" alt="ब्लॉग लोगो">

बुधवार, २९ जुलै, २०२६

गुरू पौर्णिमा-संदेश

 ✨  *गुरू पौर्णिमा*✨


'गुरुविण न मिळे ज्ञान,'

ज्ञानाविण जगी न होई सन्मान,

जीवन भवसागर तराया,

चला वंदूया🙏🏻 गुरुराया,


 `आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे`. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपण आपल्याला ज्ञान, जिज्ञासा, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान व कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आज सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असत. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.


*शिक्षक हा समाजाचा आरसा असतो.* अज्ञानी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यांमधील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणाना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तमप्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरत पणे कार्य करत असतात.आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरत असतो,त्यावेळी शिक्षकांना  होणारा आनंद कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त असतो.


शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. 


गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर उत्तुंग यशाचा 🏆✨आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. 


यासाठीच गुरू पौर्णिमा निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करायला हवा.


`_मुलांना शिकवता शिकवता वर्षानुवर्षे शिक्षक सुद्धा काही नवनवीन गोष्टी शिकत असतात._` शेकडो मुलं हाताखालून जातात तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे, वर्तनाचे अनेक पैलू समजत जातात. हे शिकताना दरवर्षी शिक्षक नवा झालेला असतो, मागच्या वर्षीचा शिक्षक पुढच्या वर्षी आणखी विचारी आणि समृद्ध झालेला असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं हे तो जाणतो, *_त्यामुळे वर्गातल्या सर्व मुलांना एकाच चमच्याने घास भरवण्याचा तो हट्ट करत नाही._*

बराच काळ एकमेकांसोबत राहून शिक्षक आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं, मुलं शिक्षकाला सरावतात आणि शिक्षकाला मुलं कळायला लागतात.

*झाडावरच्या सर्व कळ्या एकाचवेळी उमलत नाहीत, तशी सगळी मुलं कितीही नीट शिकवलं तरी एकाचवेळी प्रगत होत नाहीत, हे शिक्षकाला माहिती असतं. एकाच वर्गात राहूनही मुलांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या गतीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्याला बरोबर कळतं.*

मुलं घरात पालकांशी जितकी बोलत नसतील तितकं वर्गात शिक्षकाशी बोलतात, आपलं सुखदुःख त्याच्याशी वाटून घेतात. मुलांना काय आवडतं, त्यांना कोणत्या गोष्टींनी असुरक्षित वाटतं, त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे आणि त्यांना काय पुरवलं म्हणजे ती योग्य रीतीने घडू शकतील याचा चांगला अंदाज असतो शिक्षकाला. 

हे सगळं काम शाळेत हळूहळू घडत राहतं. विद्यार्थी म्हणजे कंपनी प्रॉडक्ट नसतात, मशीनमध्ये घातले की सगळेच एका छापाचे होऊन बाहेर पडतील. शिकणारा व शिकवणारा दोन्ही मानवी घटक, माणसांना वेगवेगळा स्वभाव असतो, क्षमता असतात आणि परिस्थिती असते. प्रत्येकजण वेगळ्या तऱ्हेने घडतो.

या सगळया गोष्टींशी जमवून घेत शिक्षक आपलं काम पुढे नेत असतो. शिक्षकांचं काम हे मानसिक, बौद्धिक स्वरूपाचं असतं, त्यात कंटाळा आणि थकवा या गोष्टी अधूनमधून डोकावणं अगदी साहजिकच आहे. बौद्धिक काम लवकर थकवून टाकतं. तरीदेखील मागिल एक महिन्याच्या कालावधीत प्रत्येक विद्यार्थी केंद्रित नियोजन करून अध्यापन सुरु असल्याने सर्वच पालक  मुलांची प्रगती पाहून समाधान व आनंद व्यक्त कराल , यातून आम्ही योग्य दिशेने काम करत असल्याचे समाधान मिळेल याची खात्री आहे.


*घरचा अभ्यास व परिपाठ परिवारातील सर्व शिक्षकांना👩🏻‍🏫👨‍🏫  गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा.!!*



🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...