गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

इ. ४थी कार्यानुभव -पूरक उपक्रम2

 

मैदानावरील कागद, पाने, दगड इत्यादी कचरा उचलून एका ठिकाणी जमा करावा. तो कचरापेटीतच टाकावा. शाळेच्या दारासमोर व शक्य असल्यास मैदानाव पाणी शिंपडावे, फुलझाडांच्या कुंड्या व्यवस्थित ठेवाव्या. रंगीत पताका नक्षीदार कापून पडवीत (ओसरी किंवा सोपा) चिकटवाव्या. शाळेच्या भिंतींवर योग्य ठिकाणी आकर्षक चित्रे, फोटो, तक्ते, नकाशे, तसेच घोषवाक्ये व सुविचार लावावे. वर्गासमोर, कार्यालयासमोर सुरेख रांगोळी काढावी. वातावरण प्रसन्न ठेवावे. या सर्व कृतींचे नियोज करावे व प्रत्येक गटास काम वाटून दयावे.

स्वाध्याय

(१) परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

(२) वर्ग सजावटीसाठी कोणत्या साहित्यांचा वापर करावा याची यादी करा.

(३) शालेय वातावरण प्रसन्न राहावे यासाठी काय करावे?

पूरक उपक्रम

(१) घोषवाक्ये व सुविचारांचा संग्रह करा. (२) मणी, शंख, शिंपले, टिकल्या, बांगडीचे तुकडे, यांद्वारे सुशोभन करा. (३) पाना-फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना करा. (४) सोप्या व आकर्षक रांगोळ्या काढा.

१६

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...