Online study with PRASHANT PENDHE इयत्ता २रीच्या मातृभाषा या विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये इ २री च्या मातृभाषा या विषयाच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे.
या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढलेले आहेत. यातील प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत.
शाळा पातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग व शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत केला आहे. याशिवाय प्रत्येक क्षमतेसाठी अनेक समांतर रचना काठिण्य प्रश्नसंच देण्यात आले आहेत. या समांतर प्रश्नसंचातील उपप्रश्नांची रचना काठीण्य पातळी पाहूनच तयार केली आहे....
क्षमता
२)परिचित प्रसंगातील संभाषण व संवाद समजपूर्वक ऐकता येणे.
शिक्षकांसाठी सूचना👇👇👇
आवाजात योग्य तो चढउतार करून पुढील संवाद विद्यार्थ्यांना ऐकवावा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तोंडी विचारावीत.
संवाद👇👇👇
मीना सदू, शाळेत का आला नाही ?
सुरेश अगं मीना, तो आजारी आहे.
मीना मग आपण सहलीला जायचे का नाही ?
सुरेश - नाही. आपण सहलीचा बेत रद्द करू या.
लता आपण सर्वजण सदूला भेटायला जाऊ या.
सुरेश - ठीक आहे. जाताना आपण त्याच्यासाठी खाऊ नेऊ
उत्तरे द्या.
संच - १
अ) मुलांनी कोठे जायचे ठरवले होते ?
ब) आजारी कोण होते ?
क) सहल रद्द का झाली ?
ड) सहलीऐवजी सर्वांनी कोठे जायचे ठरवले ?
ई) मुलांनी सदूला भेटायला जाताना काय न्यायचे ठरवले ?
संवाद -👇👇
बाबा माधव, हे पेढे घे.
माधव👇👇
बाबा, कशाचे हे पेढे ?
बाबा👇👇
अरे, आपल्या अरविंदने आज नवे दुकान उघडले.
माधव -👇👇
बाबा, आज पेढेच पेढे. आमच्या शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले. त्याचेही पेढे मिळाले. राजूच्या काकाच्या नवीन मोटारीचेही पेढे मिळाले.
बाबा👇👇👇
आज माधवची मजा आहे म्हणायची !
अ) माधवला बाबांनी काय दिले ?
ब) नवीन दुकान कोणी उघडले ?
क) शाळेत पेढे कशासाठी वाटले ?
ड) नवीन मोटार कोणी खरेदी केली ?
इ) मजा कोणाची आहे ?
📲📲🙏👨💻👬🙏🙏
श्री.प्रशांत प्रल्हाद पेंधे
( जि.प.शाळा,सपाटपाडा)
ता.शहापूर जि.ठाणे
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*`सौजन्य व संकलन `*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*

























































