" alt="ब्लॉग लोगो">

सोमवार, २० जुलै, २०२६

TET संदर्भात निर्णय.....

 कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET बाबत अन्य राज्यात घेतलेल्या निर्णयास अनुसरून महाराष्ट्रात सर्वांना न्याय मिळेल अशाप्रकारे आयोजन केले जाईल.

*मा. मंत्री: शालेय शिक्षण ना. दादाजी भुसे साहेब* यांचेसह शिक्षक संघटना बैठकीत शासनाचा प्रस्ताव.

   पदोन्नती बाबत नागपूर खंडपीठाचे निवाड्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी शासन सकारात्मक. पदोन्नतीच्या दिवसांपर्यंत TET उत्तीर्ण शिक्षकांना संधी दिली जाईल असा शासनाचा प्रस्ताव आहे. 

मात्र संघटनांनी कोल्हापूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत TET ची अट घालून पदोन्नती करावी असा आग्रह धरला असता - सदर निर्णय व मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेऊ अशी शासनाची ठाम भूमिका आहे.

BLO कामे आणि सध्या सुरू असलेली कारवाई, FIR बाबत *मा. मंत्री : महसूल ना. बावनकुळे साहेब* यांचेकडे पुढील सप्ताहात बैठक घेऊन त्यांचेकडून शिक्षकांना पुढे BLO मधून वगळणे आणि कारवाई रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील असे मा. मंत्री महोदयांनी सांगितले.

संचमान्यता प्रकरणी शिक्षण विभाग नवीन प्रस्ताव तयार करत असून त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

सर्व विषय पदवीधर शिक्षकांचे वेतनश्रेणी संबंधाने अनुकूल प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांचे मंजुरीपश्चातच निर्णय होईल असे *मा. प्रधान सचिव : शालेय शिक्षण श्री. रणजितसिंह देओल* यांनी सांगितले.

पवित्र पोर्टलने भरती होण्यापूर्वी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबविणेसंबंधाने शिक्षण विभागाने सकारात्मकता दर्शविली. मात्र याबाबतची कार्यवाही ग्राम विकास विभागाने करायची असल्याने त्यांचे सोबत विभागीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे मा. मंत्री महोदयांनी सांगितले.

९ जुलै च्या रजा आंदोलनाच्या वेतन कपातीबाबत मा. मुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.

शिक्षण सेवक सेवा कालावधी, माध्यमिक चे टप्पा अनुदान याबाबत शासन नंतर बैठक घेऊन निर्णय घेतील असे मंत्री महोदयांनी सांगितले.

  *एकंदरीत बैठकीतून पूर्ण समाधान झाले नाही. संमिश्र यशाची शक्यता आहे.*

जॉईन TET ग्रुप 👇👇👇

https://chat.whatsapp.com/HVBJxApbtJq4P9ZMvJOURG?s=cl&p=a&ilr=1


   बैठकीत मा. आमदार सुधाकरराव अडबाले, मा. आमदार ज्ञानेश्वरराव म्हात्रे, मा. आमदार विक्रमजी काळे यांचेसह राज्य शिक्षण आयुक्त मा. सचिन्द्र प्रतापसिंग साहेब, प्राथमिक शिक्षण संचालक मा. शरद गोसावी साहेब, माध्यमिक शिक्षण संचालक मा. डॉ. महेश पालकर साहेब, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मा. आबासाहेब कवळे, ग्राम विकास विभागाच्या उपसचिव, SCERT चे सहसंचालक मा. पानझडे साहेब उपस्थित होते. 

   शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे श्री‌. केशवराव जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे, मध्यवर्तीचे श्री. राजेश सुर्वे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते मा. उदयराव शिंदे, राज्य उपाध्यक्ष मा. आनंदा कांदळकर, राज्य सरचिटणीस मा. राजन कोरगावकर, राज्य कार्यालयीन चिटणीस मा. किशोर पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य मा. सचिन मदने सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...