" alt="ब्लॉग लोगो">

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२६

लेखन मंच... एक सर्वोत्कृष्ट साप्ताहिक

🏫 लेखन मंच
📚 लेखन मंच
✍️ लेखन मंच
🧠 लेखन मंच
⭐ लेखन मंच
🎯 लेखन मंच
📲 🖥️ 🖲️ 📚
🏫 लेखन मंच
📚 लेखन मंच
✍️ लेखन मंच
🧠 लेखन मंच
⭐ लेखन मंच
🎯 लेखन मंच
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो. खालील लिंक्सचा वापर करा: * *ब्लॉग लिंक:* 





 तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

*७ नोव्हेंबर : 'विद्यार्थी दिन'!* *वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी*

*७ नोव्हेंबर : 'विद्यार्थी दिन'!*
 *वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी*




 भिमाबाई व रामजी सुभेदार यांना झालेले चौदावे अपत्य म्हणजे भिवा ! शाळेत जाण्याच्या वयाचा भिवा होता . साताऱ्यात राजवाडा चौकात गव्हर्मेंट स्कूलमध्ये भिवाचा शाळेत प्रवेश निश्चित झाला. भिवाने शाळेत पहिलं पाऊल ठेवलं तो ऐतिहासिक दिवस होता ७ नोव्हेंबर १९००! भारतात जातीयतेची उतरंड असल्याने पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी फक्त उच्च वर्णियांचीच होती.ज्या विद्यार्थ्याला शाळेत अस्पृश्य म्हणून वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, त्याचं विद्यार्थ्यांचा त्या शाळेत दाखल झाल्याचा दिवस शासनाला 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करावा लागतो ‌. जगात याहून अधिक प्रेरणादायी ते काय? तो आदर्श विद्यार्थी म्हणजे बापमाणूस, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय ! ब्रिटिश काळात ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील महार जातीच्या सैन्याच्या भरतीवर बंदी आणली आणि जे महार जातीचे सैनिक होते, त्यांनाही सैन्यातून कमी करण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून रामजी सुभेदार यांना ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर असूनही १८९३ साली सैन्यातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना पर्याय म्हणून ब्रिटिशांनी सैनिकी शाळेत शिक्षक पदी नेमलं. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे रामजी सुभेदार यांनी अतिशय उत्तम असं अध्यापन केलं. एवढंच नव्हे, तर पुढे जाऊन ते त्या शाळेत मुख्याध्यापक झाले. त्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्व समजलेलं होतं. आपल्या मुलाने शिकावं, समाजाचे दुःख, दारिद्र्य दूर करावं, जातीमुळे मी जे सोसलं, समाजाने जे सोसलं, आणि आजही सोसतो आहे.. माझ्या मनगटात बळ असतानाही, एक सुभेदार म्हणून सैन्यांमध्ये मी स्थान मिळवलेलं असतानाही, केवळ मी महार असल्याने आणि ब्रिटिश सैन्यातील महारांच्या भरतीवर बंदी घातल्याने मला सैन्यातून काढण्यात आलं, अशी जातीवादाने सर्वत्रच अस्पृश्यांची गुणवत्ता असूनही दारे बंद केली आहे. त्या विरोधात माझ्या मुलाने लढावं, हे सुभेदार रामजी सकपाळ यांना मनोमन वाटत होतं. सातारा येथील गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर भिवा रामजी आंबेडकर यांनी शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं. जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं होतं तरी भिवाचं सार लक्ष मात्र वर्गाच्या फळ्यावर असायचं. गुरुजी काय शिकवतात, हे भिवा आपल्या मनात आणि मेंदूत साठवायचा, वर्गाच्या बाहेर बसत असले तरी, यापेक्षाही जास्त हाल त्यांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी व्हायचे. शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी एक माठ ठेवलेला असायचा. तहान लागलेले स्पृश्य विद्यार्थी जाऊन माठातील पाणी स्वतः घेऊन प्यायचे. पण, अस्पृश्य विद्यार्थ्यांना मात्र तहान लागल्यावर मठाजवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहावं लागायचं. शाळेतला शिपाई त्या माठातलं पाणी काढून त्या विद्यार्थ्यांच्या ओंजळीत ओतायचा. मग या मुलांची तहान भागायची. अस्पृश्य मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे येताना दिसली की, शिपाई तिथून दूर निघून जायचा. घशाला कोरड पडलेली तिखट चटणी भाकरीने तोंड जळणारी ही मुलं मात्र पाण्यासाठी त्या माठाच्या कडेने उभी राहायची, पण शिपाई लवकर माघारी यायचा नाही. असा बराच वेळ जायचा.. बऱ्याच वेळानंतर शिपाई यायचा अस्पृश्य मुलांना, मागे व्हा रे.." म्हणत ओरडायचा! मग त्यांच्या ओंजळीत वरून पाणी ओतायचा... हे बाबासाहेबांनी त्यांच्या 'अनुभव आणि आठवणी' पुस्तकात लिहून ठेवलंय.. शिक्षणासाठी बाबासाहेबांनी कित्येक हाल, आपमान सोसले, तरीही शिक्षण मात्र सोडलं नाही. ही यातील खूप महत्त्वाची आणि शिकायची बाब आहे. अशा परिस्थितीतही वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकत राहिले, त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं, पण शिक्षण सोडलं नाही! हे आम्हाला कळलं पाहिजे. सातारच्या त्या गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये बाबासाहेब चौथीपर्यंत शिकले. पुढे रामजी सुभेदार मुंबईला स्थलांतरित झाले; परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बाल भिवाच पाऊल शिक्षणाकडे वळलं. शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे चटके सहन करत रामजी सुभेदारांनी आपल्या लेकराला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये भिवा रामजी आंबेडकर यांचे ७ नोव्हेंबर १९०० या दिनी पहिलं पाऊल पडलं. हे पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेच्या, एका दैन्याच्या, एका मागासलेपणाच्या गर्तेतून, एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या, एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेल्या परिवर्तनाचे पाऊल होतं! *"बाळ भिवाची पावलं जर* *त्या शाळेकडे वळली नसती,* *तर आजही गाव गाड्यातल्या या माणसांना* *माणूस ही ओळख मिळाली नसती;"* म्हणून बाबासाहेबांची शाळेकडे वळालेली ही पावलं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही, तर ती एक नव्या शैक्षणिक- सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पण नाही पावलं होती. म्हणून बाबासाहेबांचा त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे. हीच बाब लक्षात घेऊन चळवळीतील अनेक धुरिणांनी यासाठी आग्रह धरला की, बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो बाबासाहेबांचा शाळेत दाखल झाल्याचा दिन हा 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा व्हावा, यासाठी अनेक वर्षे सरकार दरबारी पाठपुरावा होत राहिला आणि अखेर मान्य करत २७ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत गेलेला पहिला दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर हा दिन ' विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला. सरकारने हा आदेश काढावा, यासाठी संघर्ष करावा लागला, मागण्या कराव्या लागल्या, आंदोलने करावी लागली. परंतु, या महाराष्ट्रातील देशातील आणि जगातील प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब ही आहे की, एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेत असता, तेव्हा अनेक समस्या येत असतात, अनेक अडचणी येत असतात, परिस्थिती साथ देत नसते; परंतु एक विद्यार्थी म्हणून शिक्षण सोडता, आपल्या ध्येयावरती अटळ कसं राहायचं? याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय! भारत देशातीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, प्रसंगी प्यायला पाणीही मिळालं नाही. दिवस- दिवस पाण्याविना काढावे लागले. जेवण केल्यानंतर तासन तास पाण्याची वाट बघावी लागली की, कोणीतरी येईल आणि माझ्या ओंजळीत पाणी ओतेल, मग माझी तहान भागेल. पण, मला शाळेत असं छळलं जातंय, मला शाळेत हा त्रास, यातना सहन कराव्या लागत आहेत, म्हणून बाबासाहेबांनी शाळा सोडली नाही. शंभर वर्षाआधी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला भिजत एक विद्यार्थी भिवा रामजी आंबेडकर शिकत राहिले आणि तेच पुढे या देशातीलच नव्हे तर जगातील आदर्श विद्यार्थी झाले. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तो विद्यार्थी, जगातील आदर्श विद्यार्थी झाला. कारण, त्यांची शिक्षणाप्रती असणारी तळमळ! शिक्षणासाठी कोणतेही कष्ट सोचण्याची तयारी, ही तयारी त्यांना 'एक वर्ग बाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी' आणि ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, शाळेत प्यायला पाणीही मिळालं नाही त्याच विद्यार्थ्यांचा शाळेत गेल्याचा पहिला दिवस हा आज १०० वर्षानंतर त्याच राज्यातील सरकारला 'विद्यार्थी दिन 'म्हणून शाळांमधून साजरा करावा लागतो. हा त्याग फक्त बाबासाहेबाच करू शकतात.. परंतु, आजची परिस्थिती पाहता , आजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला इतका मोठा त्याग करण्याची, इतके कष्ट सोचण्याची, इतका त्रास सहन करण्याची गरज राहिलेली नाही, पण तरीही आज विद्यार्थ्यांची पावलं शाळेकडे वळत नाहीत, ते उच्च शिक्षणात टिकत नाहीत. त्या प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचा आयुष्यातील हा त्रास आणि 'वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी' आणि ज्याला शाळेच्या वर्गामध्येही घेतलं नाही; परंतु शाळेच्या बाहेर बसून शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचा सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो. हे काय साध्य झालं? तर त्या विद्यार्थ्यांनी आजन्म विद्यार्थी राहण्याचे घेतलेले व्रत! हे आजन्म विद्यार्थी राहणं प्रत्येकाला जमलं पाहिजे, तर तुम्ही आदर्श विद्यार्थी, यशस्वी माणूस होऊ शकता. बाबासाहेबांकडून आपणही शिकलं पाहिजे. आज बाबासाहेबांनी प्रत्येकाला शिकण्यासाठी देश -प्रदेशातील सगळी दारं खुली केली आहेत. मग आम्ही त्यांना अपेक्षित असणारा विद्यार्थी कधी होणार? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आम्ही शिकत राहिले पाहिजे. बाबासाहेबांप्रमाणे प्रत्येकाने आजन्म विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी झाले पाहिजे. *✍️-अजय भामरे* *कार्य संपादक:साप्ताहिक लेखन मंच* मोबाईल नंबर:८८३०३४३७३६


🖥️
🖲️
📲



🏫लेखन मंच
📚लेखन मंच
✍️लेखन मंच
🧠लेखन मंच
⭐लेखन मंच
लेखन मंच

> एक काळ होता... 🪔 > दिवाळीची सुट्टी म्हणजे फक्त मजा नाही, तर दिवाळीचा अभ्यास पण भेटायचा! समानार्थी शब्द - 100 विरुद्धार्थी शब्द - 100 म्हणी - 50 वाक्प्रचार - 100 पाढे 1 ते 30 पर्यंत पाठ शुद्धलेखन 10 पाने... "अभ्यास करा... म्हणून करा... आणि वही भरून काढा!" हे वाक्य ऐकलं की आजही शाळेचे दिवस आठवतात. तेव्हा राग यायचा, पण आज त्या दिवसांचीच जास्त आठवण येते. खरंय ना? ही पोस्ट तुमच्या शाळेच्या मित्राला नक्की पाठवा. ❤️

🏫नवीन समर्थ विद्यालय
📚 नवीन समर्थ विद्यालय
✍️ आजचा गृहपाठ
🧠नवीन समर्थ विद्यालय
⭐नवीन समर्थ विद्यालय
नवीन समर्थ विद्यालय

लवकरच tet चे नव्याने फॉर्म सुरु होतील... तयारीत असावे... 👍🏻 गणितीय सूत्रे पाचवी ते दहावी

10th Time table feb👇👇👇

SSC_FEB_MAR_2027_TIME_TABLE 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

चौथी-शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक ६१७

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र. ६१७ - नवीन प्रश्नपत्रिका

शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक ६१७

इयत्ता चौथी (4th Standard Scholarship Test)

एकूण प्रश्न: १०० | एकूण गुण: १०० | वेळ: १ तास ३० मिनिटे

विभाग १: मराठी (प्रश्न १ ते २५) — गुण २५
Q1. 'गाय गवत खाते' - या वाक्यातील कर्ता कोण?
Q2. 'सुंदर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q3. 'पुस्तक' चे अनेकवचन काय होईल?
Q4. 'नुकसान होणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
Q5. शुद्ध शब्द ओळखा:
Q6. 'मी उद्या गावाला जाईन' - हा वाक्याचा काळ कोणता?
Q7. 'हिमालय हा उंच पर्वत आहे' - या वाक्यातील विशेषण कोणते?
Q8. 'सूर्य' चा समानार्थी शब्द कोणता?
Q9. 'प्रयत्नांती परमेश्वर' या म्हणीचा अर्थ काय?
Q10. 'अंगाची लाकूड होणे' म्हणजे काय?
Q11. 'नदी वाहते' - या वाक्याचे अनेकवचनी रूप काय होईल?
Q12. 'शाळा' या शब्दाचे लिंग कोणते?
Q13. खालीलपैकी सर्वनाम कोणते?
Q14. स्वल्पविराम (,) हे चिन्ह कुठे वापरतात?
Q15. 'अहाहा! किती सुंदर फूल आहे हे!' - यात कोणते चिन्ह आले आहे?
Q16. 'गुलाब लाल आहे' - या वाक्यातील 'लाल' काय आहे?
Q17. 'आम्ही' हे कोणत्या पुरुषाचे सर्वनाम आहे?
Q18. 'धावणे' या क्रियापदाची धातू (मूळ शब्द) काय आहे?
Q19. चुकीची जोडी ओळखा:
Q20. 'दिवस' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q21. 'बैल' या शब्दाचे विरुद्धलिंगी रूप काय?
Q22. 'तोंडात मारणे' किंवा 'तोंड देणे' - संकटाचा सामना करणे या अर्थाचा वाक्प्रचार?
Q23. 'झाडांची गर्दी असलेली जागा' म्हणजे काय?
Q24. 'मी अभ्यास केला म्हणून पास झालो' - या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Q25. मराठी वर्णमालेत एकूण किती vowels (स्वर) मानले जातात? (पारंपारिक १४)
विभाग २: गणित (प्रश्न २६ ते ५०) — गुण २५
Q26. 7045 ही संख्या कशी वाचाल?
Q27. 3,892 मधील 8 ची स्थानिक किंमत किती?
Q28. 5432 + 1234 = ?
Q29. 8500 - 3200 = ?
Q30. 15 x 9 = ?
Q31. 108 ÷ 9 = ?
Q32. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q33. संख्याक्रम पूर्ण करा: 3, 6, 9, 12, ____ ?
Q34. 1 किलोमीटर = किती मीटर?
Q35. एका तासात किती सेकंद असतात?
Q36. चौरसाची बाजू 5 सेमी असल्यास त्याची परिमिती किती?
Q37. 2 तास 30 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे?
Q38. 500 रुपयांच्या नोटेची किंमत किती?
Q39. सर्वात लहान 2 अंकी सम संख्या कोणती?
Q40. 12, 15, 18, 21, ____ मालिका पूर्ण करा.
Q41. 8 चा पाढा: 8 x 6 = ?
Q42. 500 रुपयांतून 175 रुपये खर्च केले तर किती उरले?
Q43. घड्याळात 6:00 वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात कोणता कोन होईल? (किमान सरळ कोन)
Q44. अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलीटर?
Q45. 20, 40, 60, 80, ____ मालिका पूर्ण करा.
Q46. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते?
Q47. संख्या मालिका पूर्ण करा: 5, 10, 20, 40, ____ ?
Q48. एका वर्षात एकूण महिने किती असतात?
Q49. पाव किलो म्हणजे किती ग्रॅम?
Q50. 100 च्या पुढील सम संख्या कोणती?
विभाग ३: बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न ५१ ते ७५) — गुण २५
Q51. इंग्रजी वर्णमालेत A पासून Z कडे जाताना 10 वे अक्षर कोणते येते?
Q52. आज बुधवार असेल, तर 7 दिवसांनंतर कोणता वार असेल?
Q53. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा:
Q54. सूई : शिवणे :: कात्री : ?
Q55. संख्या मालिका पूर्ण करा: 2, 4, 8, 16, ____ ?
Q56. जर BAT = 23 (2+1+20), तर PEN = ? (16+5+14)
Q57. आरशात पाहिल्यास 'P' कसा दिसेल?
Q58. आई : मुलगी :: वडील : ?
Q59. 3, 6, 12, 24, ____ मालिका पूर्ण करा.
Q60. सांकेतिक भाषा: CAT = DBU, तर DOG = ?
Q61. एका झाडावर ५ पक्षी बसले आहेत. शिकारीने एकाला गोली मारली, तर झाडावर किती पक्षी उरतील? (आवाजाने बाकी उडून जातील)
Q62. कुत्रा : चार पाय :: साप : ?
Q63. चुकीचे पद ओळखा: 1, 4, 9, 16, 25, 35 (ऐवजी 36 हवे)
Q64. 'SCHOOL' या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द बनू शकत नाही?
Q65. जर आज सोमवार असेल तर 3 दिवसांनी कोणता वार येईल?
Q66. एका रांगेत पुढून रमेश १० वा आणि मागून १५ वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?
Q67. वीज : प्रकाश :: अग्னி : ?
Q68. मालिका पूर्ण करा: Z, X, V, T, ____ ? (दोन अक्षरे मागे)
Q69. थंडी : स्वेटर :: पाऊस : ?
Q70. संख्या मालिका पूर्ण करा: 50, 45, 40, 35, ____ ?
Q71. जर 'पाणी' ला 'दूध' म्हटले, 'दूध' ला 'साखर' म्हटले, तर आपण पिण्यासाठी काय वापरू?
Q72. ५ माकडांना ५ केळी खлуу लागतात तर एका माकडाला एक केळे खायला किती वेळ लागेल?
Q73. सूर्यास्ताच्या वेळी (संध्याकाळी) आपली सावली कोणत्या दिशेला पडेल?
Q74. संख्या मालिका: 2, 6, 12, 20, 30, ____ ?
Q75. इंग्रजी वर्णमालेतील शेवटून दुसरे अक्षर कोणते?
विभाग ४: इंग्रजी (English) (प्रश्न ७६ ते १००) — गुण २५
Q76. 'He _____ a good boy.' Fill in the blank.
Q77. 'Potato' is a _____.
Q78. Plural of 'Box' is _____.
Q79. Opposite word of 'Big' is _____.
Q80. 'We _____ playing cricket.'
Q81. Which of the following is a noun (नाम)?
Q82. 'Apple' starts with which letter?
Q83. 'He _____ a new bicycle.'
Q84. 'Fish swim in the _____.'
Q85. 'Dog' gives us _____. (বা सुरक्षेसाठी काय करतो)
Q86. Choose the correct spelling:
Q87. 'Sunday' comes before _____.
Q88. 'My mother is a _____.' (गृहिणी / शिक्षक)
Q89. What is the correct response to 'Thank you'?
Q90. 'Sun sets in the _____.'
Q91. 'Pen is in the _____.'
Q92. 'Five - Two = _____.'
Q93. 'Ball' rhymes with _____
Q94. 'I _____ a book every day.'
Q95. 'Ice' is in _____ state.
Q96. 'Good Morning' - हे अभिवादन कधी वापरतात?
Q97. 'I am sorry' चे योग्य उत्तर काय द्यााल?
Q98. How many days are there in a week?
Q99. 'Cow' is a _____ animal.
Q100. 'National Bird of India' is _____.

शैक्षणिक अपडेट्स आणि अशाच नवीन टेस्ट्स मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा:

इयत्ता चौथी WhatsApp ग्रुप जॉईन करा

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...