रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

इयत्ता दुसरी - श्रवण १)सोपी पण अपरिचित गाणी, कविता आणि कथा समजपूर्वक ऐकता येणे




Online study with PRASHANT PENDHE इयत्ता २रीच्या मातृभाषा या विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी  क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये इ २री च्या मातृभाषा या विषयाच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे.


या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढलेले आहेत. यातील प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत.


शाळा पातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग व शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत केला आहे. याशिवाय प्रत्येक क्षमतेसाठी अनेक समांतर रचना काठिण्य प्रश्नसंच देण्यात आले आहेत. या समांतर प्रश्नसंचातील उपप्रश्नांची रचना काठीण्य पातळी पाहूनच तयार केली आहे....

📲📲🙏👨‍💻👬🙏🙏

श्री.प्रशांत प्रल्हाद पेंधे 

( जि.प.शाळा,सपाटपाडा)

ता.शहापूर जि.ठाणे

सोपी पण अपरिचित गाणी, कविता आणि कथा समजपूर्वक ऐकता येणे

शिक्षकांसाठी सूचना -

या क्षमतेअंतर्गत सोपी पण अपरिचित असणारी गाणी, कविता आणि कथा समजपूर्वक ऐकणे हा भाग तपासावयाचा आहे. शिक्षकांनी त्यासाठी ५ ते १० विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना सोपी पण अपरिचित गाणी ऐकवावीत त्यावर आधारित ५ प्रश्न विचारून प्रतिसादाच्या नोंदी प्रपत्रात नोंदवाव्यात.


गाणे -


'या बाई या.'


या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या. ऊन पडले, पानफूल दिसे कसे गोडगोडुले. गोडगोडुले, मोतियाचे दाणे कोणी खाली पाडिले ? रान हालले, पहाटेला शुकदेव गाणे बोलले.


संच - १


गाणे ऐकून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.


अ) फुले वेचण्यासाठी कोणाला बोलावले आहे ?


ब) झाड कोणत्या फुलाचे आहे ?


क) फुले कोठे पडली आहेत ?


ड) पानफूल कसे दिसत आहे ?


इ) शुकदेव केव्हा गाणे बोलले ?


🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

कविता - इंजिनदादा, इंजिनदादा


इंजिनदादा, इंजिनदादा, काय करता ? 

डबे मी जोडतो, तुम्हाला घेतो 

गावाला जातो नव्या नव्या.


इंजिनदादा, इंजिनदादा, काय करता ?

 कोळसा मी खातो, पाणी मी पितो 

गावाला जातो नव्या नव्या.


इंजिनदादा, इंजिनदादा, काय करता ? 

निशाण मी बघतो, शिटी मी फुंकतो 

गावाला जातो नव्या नव्या.


इंजिनदादा, इंजिनदादा, काय करता ?

 झुक झुक करतो, धावायला लागतो 

गावाला जातो नव्या नव्या.


संच -१


उत्तरे सांगा.


अ) इंजिनदादा आपल्याला कोठे नेतो ?


ब) इंजिनदादा काय खातो ?


क) इंजिनदादा काय बघतो ?


ड) इंजिनदादा काय फुंकतो ?


इ) धावताना इंजिनदादा कोणता आवाज करतो ?


शिक्षकांसाठी सूचना -


पुढील कथा मुलांना ऐकवून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे विचारा.


कथा


एक कोंबडा आणि एक कुत्रा जंगलातून प्रवास करीत होते. रात्र झाल्यावर कोंबडा एका झाडावर चढून बसला आणि कुत्रा बुंध्यापाशी झोपी गेला. सकाळी उठल्यावर कोंबडा जोरात आरवला. कोंबड्याचे आरवणे ऐकून एक कोल्हा तिथे आला; आणि त्याला म्हणाला, "अरे ! तुझा आवाज किती गोड आहे. तुझं गाणं ऐकून तुला अगदी कडकडून भेटावंसं वाटतं." तेव्हा त्याच्या बोलण्यातली लबाडी लक्षात घेऊन कोंबडा म्हणाला, "मित्रा, खाली जो पहारेकरी झोपला आहे त्याला जागा करून दरवाजा उघडायला सांग. म्हणजे मी खाली येतो." हे बोलणे खरे वाटून कोल्ह्याने कुत्र्यास उठवले. कुत्रा जागा झाला आणि ताबडतोब त्याने कोल्ह्यास पळवून लावले.


संच-१


खालील प्रश्नांची उत्तरे दया.


अ) जंगलातून प्रवास कोण करत होते ?


ब) रात्र झाल्यावर कोंबडा कोठे बसला ?


क) कुत्रा कोठे झोपला ?


ड) कोंबडा केव्हा आरवला ?


ई) कोंबड्याचे आरवणे ऐकून तेथे कोण आले ?


फ) कोल्ह्याने कोणास उठवले ?


ग) कोल्ह्याला कोणी पळवून लावले ?


*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/LB0eX9efiMj7zh7yq9U17k

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*


*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻





ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...