गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

दैनंदिन पाठ टाचण 10 ऑक्टो ते 15 October

 


चित्रकला पेपर 1ली ते 4थी

 

दिवाळीसाठी खास रॉकेट तोरण सोपे कार्यानुभव

 



https://youtu.be/ytJdixbadfo

*दिवाळीसाठी खास रॉकेट तोरण सोपे कार्यानुभव*

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कमळ फुल तयार करणे 🌼🌷🏵️

 





https://youtu.be/YtzVuDjR6F0

*सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कमळ फुल तयार करता येईल. दिवाळी सजावटीसाठी अतिशय उपयुक्त. इयत्ता पहिली चे विद्यार्थी ही सहज करू शकतील अशी कलाकृती*

परीक्षेचे नवीन वेळापत्रक, परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

 



*🎯 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2025 जाहिरात प्रसिद्ध, 2410 पदांसाठी होणार केंद्र प्रमुख परीक्षा, जाणून घ्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक, परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम*


*पुणे :* महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. 01/12/2025 ते 05/12/2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून 2410 पदांची भरती विविध जिल्हा परिषदेत भरण्यात येणार आहेत.


📌 *समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) वेतनश्रेणी :- एस १५ : ४१८००-१३२३००*


*📌शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-*

     शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अर्हता अनिवार्य असेल.

1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

2. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

3. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. 

4. दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.

5. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.

*6. वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.*


*📌निवड प्रक्रिया स्वरूप:-*

      लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

*परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-*

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

*📌परीक्षेचे शुल्क :*

१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. 950/-

२. दिव्यांग उमेदवारः रु. 850/-


*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-*

✅२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी

         *दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*

✅ नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज

     *दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*

✅ऑनलाईन परीक्षा दिनांक

    *दि. ०१/१२/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५*


*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*

 ✅ केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

 *✅ पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*

     *📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*

        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*

*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*

3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)

4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते

 *📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम* 

1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण

2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण

3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण

4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण

5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण

6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण

7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण

              *एकूण - 100 गुण* 

*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.

2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स

3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)

4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ 

5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

          *Best of Luck*

*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*

शाळा व्यवस्थापन समितीचे वर्षभर विषय

 

💐💐

संकलित मूल्यमापन प्रथम सत्र 1- 2 ते 4

 

ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇



https://drive.google.com/file/d/10IOK35-AjsBncc5eEyEtiajMJEyeB78B/view?usp=drivesdk

संकलित मूल्यमापन प्रथम सत्र 1- 5 ते 7

 
















💐💐💐💐💐

सराव प्रश्नपत्रिका - तिसरी ते पाचवी



 

शालेय परिपाठ

 


दैनिक पाठ टाचण 9/10

 


बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत

 




















*वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीच्या दरम्यान घ्यावे व ज्यांनी यापूर्वी दोन हजार रुपये भरलेत पणअनुपस्थिती व मूल्यमापन अपूर्णता या कारणास्तव ज्यांचे प्रशिक्षण अपूर्ण राहिले आहे त्याच्यासाठी पुन्हा शुल्क आकारू नये अशी राज्य शैक्षाणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मा . राहुल रेखावार साहेब यांना निवेदन देऊन केली होती .ती त्यांनी मान्य करून तात्काळ लिंक तयार करून ओपन* *करण्याचे आश्वासन दिले* . *त्या नुसारआज शासनादेश काढून हे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत घेण्याचा आदेश जारी केला .त्याबद्दल*

 *SCERT चे संचालक मा .राहुल रेखावार साहेब यांचे आम्ही धन्यवाद मानतो* 


दैनिक पाठ टाचण 8/10

 


मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

🧑‍🏫The teacher is walking away

 🧑‍🏫 शिक्षक नोकऱ्या सोडत आहेत- एक कटू सत्य.

The teacher is walking away” हा NCERT चे माजी डायरेक्टर कृष्ण कुमार हयांचा लेख इंडियन एक्सप्रेस मध्ये छापून आला आहे, त्या लेखाचा हा सारांश: 

आज देशातील शाळांमध्ये एक शांत 'अस्वस्थ' करणारी क्रांती सुरू आहे —

ती म्हणजे शिक्षकांच्या मनातील थकव्याची, असहायतेची आणि निराशेची. शिक्षक नोकऱ्या सोडत आहेत, काही निःशब्दपणे तर काही मनानेच मागे हटत आहेत. नवीन पिढी तर अजिबात शिक्षक व्हायला तयार नाहीये...

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

असं का बरं होतंय?


🔹 1. शिक्षकांवर नोकरशाहीचं जाळं-


📍शिकवण्याऐवजी शिक्षक सतत अहवाल, फॉर्म, आणि डेटा अपलोड करण्यात गुंतलेले.


📍“फोटो पाठवा”, “पुरावा द्या”, “अहवाल अपलोड करा” — हेच रोजचं काम झालं आहे.


📍शिक्षकाचं वर्गातलं अस्तित्व कमी, आणि स्क्रीनसमोरचं वाढलं आहे.


🔹 2. तंत्रज्ञानाचा अतिरेकी आग्रह-


📍प्रत्येक विषयासाठी डिजिटल साधनं, अॅप्स, आणि स्मार्ट बोर्ड यांचा जबरदस्तीने वापर.


📍विषय, मुलांचं वय, आणि संदर्भ लक्षात न घेता “टेक वापरा” असं आदेशात्मक धोरण.


📍शिक्षणात “मानवी संवाद” राहिला नाही; ते “यंत्रकेंद्री” झालं आहे.


🔹 3. शिक्षक नव्हे, इव्हेंट मॅनेजर-


📍प्रत्येक दिवशी एखादा दिवस साजरा करायचा — योग दिन, मातृभाषा दिन, पर्यावरण दिन...


📍शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याऐवजी कार्यक्रमांची संख्या आणि कार्यक्रम कसे झाले हाच मापदंड.


📍मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघेही या प्रदर्शनात अडकलेले आहेत.


🔹 4. ग्रामीण शिक्षकांची बिकट अवस्था


📍दोन-तीन शिक्षक शेकडो विद्यार्थ्यांना सांभाळतात.


📍शिकवण्यासोबतच त्यांना मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, गणवेश, सायकली आणि सरकारी अहवालांची जबाबदारी.


📍“डेटा” गोळा करणं आणि वरती पाठवणं हेच शिक्षणापेक्षा महत्त्वाचं झालं आहे.


🔹 5. मानसिक ताण आणि आत्मसन्मानाचा ऱ्हास


📍 'वरून' होणाऱ्या सततच्या नियंत्रणाने शिक्षकांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे.


📍प्रत्येक कृतीचे पुरावे मागितले जातात — विश्वास हरवला आहे.


📍विद्यार्थ्यांच्या तणावग्रस्त वर्तनाशी लढताना शिक्षकही भावनिकरीत्या थकले आहेत.


📍पालकांच्या अवास्तव अपेक्षा- प्रत्येक गोष्टीत पुरावा देण्याचा दबाव.


🔹 6. शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट हरवलं-


📍 अभ्यासक्रम 'पूर्ण' करण्याचा शिक्षकांवर असलेला प्रचंड दबाव.


📍 विषयांची वाढलेली अति-संख्या...


📍शाळा “माणूस घडवण्याचं ठिकाण” राहिलेल्या नाहीत.


📍आज शिक्षणव्यवस्था “कार्यक्षमता दाखवण्याचं प्रकल्प” बनली आहे.


📍शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं — जे शिक्षणाचं हृदय होतं — ते डेटा आणि डेडलाईनमध्ये हरवलं आहे. विद्यार्थी शिक्षकांना सर्विस प्रोव्हडर समजतात... आदर राहिला नाही...

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

🔹 आता विचार करण्याची वेळ...


शिक्षणाचं केंद्र पुन्हा मुलं आणि शिक्षक असायला हवं, डेटा आणि अहवाल नव्हे.


शिक्षकांना स्वातंत्र्य, सन्मान, आणि विश्वास दिला नाही,

तर उद्याचं शिक्षण निर्जीव होईल.


📚 चला, पुन्हा एकदा शिक्षकावर विश्वास ठेवूया.

कारण शिक्षक निघून गेला, तर शाळा असेल — पण शिक्षण नसेल.

NMMS परीक्षेची तारीख बदलाबाबत


 

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...