Online study with PRASHANT PENDHE इयत्ता २रीच्या मातृभाषा या विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये इ २री च्या मातृभाषा या विषयाच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे.
या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढलेले आहेत. यातील प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत.
शाळा पातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग व शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत केला आहे. याशिवाय प्रत्येक क्षमतेसाठी अनेक समांतर रचना काठिण्य प्रश्नसंच देण्यात आले आहेत. या समांतर प्रश्नसंचातील उपप्रश्नांची रचना काठीण्य पातळी पाहूनच तयार केली आहे....
📲📲🙏👨💻👬🙏🙏
श्री.प्रशांत प्रल्हाद पेंधे
( जि.प.शाळा,सपाटपाडा)
ता.शहापूर जि.ठाणे
👨💻👨💻👨💻👨💻33👨💻👨💻👨💻👨💻👨💻👨💻👨💻👨💻👨💻
क्षमता
१.२.३)परिचित प्रसंगात केलेली तोंडी विनंती, सूचना, आज्ञा आणि प्रश्न समजपूर्वक ऐकता येणे.
शिक्षकांसाठी सूचना
या क्षमतेअंतर्गत परिचित प्रसंगामध्ये तोंडी विनंती, सूचना, आज्ञा यांचे समजपूर्वक पालन हा भाग तपासावयाचा आहे. पुढे विनंती, सूचना, आज्ञा यांचे संच दिले आहेत. शिक्षकांनी ५ ते १० विद्यार्थ्यांचा गट करून त्या त्या गटाला एक संच ऐकवावा व त्याचे पालन होते किंवा नाही याचे निरीक्षण करून प्रतिसादाच्या नोंदी घ्याव्यात. चाचणीला सुरुवात करण्यापूर्वी लक्षपूर्वक ऐकण्याची व त्यानुसार कृती करण्याची सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न विसरता द्यावी.
संच - १
विनंती
अ) दीपा आजारी आहे. तिला घरी सोडतोस का?
ब) अक्षयला तुझ्या डब्यातील पोळीभाजी दे हं।
क) आई, रमेशला पण एक लाडू दे ना !
ड) सदू मला या प्रश्नांचे उत्तर सांगशील ?
ई) गीता, तुझा आवाज गोड आहे. एक गाणं म्हण ना !
सूचना -
मी सांगतो ते ऐका व त्याप्रमाणे कृती करा.
संच - १
अ) उभे राहा
ब) दोन्ही हात बाजूला करा.
क) दोन्ही हात वर करा.
ड) दोन्ही हात खाली करा.
इ) उडी मारून खाली बसा.
संच - २
अ) हातात कागद घ्या.
ब) नाव तयार करण्यासाठी घड्या घाला.
क) कागदाची नाव तयार करा.
ड) पेन्सिलने त्यावर तुमचे नाव लिहा.
३) कागदाची नाव टेबलावर आणून ठेवा.
संच - ३
अ) उभे राहा.
ब) दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा.
क) दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा.
ड) दोन्ही हात खाली घ्या
इ) उडी मारून जागेवर बसा.
सर्च-४
अ) पाट्या काढा.
ब) पाट्या स्वच्छ करा.
क) पेन्सिलने दुरेघी आखा.
ड) मित्राचे / मैत्रिणीचे नाव पाटीवर लिहा.
इ) पाटी खाली ठेवा.
संच-५
अ) फळ्याकडे पाहा.
ब) उजव्या हाताच्या खिडकीकडे पाहा.
क) डाव्या हातांच्या खिडकीकडे पाहा.
ड) दरवाज्याकडे पाहा.
इ) माझ्याकडे पाहा.
संच - १
आज्ञा -
अ) माधव उठ, खिडकी बंद कर
ब) सीमा, डस्टर घे. फळा स्वच्छ कर
क) नीता, वर्गातील कागद गोळा कर
ड) रमेश, दरवाजा लाव / उघड
इ) अशोक, फळ्यावर रेषा काढ
