असं कसं रे देवा
मला सगळंच अर्धवट दिलंस
एका गोष्टीतही मला पूर्ण
पारंगत नाही केलंस ll १ ll
ना रंग ना रूप
बुध्दी तरी भरपूर द्यायची
आई- वडीलांच छत्र सुध्दा
गरज होती का लवकर न्यायची ll २ ll
माझं प्रेमाचं माणूस तरी
मला कायमचं माझं म्हणून द्यायचस
ते सुद्धा अर्धवट देऊन
कळत नाही तू काय साध्य केलंस ll ३ ll
गत जन्माच्या पापांची बहुतेक
शिक्षा तू देत असशील
पण खरंच एवढी पापं केली होती का मी
मला खरं कधी सांगशील ll ४ ll
एवढं सगळं असूनही
तू मला हारू नाही दिलंस
माझा हात घट्ट धरून मला
प्रत्येक वादळानंतर उभं केलंस ll ५ ll
माझ्या प्रारब्धाचा हिशोब देवा
याच जन्मात फेडून घे
आणि हिशोब पूर्ण झाल्यावर
लगेच तुझ्याकडे बोलावून घे
ll ६ ll
एकच मागते तुझ्याकडे
ते मला देशील का
माझ्या मुलांची ओंजळ मात्र
कायम सुखाने भरशील का
ll ७ ll
पल्लवी मेहेंदळे
संकलक
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
