Online study with PRASHANT PENDHE या इ १ली मातृभाषा विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे यामध्ये इ १ली मातृभाषेच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे
या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढले आहेत. तसेच हे प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत
शाळापातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत करण्यात आला आहे याशिवाय विविध प्रश्नांसाठी समांतर प्रश्नसंच देण्यात आले असून या सर्व प्रश्नसंचांतील उपप्रश्नांची रचना काठिण्यपातळीनुसार केली आहे चाचणी सोडविताना विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा, बुद्धीला चालना मिळावी या हेतूने या प्रश्नपेढीत पाठ्यपुस्तकाबाहेरील साहित्याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शिक्षकांनी शालेय पातळीवर क्षमता चाचणी तयार करताना पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारे, बडबडगीते, गाणी, कविता, कथा यांचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे
🙋🏻♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt
*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
क्षमता-१.सोपी, परिचित व आवडीची बडबडगीते, कविता व गोष्टी समजपूर्वक ऐकता येणे.
शिक्षकांसाठी
👇👇👇👇📲👇👇👇👇
सूचना या क्षमतेअंतर्गत सोपी, परिचित व आवडीची बडबडगीते, कविता व गोष्टी समजपूर्वक ऐकणे हा भाग तपासावयाचा आहे. त्यासाठी शिक्षकांनी ५ ते १० विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना सोपे व परिचित गीत ऐकवावे. त्यावर आधारित
५ प्रश्न विचारून प्रतिसादाच्या नोंदी प्रपत्रात घ्याव्यात
बडबडगीत
ससा ससा दिसतो कसा ?
कापूस पिंजून ठेवलाय जसा !
लाल लाल डोळे छान
लहान शेपूट मोठे कान
पाला खाऊन फुगतो टुम
चाहूल लागताच पळतो धुम !
संच - १ प्रश्नांची उत्तरे सांगा.
१. ससा कसा दिसतो ?
२. सशाचे डोळे कसे आहेत ?
३. सशाचे शेपूट कसे आहे ?
४. सशाचे कान कसे आहेत ?
५. ससा काय खातो ?
👇 *GROUP add* 👇
*`राज्यस्तरीय महागृप`*
https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t
२)बडबडगीत
चिमुकलं पाखरू, अंगणात आलं.
दाणे टिपून, नाचून गेलं ।
चिमुकलं पाखरू, रानात आलं
झऱ्याचं पाणी, पिऊन गेलं ।
चिमुकलं पाखरू, घरट्यात आलं
अंधार पडताच, झोपी गेलं ।
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा.
१. पाखरू कसे आहे ?
२. अंगणात कोण आले ?
३. पाखराने अंगणात काय खाल्ले ?
४. पाखरू पाणी कोठे प्याले ?
५. पाखरू कधी झोपले ?
🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*--🇷🇲🇩🅿️🅿️--*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
संच ३
शिक्षकांसाठी सूचना
👇👇👇
गोष्ट - ससा आणि कासव
मुद्दे -शिक्षकांनी दिलेल्या मुद्द्यांनुसार गोष्ट ऐकवावी.
जंगल-
ससा कासवाची भेट-
पळण्याची शर्यत-
सशाचे धावणे-
कासवाचे हळू चालणे-
ससा झोपी गेला-
कासव चालत राहिले -कासवाने शर्यंत जिंकली.
प्रश्नांची उत्तरे सांगा.
१. ससा कोठे राहत होता ?
२. कासव कोठे राहत होते ?
३. दोघांत कोणती शर्यत लागली ?
४. ससा कसा धावतो ?
५. कासव कसे चालते ?
६. सशाने काय ठरविले ?
७. ससा कोठे झोपला ?
८. कासवाने काय केले ?
९. शर्यत कोणी जिंकली ?
