⭕ स्वातंत्र्य दिनानिमित्त *संविधान प्रेमी* आयोजित *उपक्रम*
♦️ *मी संविधान प्रेमी*♦️
🗓️ *दिनांक:* गुरुवार, *15 ऑगस्ट*
📱 *मोबाईल नं .* : 9423507864
_मित्रांनो, येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! चला तर, या वेळी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करूयात आपल्या संविधानाच्या मूल्यांचा जागर करत. आपल्या संविधानाला स्वातंत्र्य लढ्याचा खूप मोठा वारसा लाभला आहे. संविधानात असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्य आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात पाहायला मिळतात. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील सर्व जाती-धर्माची, विविध भाषा बोलणारी, लहान-थोर, स्त्री-पुरुष सर्व जण एकत्र मिळून लढले. आजही हि एकीची भावना जोपासत आपण संविधानाच्या मूल्यांवर देश घडवण्याचा प्रयत्न करूयात._
👉🏿 *अभियानामध्ये आपण काय करू शकतो*
📍 आपण खाली दिलेल्या ओळींचे प्लाकार्ड बनवून त्या प्लाकार्ड सोबत फोटो काढू शकतो आणि आपल्या व्हाट्सअँप स्टेटस, फेसबुक , इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर टाकू शकतो
* संविधानाने दिले काय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
* संविधानाची कास धरू, विषमता नष्ट करू
* सर्वांना देई दर्जा समान, संविधानाचे काम महान
* संविधानाने दिला मान, स्त्री पुरुष एक समान
* संविधान सर्वांसाठी , हक्कासाठी न्यायासाठी
📍 संविधाना विषयी किंवा संविधानातील विचारला धरून कविता, गाणी किंवा तुमचे विचार छोट्या विडिओमध्ये मांडू शकता
👉🏿 कन्टेन्ट मध्ये *#मी_संविधान_प्रेमी* हा हॅशटॅग नक्की वापरा
👉🏿 आम्हाला तुमचे फोटो, व्हिडीओ मेसेज मध्ये दिलेल्या नंबरवर नक्की पाठवा
आम्ही "संविधान प्रेमी" मंचाच्या माध्यामातून स्वेच्छेने आणि सर्जनशील पद्धतीने संविधान लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. आपणही यामध्ये सामील व्हावं असे आवाहन. आमच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व संविधान प्रेमी मंचाचा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्मवर रजिस्टर करा.
📌 *रजिस्टर लिंक:* https://tiny.cc/SamvidhanPremi
📓👨💻📕📓📙📕📚📓📚📙📕📓📙📘📕📲
