👩💻(अ) शिक्षकाचा वैयक्तिक विकास📲📚
💐 अभ्यासक्रम व परीक्षेचे नियोजन
👬 व्यक्तिमत्त्व
📚 ग्रंथ संपदा व उपयोग
👩💻लेखन व प्रकाशन
🏆 शैक्षणिक अर्हता वृद्धी
•कला जोपासना
> @@@ @ प्राप्त पुरस्कार
>शिक्षक प्रशिक्षण
(अ) शिक्षकाचा वैयक्तिक विकास
१) अभ्यासक्रम व परीक्षेचे नियोजन -
•वार्षिक घटक नियोजन तयार केले आहे.
•दैनिक पाठाचे टाचण नियमितपणे काढतात.
• अध्यापनपूर्व स्वयंअध्ययन करण्याची दक्षता घेतात.
२) व्यक्तिमत्त्व
📲 नियंत्रणाबाहेरील कारणामुळे होणारा अपवाद वगळता शाळेत वेळेपूर्वीच हजर असतात.
📚 वर्गाची / विषयाची पर्यायी व्यवस्था झाल्याची खात्री केल्याशिवाय किरकोळ अथवा अन्य रजेवर जात नाहीत.
🥎 वैयक्तिक वर्तन व कार्यशैलीच्या संदर्भात विदयार्थ्यांसमोर शिक्षक Role Model (आदर्शवत) आहेत.
🤠 नीटनेटके पोषाख व परिपूर्ण वैयक्तिक स्वच्छता राखतात.
😁 हसतमुख व प्रसन्न असतात.
☘️ दररोज योगा करतात अथवा व्यायाम करतात.
🌍 सर्वांशी प्रेमाने व नम्रतेने वागण्याची प्रवृत्ती आहे.
(अ) शिक्षकाचा वैयक्तिक विकास (चालू)
३) ग्रंथ संपदा व उपयोग -
📓आपले ज्ञान अद्ययावत राहावे, यासाठी नित्यनेमाने ग्रंथ वाचन करतात व त्याची टिपणे ठेवतात.
📚स्वतःचे किमान १०० ग्रंथांचे ग्रंथालय आहे.
४) लेखन व प्रकाशन
🥇नियमिपणे लेखन करतात / किमान दैनंदिनी लिहिता / वृत्तपत्रातील लेख लिहितात / मुलांसाठी गोष्टी, कविता वा नाट्य लिहितात.
🥇एक किंवा त्यापेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
🥇केंद्र अथवा गटसंमेलनात एखादया पुस्तकाचे एकदा तरी परीक्षण सादर केले आहे.
५) शैक्षणिक वृद्धी
📝सेवेच्या सुरुवातीला असलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये एखादी पदवी परिक्षा उत्तीर्ण करून भर टाकली आहे.
६) कला जोपासना
🧑🎤मुलांना आवडेल अशा पद्धतीने गायन करू शकतात.
🎷एखादे वादय वाजवू शकतात.
👬कविता रचू शकतात.
👬गतवर्षी वा या वर्षी एखादया नाटकात भाग घेतला.
७) प्राप्त पुरस्कार
🏆गाव, पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर बक्षीस अथवा पुरस्कार मिळाला.
🏆राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराकरिता शिफारस झाली / पुरस्कार मिळाला.
८) शिक्षक प्रशिक्षण
👩💻प्रत्येक प्रशिक्षणास उपस्थित राहतात.
👩💻प्रशिक्षणात अवगत केलेल्या नवीन तंत्राचा अध्यापनात अगत्याने वापर करतात.
