाडा
शिक्षण सप्ताह - दिवस तिसरा
बुधवार दि. २४ जुलै २०२४ | क्रीडा दिन
नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले असून, या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो, असे अधोरेखित करण्यात आले आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.
- खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वांबद्दल जागरूकता वाढविणे.
- समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.
- तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.
- राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे.
- खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी (विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ).
- विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनासाठी सकारात्मक वृत्ती विकसित करणे.
- विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.
- विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.
- खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.
शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे. शालेयस्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.
इयत्ता १ ली ते ५ वी साठी खेळ
सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सांगरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या इत्यादी.
इयत्ता ६ वी ते १२ वी साठी खेळ
बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मलखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, तीन पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम इत्यादी.
विशेष सूचना: केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांच्या यादीतून परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी. शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा व खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा. स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. पालक आणि नागरी समाज सेवाभावी संस्था यांची मदत घ्यावी. सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा.
अपेक्षित परिणाम: विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल. विद्यार्थ्याच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल, वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.
संकलन
तंत्रस्नेही शिक्षक
PRASHANT PENDHE
💐 धन्यवाद 💐
शिक्षण सप्ताह शिक्षण परिषद
शिक्षण सप्ताह
दिवस पहिला : अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस (TLM Day)
शैक्षणिक साहित्य निर्मिती, मुखवटे व कथाकथन उपक्रम
📈 वर्धित शिक्षण
टी.एल.एम. मुळे सखोल समज वाढते. मुले अभ्यासात विशेष रस दर्शवितात.
🌱 पर्यावरणीय शाश्वतता
पुनर्नवीनीकरण किंवा सहज उपलब्ध संसाधने वापरून पर्यावरण जाणिवा वाढवणे.
💡 कौशल्य विकास
सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि सहयोगात्मक शिक्षण कौशल्ये वाढतात.
🧒 पायाभूत स्तर (अंगणवाडी / बालवाडी व इयत्ता १ ली व २ री)
- उपलब्ध साहित्य पेट्या (PSE Kit, महाराष्ट्राचा जादुई पेटारा, भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी इ.) वापरून कृती घेणे.
- पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक किंवा गटामध्ये सादरीकरण.
- पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याद्वारे विविध माध्यमांतून ठसेकाम करून घेणे.
- पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत सादरीकरण.
- गोष्टींचा कट्टा: बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करणे.
👦 पूर्वतयारी स्तर (इयत्ता ३ री ते ५ वी)
- तक्ते बनविणे: "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक बाजारपेठ", "माझे कुटुंब" इत्यादी विषयांवर तक्ते तयार करणे.
- रंगीत पेटी: घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून आकर्षक पेट्या बनवणे.
- कार्ड्स: फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे अभ्यासपूर्ण कार्ड बनवणे.
- मुखवटे: प्राणी, पक्षी इत्यादींचे आकर्षक मुखवटे तयार करणे.
- वाचन कट्टा: वाचन कट्टा आणि कथाकथन सत्रांचे आयोजन करणे.
🧑 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते १० वी)
- कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.
- ल्युडो सारखे स्थानिक व शैक्षणिक खेळ तयार करणे.
- कागद आणि बांबूच्या कांड्या किंवा उत्तम स्थानिक साहित्यापासून खेळणी बनवणे.
- कपडे आणि टाकाऊ वस्तूंपासून कठपुतळी किंवा बाहुली (Puppet) बनविणे.
- पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्ड्स (Story Cards) तयार करणे.
- महत्त्वाच्या विषयांवर आधारित तक्ते आणि वाचन क्लब (वाचन पट्टा) स्थापन करणे.
🧑🎓 उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ११ वी व १२ वी)
- घोषवाक्ये पोस्टर्स: 'पाणी कसे वाचवायचे' व 'इतरांना कशी मदत करावी' यावर पोस्टर्स बनवणे.
- विज्ञान आणि गणित विषयांवर आधारित आव्हानात्मक कोडी तयार करणे.
- सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित आणि भाषा विषयांशी संबंधित मैदानी/शारीरिक व डिजिटल खेळांचे आयोजन.
- त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): माती किंवा पेपर-मॅचे (कागदी लगदा) वापरून ऐतिहासिक वास्तू व भौमितिक आकार बनवणे.
- अध्ययन निष्पत्तीसाठी फॅब्रिक किंवा पुठ्ठ्यावर पटावरील खेळ (Board Games) विकसित करणे.
- जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरून ऐतिहासिक कालखंड/सनावळ्या सारांशित करणारे भिंतीवरील तक्ते तयार करणे.
🏛️ TLM प्रदर्शनातील आकर्षक स्टॉल्स
- वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल: स्वतंत्र स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. भित्तिपत्रकांसाठी "चला शिकूया भित्तिपत्रकातून", गोष्टीसाठी "चला गोष्टी ऐकूया", पपेटसाठी "जर खेळणी बोलू लागली तर".
- साहित्याचे प्रदर्शन: आशय शिकण्यासाठी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन.
- संगीतमय शैक्षणिक साहित्य: गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन-अध्यापनात प्रभावी वापर दर्शवणारा स्टॉल.
- हस्तलिखितांचे प्रदर्शन: विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित करणे.
- शिक्षकांचे साहित्य: प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्र, बाहुल्या इत्यादी साहित्याचे प्रदर्शन.
- दिग्दर्शन वर्ग: अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण साहित्याचे वर्ग किंवा स्टॉल मांडणे.
संकलन
तंत्रस्नेही शिक्षक
PRASHANT PENDHE
💐 धन्यवाद 💐
तुमचे रिफंड अजून आले नसेल, तर खालील लिंक तपासा... 👇👇
आयकर विभाग (Income Tax Department)
ITR Refund Status चेक करा
जर तुमचे रिफंड अजून आले नसेल, तर खालील लिंक तपासा
मी ३१ जुलैपर्यंत रिटर्न केलाय तरीही माझे अजून refund आलेले नाहीत...
इन्कम टॅक्स रिटर्न लवकर भरल्याने रिफंडला गती मिळते. विलंबाच्या प्रमुख कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- चुकीचे बँक तपशील (Incorrect Bank Details)
- चुकीचे TDS आकडे (Incorrect TDS Figures)
विलंबित परताव्याचे उपाय: आपले बँक तपशील अचूक सत्यापित करणे आणि फाइलिंग त्रुटी सुधारणे. वापरकर्ते आयकर पोर्टलवर त्यांची परतावा स्थिती तपासू शकतात आणि आवश्यक असल्यास परतावा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करू शकतात.
संकलन
तंत्रस्नेही शिक्षक
PRASHANT PENDHE
💐 धन्यवाद 💐
मराठी- आईची नातलग माझे कोण??????
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
English Simple words
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
50 common English responses
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
ग्रहांची माहिती- शनि
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
Reading practice class 1
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
इयत्ता 2री 23 जुलै
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
घरचा अभ्यास -पहिली 👇👇टच 👇👇 घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी 👇👇टच 👇👇 घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी 👇👇टच 👇👇 घरचा अभ...
-
*🎓TET मोफत कार्यशाळा🎓* *🎯TET PYQ Solution मोफत कार्यशाळा🔥* मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफ...










































