महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ७०८, आरबी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०,
ईमेल: socialsciencedept@maa.ac.in
संपर्क क्रमांक (०२०) २४४७८१२२
जा.क्र.राशैसंप्रपम/सा.शा./सं.दि./२०२५-२६/प्रति,
दि. १०/११/२०२५
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्वे)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्च)
५. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा.(सर्व)
विषय- २६ नोव्हेंबर "संविधान दिन" साजरा करणेबाबत...
संदर्भ: १. महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन सामंजस्य करार दि. २८ एप्रिल, २०२५
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन (संविधान दिवस) म्हणून साजरा केला जातो, जो भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत केले य दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारताचे संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ स्तंभ असून त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मानवमूल्ये अंतर्भूत आहेत. संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, कारण या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखणे.
विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शांतिलाल मुथ्या फाऊंडेशनसोबत मिळून-मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभरात राबविण्यासाठी सामंजस्य करार केला असून पुढील ५ वर्षांमध्ये राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये जो मूल्याधारित शिक्षणाचा प्रयत्न केला जातो, त्याला संविधान दिनाच्या उपक्रमांद्वारे अधिक बळकटी मिळते. या दिवशी घेण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे आत्मसात आणि आचरण करण्याची प्रत्यक्ष संघी देतात, ज्यामुळे मूल्यवर्धनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.
तदनुषंगाने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे
SCERT 500/103/2025-SOCIAL SCI
1/1533774/2025
महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील, अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस ठरेल.
१) उपक्रमाचे नावः संविधान दिन प्रभात फेरी
उद्दिष्टेः- १) विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे,
२) नागरिक म्हणून कर्तव्यभावना विकसित करणे.
३) समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजवणी:-
विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक तयार करावेत.
शाळेपासून गाव किया परिसरात प्रभात फेरी काढावी.
फेरीदरम्यान घोषवाक्ये, देशभक्तीपर गीते सादर करावीत.
२) उपक्रमाचे नावः संविधान व्याख्यानमाला / सेमिनार
उद्दिष्टेः- १) विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे,
२) संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देणे,
३) विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासारखठी प्रेरित करणे,
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधान अभ्यासक, प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे,
विद्यार्थ्यांच्या प्रोत्तर सत्राची व्यवस्था करावी,
३) उपक्रमाचे नाव:- संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा
व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र घ्यावे.
प्रद्दिष्टेः १॥ विद्याथ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे.
२) संविधानाच्या मूल्यांबद्दल कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे.
३) दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः
स्पर्धेचे विषय ठरवावेत (उदा. "आपले संविधान आपला अभिमान").
आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी.
४) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition)
निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत.
उद्दिष्टेः १) विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.
👇👇👇👨💻👇👇👇




