शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

TET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२५


प्रसिद्धी निवेदन


शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते. तरी परीक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार/विद्यार्थी सर्वस्वी जवाबदार असतील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.


(अनुरावा ओक)


आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४


स्थळ : पुणे


दिनांक : ०६/११/२०२५



ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...