सध्या शिक्षकांचे पडलेले गट व त्यांचे उपगट...😃🤩
*1) TET पास* *2) TET (CTET) निकालाच्या प्रतीक्षेत असलेले* *3) TET /CTET नसलेले..*
👇👇📚📚📚
*1) जे TET पास आहेत त्यांच्यातही 3 उपगट आहेत..*
*_१.पेपर 1 पास असलेले_*
*_२.पेपर 2 पास असलेले_*
*_३.पेपर 1 व 2 दोन्ही पास असलेले._*
*_१.पेपर 1 पास असलेले_*
जे पेपर 1 पास आहेत , त्यांना वाटतंय की प्रमोशन कोणतेही असो, आमचाही विचार व्हावाच.. कारण पत्रात फक्त TET पात्रता म्हटलंय, 1 किंवा 2 चा उल्लेख नाहीय, म्हणून कुणी काहीपण नियम सांगू नका.._😄
*_२.पेपर 2 पास असलेले_*
जे पेपर 2 पास आहेत त्यांना वाटतं , की मोठ्या पदांसाठी (केप्र/वि. अ.) केवळ आम्हीच पात्र आहोत, तिथे TET 1 वाल्यांचा संबंध नाही.._😂
*_३.पेपर 1 व 2 दोन्ही पास असलेले._*
तर जे दोन्ही पेपर पास आहेत त्यांना वाटतंय की खरे वारसदार आम्हीच, कारण आम्ही नोकरी वाचवण्यासाठीची व प्रमोशनसाठी ची दोन्ही पेपर पास केलेय..😄_
तथापि वरील तिघांत कितीजरी मतभेत असले तरी या तिघांना वाटतं की आपलंच सरकार बसावं, अर्थात प्रमोशन प्रक्रिया CTET निकाल लागण्यापूर्वीच घ्यावी.. जेणेकरून आम्हाला ते स्पर्धक राहणार नाहीत..
आता दुसरा मुख्य गट आहे👇🏻
*2)CTET निकालाच्या प्रतीक्षेत असलेले..*
हा गट म्हणतोय की तुम्ही (नोव्हेंबर-25 , TET वाले) स्वतःला हुशार समजता का.? एक परीक्षा लवकर पास केली म्हणून उडू नका.. 😄 आम्हालाही येऊ द्या सोबत.. आम्हीही CTET पास होतोय काही दिवसात.. सरकारने आम्हाला वेळेवर सांगितलेच नव्हते की प्रमोशन ला TET लागेल म्हणून.. त्यामुळे किमान 1 महिना तरी थांबा आमच्यासाठी..
तर शेवटचा मुख्य गट..👇🏻
*3) TET नसलेले किंवा CTET परीक्षाही न दिलेले..*
या गटाला वाटतंय की 2 वर्ष मुदत देऊन मग प्रमोशन करा, किंवा दोन वर्षानंतर प्रमोशन करा.. असं सिनियरीटी डावलून प्रमोशन करणे योग्य नाहीय..
या TET ने असा सगळा गुंता करून ठेवलाय.. 😃
