गाण्यातून शिका अंक
दहा बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
दहातून एक गेली, राहिल्या ९
नऊ बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
नवातून एक गेली, राहिल्या ८
आठ बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
आठातून एक गेली, राहिल्या ७
सात बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
सातातून एक गेली, राहिल्या ६
सहा बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
सहातून एक गेली, राहिल्या ५
पाच बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
पाचातून एक गेली, राहिल्या ४
चार बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
चारातून एक गेली राहिल्या ३
तीन बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
तीन बाई चिमण्या, राहिल्या २
दोन बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्
दोनातून एक गेली, राहिली 1
एक बाई चिमणी. भारी चिव, चिव्
एक चिमणी उडून गेली, राहिल्या 0 (भोपळा) .
2)एक घंटा शाळेला
एक घंटा शाळेला
दोन चाके गाडीला
तीन चाके पंख्याला
चार कोपरे पाटीला
पाच बोटे हाताला
सहा कोन षटकोनाला
सात ज्योती समईला
आठ काड्या छत्रीला
नऊ सुट्टे मोजायला
दहा मणी माळेला
3)एक, दोन, तीन, चार
एक, दोन, तीन, चार
रान झाले हिरवेगार
पाच, सहा, सात, आठ,
तळे भरले काठोकाठ
नऊ, दहा, अकरा, बारा
मंद मंद वाहे वारा
तेरा, चौदा, पंधरा, सोळा
कमले डुलती, तुम्ही डोला
सतरा, अठरा, एकोणीस, वीस, वाऱ्यावरून आले पीस
पीस आमचे मोराचे,
रान पिकले बोराचे
