रिकाम्या जागा भरा.(४०६)
१) त्यांना.............. नावाची मुलगी होती.
2) छोटा भाऊ पिंटू............ जाणार होता.
3) गावात..........च्या पुढेचे वर्ग नव्हते.
४) बबली गावच्या............ मुलगी होती.
५) बबलीसारख.............ला ही, आपण पुढे शिकावं अस वाटायचं.
६) स्नेहा अत्यंत............. मुलगी.
७).............. विचारमग्न झाला होता.
८) तालुक्याच्या पोलिस स्टेशनलाही.............. म्हणून महिलाच आहे.
९) दादाला सांग ना ओ माय, माल............मा जावू द्या.
१०) गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं..............ला अवघड वाटत होत.
११) एका कोपऱ्यात बसून.................
रडत असलेली सुलभाला दिसली.
📓📙📘📚📕📓📙📘📚📓📙📘📕📲
* पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) सखारामच्या पत्नीचे नाव काय होते ?
उत्तर :
२) सखारामच्या मुलीचे नाव काय होते ?
उत्तरः
३) स्नेहाच्या गावात कितवी पर्यंत शाळा होती?
उत्तरः
४) स्नेहाच्या मैत्रिनीचे नाव काय होते ?
उत्तरः
५) स्नेहाच्या भावाचे नाव काय होते ?
उत्तरः
६) बबली कोणाची मुलगी होती ?
उत्तर :
७) सरपंचाने बबलीला कोणत्या इयत्तेत पाठवले होते?
उत्तरः
८) मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का आले होते ?
उत्तरः
९) स्नेहाला अतिशय आनंद का झाला ?
उत्तरः
१०) स्नेहाने कोणती परीक्षा दिली होती?
उत्तर :
📓📙📘📕📚📓📙📘📕📚📓📙📘📕
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
१) स्नेहा, तुले चवथीलोंग शिकाड
२) मन्हंबी नाव टाका पाचीमा. ओ माय माले पुढे शिकान शे.
३) अरे सखा, तुन्ही पोरगी एवढीच मन्ही बबली शे.
४) " अहो सखाराम, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे ?
५)
प्रश्न २ .तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा .
१)मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले ?
उत्तर - तुमची लेक हुशार आहे .तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा . स्वावलंबी बनवू द्या .असे मुख्याध्यापक सखाराम म्हणाले .
२)सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले ?
उत्तर - तुझी मुलगी माझ्या मुली एवढीच आहे
मी तिला पाचवी इयत्तेत पाठवणार आहे आडगाव ची शाळा इथून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल .
३)स्नेहाची आई चिंतेत का पडली ?
उत्तर - शेतातून घरी परत आल्यावर स्नेहाच्या आईने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती .रडून रडून तिचे डोळे सुजले होते म्हणून तिची आई चिंतेत पडली .
४)सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला ?
उत्तर -स्नेहा चे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस-रात्र कष्ट करेन पण माझ्या मुलीला मी शिकवेनच असा निर्णय घेतला .
प्रश्न ३ .पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा .
१)चिंतेत पडणे - काळजीत पडणे .
वाक्य - आपल्या मुलीला आजारी असलेली पाहून राधा बाई चिंतेंत पडल्या .
२)गहिवरून येणे - मन दाटून येणे .
वाक्य - सीमाला माहेरून परत सासरी जाताना गहिवरून आले .
३)डोळे पाणावणे - डोळ्यांत अश्रू दाटणे .
वाक्य -पहिल्या दिवशी शाळेत जाताना सोहम चे डोळे पाणावले .
४)अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे .
वाक्य - छोट्याशा सोनूला पोहताना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले .
५)पोटतिडकीने बोलणे - मनापासून कळकळीने बोलणे .
वाक्य - किसनराव आपल्या मुलांना शेती विषयी सांगताना पोटतिडकीने सांगू लागले .
६)रक्ताचे पाणी करणे - अतिशय कष्ट करणे .
वाक्य - सुभानरावांनीं रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवले .
