" alt="ब्लॉग लोगो">

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

E-KYC Verification-शालार्थ प्रणाली मध्ये नाव आधार वरील नावानुसारच असणे आवश्यक आहे.*

 *🚨E-KYC Verification*


*शालार्थ प्रणाली मध्ये नाव आधार वरील नावानुसारच असणे आवश्यक आहे.*


*नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल असेल तर शालार्थ मध्ये केवळ स्पेलिंग दुरुस्त करावे . जसे चौधरी हे आडनाव Choudhari किंवा Chaudhari असे लीहीतात. ही दुरुस्ती चेंज डीटेल्स करुन E-KYC व्हेरीफाँय करता येते* 

         *परंतु*

*एखाद्या शिक्षकाचे नाव आधारवर वेगळे आहे म्हणून ते शालार्थ मध्ये डाटा व्हेरिफिकेशन होत नसल्याने शालार्थमध्ये चेंज डीटेल्स करून बदल करणे योग्य नाही.*


💥*उदा. आधारवर नाव पंजाबराव व सेवापुस्तकात पंजाब असेल तसेच शालार्थ मध्ये सुद्धा पंजाब हेच असेल.*

 ➡️*तर शालार्थ मधील नाव बदल करू नये त्यांना आधार कार्ड अपडेट करायला सांगावे.*


*💥महिलांच्या बाबतीत सेवा पुस्तकातील नाव माहेरचे असेल व शालार्थ मध्ये सुद्धा नाव माहेरचेच असेल, परंतु आधार हे सासरकडील नावाने असेल💥* 


*➡️तर अशावेळी त्यांना आधार कार्ड वरील नाव अपडेट करायला सांगावे. म्हणजे सर्वठीकाणी माहेरचे नाव असेल. मात्र यासाठी संबंधित महीला शिक्षिका यांचे मत महत्त्वाचे आहे.*


*💥जर महीला कर्मचाऱ्यांना सासरचे नाव ठेवायचे असेल तर आणि त्यांच्याकडे नाव बदलाचे राजपत्र असेल , परंतु याकरिता मा. शिक्षणाधिकारी यांचा नाव बदलचा आदेश नसेल, तर त्याकरिता सर्वप्रथम त्यांनी शिक्षण विभागामध्ये प्रस्ताव सादर करून प्रथम नाव बदलचा आदेश करून घ्यावा. व झालेल्या आदेशानुसार सेवापुस्तकात बदल करावा. सेवापुस्तकात बदल झाल्यानंतरच सासरचे नाव शालार्थ मध्ये बदल करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवावा . हा प्रस्ताव डीवायडी मध्ये पाठवला जाईल . मंजुरीनतंर जिल्हा लाँगीन मधुन संबंधित महीला कर्मचाऱ्यांचे नाव शालार्थ मध्ये बदल होईल . त्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत चुकुनही परस्पर शालार्थ मध्ये नावात बदल करायचा नाही💥*

*💥ज्या शिक्षकांचे Adhar status - Api Error , Demographic Data didn't match असा Error आला असेल तर असा EKYC data डीडीओ 3 यांना Forward करू नये.💥*


*💥असा Error असलेले जे form जिल्हा लॉगीनला forward करण्यात आले असतील ते सर्व Reject करण्यात येतील.💥*


*Demographic Data didn't match असा Error आला असेल, तर खालील बाबी तपासून घ्याव्यात.*


*1) आधार कार्ड वर असलेले नावाचे स्पेलिंग व शालार्थ मध्ये असलेले नावाचे संपूर्ण स्पेलिंग तपासून घ्यावे.*

*2) आधार कार्डवर केवळ जन्म वर्ष आहे का हे बघावे तसेच शालार्थ मधील जन्मतारीख व आधाराची जन्मतारीख सुद्धा तपासून घ्यावी.*

*3) आधार कार्ड वर असलेले Gender व शालार्थ मध्ये असलेले Gender हे सुद्धा तपासून घ्यावे.*

 *वरील तीनही बाबी सारख्याच असतील तर संबंधित कर्मचाऱ्यांनी आपला आधार डाटा लॉक केला आहे काय ?  याबाबत त्यांचेकडून खात्री करून घ्यावी.* 

*जर असा Adhar Data lock केला असेल तर,* 

*खालील पद्धतीने तो Unlock करता येतो.*


*➡️ संबंधित शिक्षकांचा आधार क्रमांक (UID) अनलॉक करण्यासाठी, अधिकृत UIDAI official portal वर , अनलॉक पर्याय निवडा आणि सुरक्षा कोडसह त्यांचा १६-अंकी व्हर्च्युअल आयडी (VID) प्रविष्ट करावा. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकाच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवर पाठवलेला OTP सबमिट करावा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...