शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
मंगळवार, ८ जुलै, २०२५
सोमवार, ७ जुलै, २०२५
विविध आकार बनवा
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थाने नेस्वबुद्धीने बनविला नवीन आकार
इयत्ता सहावी📲प्रश्नपेढी विषय : सामान्य विज्ञान
2) सजीवसृष्टी
06.72.01 निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे (उदा. देखावा, पोत, कार्य, सुगंध, इत्यादी) पदार्थ आणि सजीव ओळखतात. जसे की वनस्पतिज तंतू, फुले.
प्रश्न: खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट करा.
आ. वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा.
इ. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे?
ई. प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे?
3. सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत?
📲🪭📲🪭📲🪭👇🪭📲🪭📲
3) सजीवातील विविधता आणि वर्गीकरण
६. खालील प्रश्नांची उत्तरे द्या
अ. वनस्पतीचे अवयव कोणते ?
आ. मुळांची कार्ये कोणती ?
इ. सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे?
ई. सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात ?
उ. वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा.
ऊ. रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे दया.
ए. प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल?
ऐ. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते ?
प्रश्न: सत्य की असत्य ओळखा.
अ. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे.
आ. उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात.
३. पृष्ठवंशीय प्राण्यांत मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते.
ई. अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे.
प्रश्न: दोन नावे लिहा.
अ. सपुष्प वनस्पती
आ. अपुष्प वनस्पती
इ. वृक्ष
ई . वेल वनस्पती
उ.झुडूप
ऊ. वार्षिक वनस्पती
ए. द्विवार्षिक वनस्पती
ऐ. बहुवार्षिक
आपली अस्थिसंस्था आणि त्वचा
प्रश्नः खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्ये करते ?
आ. तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल ?
इ. मानवी अस्थिसंस्थेची कार्ये कोणती ?
ई. आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा.
उ. हाडांचे प्रकार कित्ती व कोणते ?
06.72.02 गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतात, जसे की तंतू आणि धागा: सोट मूळ आणि तंतुमय मूळ; विद्युत वाहक आणि विद्युत रोधक, इत्यादी.
३) सजीवातील विविधता आणि वर्गीकरण
प्रश्न: सांगा, मी कोणाशी जोडी लावू ?
'क' गट 'ख' गट
अ. उभयचर १. माकड
आ. पृष्ठवंशीय २. साप
इ. खवले असणारे ३. बेडूक
प्रश्न: आमच्यात वेगळा कोण?
अ. बुरशी, भूछत्र, शेवंती स्पायरोगायरा
आ. आंबा, वह, ताड, हरभरा
इ. द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद
ई. सूर्यफूल, वह, ज्वारी, बाजरी
उ. पेरू, मुळा, गाजर, बीट
ऊ. हरीण, मासा, मानव, कृमी.
१९ कार्य आणि ऊर्जा
प्रश्न आमच्यात फरक काय आहे?
अ. सपुष्प वनस्पती,अपुष्प वनस्पती
आ. वृक्ष, झुडूप
इ. पृष्ठवंशीय प्राणी,अपृष्ठवंशीय प्राणी
प्रश्न: काय सांगाल?
अ. विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल ?
आ. कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल ?
इ. ऊर्जेची विविध रूपे कोणती?
ई. निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा,
उ . ऊर्जा बचत का करावी ?
ऊ. हरित ऊर्जा कशाला म्हणतात ?
ए. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात?
ऐ सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
ओ. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे?
06.72.03 निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ, सजीव व प्रक्रिया पांचे वर्गीकरण करतात. उदा. विद्राव्य, अविद्राव्य, पारदर्शक, अर्धपारदर्शक, अपारदर्शक पदार्थ, प्रत्यावर्ती व अप्रत्यावर्ती बदल, झुडूप,
झाडं, लता, वेल अशा वनस्पती, जैविक आणि अजैविक असे अधिवासाचे घटक, रेषीय, वर्तुळाकार, नियतकालिक अशी गती, इत्यादी.
सजीवसृष्टी
1) कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो 2)
1)मासा
3. मानव
4. साप
६. करकोचा
ई गांडूळ
ऊ. वडाचे झाड
ए. अळी
५) पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म
प्रश्नः मी कोण?
अ. तुमचा ताप मोजतो, तापमापीत असतो,
आ. माझ्याशिवाय गरम नाही, घंड नाही.
इ. नाही मला आकार।
ई. पाण्यात विरघळतो, रकिलमध्ये विरघळत नाही.
प्रश्न खालील गुणधर्म असणाऱ्या पदार्थांची यादी बनवा.
१) विद्रव्य आणि अविद्रव्य
२) पारदर्शक आणि आपरदर्शक पदार्थ
३) विद्युतवाहक आणि विद्युतदुर्वाहक पदार्थ
४) उष्णता वाहक आणि उष्णता रोधक पदार्थ
१७गती व गतीचे प्रकार
प्रश्नः गतीचा प्रकार ओळखा.
अ. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे,
आ. छताला टांगलेला फिरणारा पंखा
इ. आकाशातून पडणारी उल्का
ई जमिनीवरून उडवलेले रकिट.
3. पाण्यात पोहणारा मासा..
ऊ. सतारीची छेडलेली तार
प्रश्नः रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
(एकरेषीय, नैकरेषीय, वर्तुळाकार एकरेषीय समान, एकरेषीय असमान्, समान वर्तुळाकार, असमान वर्तुळाकार, पारसिक)
अ. इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो.......गतीने खाली घेतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो .......गतीने जमिनीवर पेईल
आ. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती.................असते.
इ. आकाशातून भक्याचा शोध घेत उडणारी घार..............गतीने उड़ते.
ई.फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती........... तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती................ असते.
प्रश्नः आमच्यातील वेगळेपण काय।
अ. आंदोलित गती व रेषीय गती
आ. रेषीय गती व वारयिङक गती
इ. यादृच्छिक गती य आंदोलित गती
१० बल व बलाचे प्रकार
प्रश्न: आमच्यातील वेगळेपणा काय ?
अ . स्रापू बल व यांत्रिक बल
आ. घर्षण बल व गुरुत्वीय बल
तरफ, कप्पी, उत्तरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ध्वजस्तंभाची वरची चक्री, अडकित्ता, कात्री, ओपनर, कुन्हाड, केन्, सुरी
प्रश्न: रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा.
अ. मध्यभागी........
असून एका बाजूला............
व दुसऱ्या बाजूला...........
हा तरफेचा पहिला प्रकार आहे.
आ. मध्यभागी..........
असून एका बाजूला..........
दुसऱ्या बाजूला.........
....हा तरफेचा दुसरा प्रकार आहे.
इ. मध्यभागी.............
असून एका बाजूला...........
व दुसऱ्या बाजूला.........
हा तरफेचा तिसरा प्रकार आहे.
इयत्ता तिसरी 📲 प्रश्नपेढी
लेखन : स्व-अभिव्यक्ती
अनुभव लेखन
१) तू पावसात भिजून आल्यावर तुला कसे वाटले ते थोडक्यात लिही.
२) तुझा वर्ग स्वच्छ रहावा म्हणून तू काही प्रयत्न केले आहेत का? काय केले ते सविस्तर लिही.
३) घरातल्यांनी सांगितलेली कोणकोणती कामे करायला तुला आवडतं ते लिही.
घरातल्यांनी सांगितलेली कोणती कामे तुला मनापासून करावीशी वाटतात ? का? ते लिही.
४) सकाळी चिंगी घराबाहेर आली रात्री पाऊस पडून गेला होता. दारात मोत्याच्या पावलाचे ठसे उठले होते. तू तसे कोणकोणते ठसे पहिले आहेत ते लिही.
५) तुला सायकल चालवायला आवडते का? आवडत असेल तर काआवडते ते लिही. जर तुला आवडत नसेल तर का आवडत नाही ते लिही.
६) बाजारात गेल्यावर कोणकोणती दुकाने दिसतात?
७) नुकतेच जन्मलेले गाईचे वासरू कसे उभे राहते ते लिही.
८) लहान मुलाला बोलता येत नसतं. मग ते भूक लागली, खूप आनंद झालात्याला काही पाहिजे असेल तर ते कसं सांगते? तुझा अनुभव लिही.
९) तुला कार्टून्समध्ये सर्वात जास्त कोण आवडतो? का आवडतो ते लिही.
१०) तुझ्या स्वतःबद्दल पाच वाक्यांत माहिती लिही.
कल्पनेवर आधारित लेखन
१) मामाने तुला नवीन वही दिली. त्या वहीचा उपयोग तू कशासाठी करशील?
२) पाण्यातील माशाला तीन प्रश्न विचार.
३) तुला मांजरीचे पिलू सापडले तर तू काय करशील?
४) चंद्राचं घर कसं असेल असं तुला वाटतं ? तुझ्या कल्पनेतल्या चंद्राच्या घराचं वर्णन कर
५) तुला आभाळ भेटायला आलं तर तू त्याला काय काय विचारशील?
६) शिडीवरून मामा कौलांवर चढला आहे. तो आता काय करणार असेल? दोन ते तीन वाक्यांत लिही.
७) इंद्रधनुष्याला पाहून तुला कोणकोणते प्रश्न पडतात? कोणतेही तीन प्रश्न लिही.
चित्र काढून वर्णन
१) शाळेसमोरच्या झाडाच्या पानाचे चित्र काढ. ते कसं दिसतं, त्याचा आकार कसा आहे यावर दोन वाक्यात लिही.
२) तुला आवडेल ते चित्र काढ त्याचे वर्णन लिही.
पत्रलेखन
मित्राला मैत्रिणीला आजारातून लवकर बरें व्हावं म्हणून शुभेच्छा देणारी छोटीशी चिड्डी लिही
भाषिक खेळ
🪭कालवा
🪭वास
शेवटच्या अक्षराने सुरु होणारा शब्द लिहून शब्दांची अंताक्षरी पूर्ण कर (चार-पाच शब्द अपेक्षित)
इयत्ता : पाचवी- प्रश्नपेढी
🏆अनुभव लेखन🏆
१) तुला कुणाजवळ आपली चूक कबूल करावीशी वाटते? का? चूक झाल्यावर तू दुरुस्त कशी करशील? सविस्तर लिही.
२)शिक्षकांनी तुला फळ्यावर दिवाळीच्या सर्व शाळेसाठी शुभेच्छा लिहायला सांगितल्या आहेत. तुझ्या भाषेत तू त्या लिहा.
[इथं फक्त शुभ दीपावली' एवढंच अपेक्षित नाही. मुलांनी किमान चार ते पाच ओळीत आपल्या भावना लिहिणे अपेक्षित आहे.]
३) आई जेव्हा खूपच चिडते तेव्हा काय करते? ती शांत कशी होते? तुझा अनुभव लिही.
४) पाचवीच्या वर्गात तुझा पहिला दिवस कसा होता? तुझा अनुभव लिही.
५) खरं बोलण्याच्या फायदे आणि तोट्यांची यादी कर. प्रत्येकी तीन मुद्दे लिही.
६) शाळेतील मित्रांबरोबर/मैत्रिणींबरोबर बोलताना-खेळताना जेवताना गमतीजमती होत असतात. तूही अशा गमती जमती पहिल्या असशील. अशीच एखादी धम्माल गंमत लिहून काढ
७) तुझा दिनक्रम कसा आहे ते लिही.
८) शिक्षकांना कधी राग येतो? पाच गोष्टींची यादी कर.
९) तू कधीच करणार नाहीस अशा पाच गोष्टींची यादी कर.
१०) दिलेल्या विषयावर थोडक्यात अनुभव लिही.
a) आली थंडी
b) कडक उन्हाळा
c) पोहण्याची मजा
मुलांच्या दैनंदिन जीवनातील विषय निवडून त्यांना लेखनासाठी द्यावा.
११) एखद्या वस्तूचे भिन्न भिन्न उपयोग लिही
🥇काल्पनेवर आधारित लेखन🥇
१) तुझ्या बाबांनी कधी स्वैपाक केला तर त्या दिवशी काय काय घडेल ते थोडक्यात लिही.
२) दोन डायनासोरस ही पात्रे घेऊन एक काल्पनिक कथा तयार कर.
३) फाटलेलं पुस्तक तुझ्याशी बोलतंय अशी कल्पना करून सात ते आठ ओळी लिही.
४) आई घरी नाही आणि तुझ्या हातून बाजरी सांडली, तर तू काय करशील ?
५) आई घरी नाही आणि दूध उतू गेलं; तर तू काय करशील?
६) मित्राने छोटी चोरी केली आहे, तुला माहीत आहे. तर तू काय करशील?
७) गावातल्या संध्याकाळचे वर्णन तुझ्याशब्दांत लिही.
८) पऊस कमी झाल्याने उगवलेली रोपे सुकून गेली. हे समजल्यावर तुला काय वाटले? पाच ते सात वाक्यांत लिही.
📲जाहिरात🏆
तुमच्या वर्गाने केलेल्या कागदी फुलांची जाहिरात तयार कर.
💐पत्रलेखन🪭
१) तुझ्या बाईना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्यांचं अभिनंदन करणारं पत्र लिही.
२) तू वाचलेलं पुस्तक तुला खूप आवडलं हे सांगणारं पत्र त्या पुस्तकाच्या लेखकाला लिही.
३) अचानक आजारी पडल्याने तुला शाळेत जाता येणार नाही. मित्राच्या हाती शिक्षकांच्या नावे शाळेत येऊ शकत नसल्याचे पत्र लिहून पाठवायचे आहे असे पत्र तयार कर.
📲प्रसंगवर्णन📲
तुझ्या घरी होळी शिमगा सण कसा साजरा करतात ते लिही.
🏆विषयाशी जोडलेले शब्द🏆
१) खालील विषयाचे वर्णन करणारे पाच शब्द लिही.
उदा. आमावस्येची रात्र काळीकुट्ट, भीतीदायक, चांदण्या, गडद, शांत
अ. पावसातला चिखल
आ. घरातला पसारा
२) एकेका शब्दाने वाक्य वाढवून लिही.
अशी तीन वाक्ये बनव.
उदा. घरी जा लवकर घरी जा तू लवकर घरी जा.
अ. आई आली.
२) एकेका शब्दाने वाक्य वाढवून लिही.
अशी तीन वाक्ये बनव.
उदा. घरी जा लवकर घरी जा तू लवकर घरी जा.
अ. आई आली.
आ. तो पडला.
इ. आवाज आला.
🏆वैचारिक लेखन🏆
तुझ्या वर्गात कोणाकोणाचे फोटो आहेत? ते वर्गात का लावलेले आहेत? तुला काय वाटतं लिही.
💐शब्दांवरून गोष्ट💐
रंग- भांडण-ब्रश-मैत्री या शब्दांचा वापर करून तुला आवडेल अशी गोष्ट तयार कर.
🏆संवाद लेखन🏆
१) शाळा तुझ्याशी बोलते आहे अशी कल्पना करून संवाद लिही.
२) सुई आणि दोरा या दोन वस्तू एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिही.
३) पोळपाट आणि लाटणे या दोन वस्तू एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना कन त्यांच्यातील संवाद लिही.
👬व्यक्तिचित्रलेखनाची पूर्वतयारी👬
१) तुझ्या आवडत्या मित्राचं/मैत्रिणीचं नाव लिही. तो ती तुला का आवडतो आवडते ते थोडक्यात लिही.
२) तुझ्यातील कोणतेही पाच चांगले गुण लिही. तुझ्यातील तू वाटणारे कोणतेही पाच दोष लिही.
माहितीपर लेख
मुलांना आवडणारे एक गुरुजी होते त्यांचे नाव रवींद्रनाथ टागोर. भारताच्या पूर्वेला कलकत्ता नावाचे एक शहर आहे. त्याच्याजवळ बोलपूर नावाच्या छोट्याशा गावी त्यांनी अनोखी शाळा सुरू केली. तिचे नाव शांतिनिकेतन. तिथे मुले आणि गुरुजी वर्गात बसत नसत. मोकळ्या आकाशाखाली, झाडाखाली वर्ग भरत. रवींद्रनाथ मुलांसाठी बंगाली भाषेत नाटके लिहीत. गाणी लिहीत. 'ढगाच्या मांडीवर ऊन हसतंय', 'आम्ही सगळेच राजे', 'वनावनात फाल्गुन आला', 'शेतात ऊनसावलीचा खेळ सुरू आहे' अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिली. अगदी छोट्या मुलांसाठी त्यांनी 'सहजपाठ' लिहिले. ते मुलांना फार आवडत, यात काय नवल!
प्रश्न :-
१) मुलांच्या आवडत्या गुरुजींचे नाव काय होते?
उत्तर📲
२) शाळेला अनोखी का म्हटले आहे, असे तुला वाटते?
उत्तर📲
३) मुलांना ते का आवडत असतील?
उत्तर📲
४) शिक्षकांच्या मदतीने भारताच्या नकाशात कलकत्ता शहर कुठे आहे ते बघ.
उत्तर📲
५) तुमचा वर्ग कधीतरी झाडाखाली भरवण्याबद्दल गुरुजींना चिठ्ठी लिही
उत्तर📲
गणिती भाषा
संदर्भ :- किशोरः खंड ९
लेखक: पा. पी. घरत
एक किलो वजनाचा एक मोठा बेडूक चोवीस तासांत एक किलो अन्न खातो. या भोजनात ४५ टक्के जीवजंतूंचा समावेश असतो. त्यापैकी बहुतांश किडे पिकावरील किडे असतात. बारीक जंतू पंधरा टक्के असतात. बेडूक अन्न खाताना उंदरांनाही खाऊन टाकतात. एवढेच नव्हे तर विंचूही खाऊन टाकतात पंचेचाळीस टक्के किडे म्हणजे जवळ जवळ चारशे ग्रॅम वजनाचे किडे झाले. त्याची संख्या पाहिली तर जवळ जवळ २५०० एवढी भरेल. अशा रीतीने एक बेडूक पिकाचे नुकसान करणाऱ्या २५०० किड्यांना रोज खाऊन टाकतो. पिकाचे रक्षण करतो.
बेडूक जलचर आणि स्थलचर असतात. एवढेच नव्हे तर काही बेडूक झाडावरही चढतात. ते आपल्या जीवनातील पाऊण भाग झोपेत व आरामात काढतात. तो आळशांचा राजा आहे. परंतु हा आळशी जीव माणसाचा फार उपयोगी आहे. शेतकऱ्यासाठी तर तो विश्वासू मित्र आहे. शेतात जेवढे पिकाचे दुश्मन आहेत त्या सर्वांचा बेडूक हा दुश्मन आहे. त्या कीटकांना स्वाहा करून माणसांवर तो केवढे उपकार करतो...!
प्रश्न -
१) मोठा बेडूक चोवीस तासांत किती अन्न खातो?
२) बेडकाच्या जेवणात किती टक्के जीवजंतू असतात?
३) बेडूक कोठे कोठे राहतो? हे उताऱ्यातील कोणत्या वाक्यावरून समजते?
४) बेडकाला आळशांचा राजा का म्हटले आहे?
५) बेडूक कोणाचा दुश्मन आहे?
६) या उताऱ्यास योग्य शीर्षक दे.
प्रतिसाद
टँकरचालकांना शिस्त लावावी
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे उस्मानाबादेत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरविले जात आहे मुख्य अहिल्याबाई होळकर पथावर पाणी भरण्याची सोय आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूककोंडी होत होती म्हणून दिशा बदलून पुढच्या बाजूने टँकर वळविण्यात आले; परंतु पाणी भरून पुन्हा भगतसिंग चौकात यु वळण घेण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर हे टँकर जातात त्यावेळी टँकरची झाकणे नीट न लावल्यामुळे पाणी सांडत जाते. त्यामुळे दुचाकी घसरतात त्यामुळे भगतसिंग चौकात सांडलेल्या पाण्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टँकर चालकांना शिस्त लावावी.
गजानन वाघमोडे
उस्मानाबाद
प्रश्न :-
१) उस्मानाबादमध्ये पाणीटंचाई का निर्माण झाली?
२) टँकरची दिशा का बदलण्यात आली?
३) टँकरचालकांना कोणती शिस्त लावणे गरजेचे आहे?
४) अपघात टाळण्यासाठी काय करावे?
६) वरील प्रतिसाद कोणी दिला आहे?
इयत्ता : दुसरी- प्रश्नपेढी
स्व-अभिव्यक्ती
🪭लेखन🪭
१) मित्राने तुझ्याशी कट्टी घेतली तेव्हा तुला कसे वाटले?
२) तुझ्या हातून मित्रांचे खेळणे मोडले तेव्हा मित्र तुला काय म्हणाला?
३) तू कसा आहेस याबद्दल तीन वाक्यांत लिही.
४) तुझ्या घरातील तुला सर्वात जास्त कोण आवडते? त्याच्याबद्दल दोन वाक्ये लिही.
५) तुला कोणता प्राणी आवडतो त्याच्याबद्दल तीन वाक्ये लिही.
६) गुरांच्या गोठ्यात काय काय दिसते? पाच शब्द लिही
७) घराच्या पडवीत काय काय ठेवतात? पाच शब्द लिही.
८) शेतात काय काय दिसते? दोन वाक्ये लिही.
९) वर्गात आपण काय काय करतो? दोन ते तीन वाक्ये लिही.
१०) तुझ्या घराजवळ कोणकोणती झाडे आहेत? पाच नावे लिही.
११) शिंपी दादा काय काय कामे करतात? दोन ते तीन वाक्ये लिही.
१२) सुतार कोणती हत्यारे वापरून काय काम करतात? दोन तीन वाक्ये लिही.
१३) तुमच्या घरी पाणी कोण भरते व कोठून भरते?
१४) स्वयंपाक करताना आई काय काय करते? दोन ते तीन वाक्ये लिही.
🪭कल्पनेवर आधारित लेखन🪭
१) तू घरी आलास आणि घराला कुलूप आहे, तर काय करशील?
२) घरात कुणी नाही आणि एक वर्षाची धाकटी बहीण खूप रडतेय, तर तू काय करशील?
३) कागदाची एक होडी बनवून होडीला प्रश्न विचार,
🪭चित्र काढून लेखन🪭
तुझ्या आवडत्या वस्तूचे चित्र काढून त्याविषयी दोन ओळीत माहिती लिही.
🪭भाषिक खेळ🪭
१) तुला आवडणाऱ्या पाच मित्र/मैत्रिणींची नावे लिही.
२) 'सागरसरिता' या शब्दातील अक्षरे वापरून पाच शब्द बनव.
३) 'जंतरमंतर' या शब्दातील मुळाक्षरे वापरून पाच शब्द बनव.
४) 'कमलनयन' या शब्दातील मुळाक्षरे वापरून पाच शब्द बनव.
५) 'कंबरपट्टा' या शब्दातील मुळाक्षरे वापरून पाच शब्द बनव.
६) 'रिकामटेकडा' या शब्दातील मुळाक्षरे वापरून पाच शब्द बनव.
७) दोन्ही बाजूंनी वाचले तरी अर्थपूर्ण शब्द तयार होईल असे दहा शब्द शोध.
जसे, राख खार, साप पसा,
🪭विषयाशी जोडलेले शब्द🪭
१) खाली दिलेल्या वर्णनानुसार प्रत्येकी दोन दोन वस्तूंची नावे लिही
चपट्या, गोल, त्रिकोणी, चौकोनी, टोकदार, हलणाऱ्या, पाण्यावर तरंगणाऱ्या, खरखरीत,
पाण्यात बुडणाऱ्या, गुळगुळीत, जड, हलक्या.
२) तुझ्या मनात आत्ता येणारा एक शब्द लिही. तो शब्द वापरून एक वाक्य तयार कर.
🪭विषयाशी जोडलेले शब्द🪭
१) खाली दिलेल्या वर्णनानुसार प्रत्येकी दोन दोन वस्तूंची नावे लिही
चपट्या, गोल, त्रिकोणी, चौकोनी, टोकदार, हलणाऱ्या, पाण्यावर तरंगणाऱ्या, खरखरीत, पाण्यात बुडणाऱ्या, गुळगुळीत, जड, हलक्या.
२) तुझ्या मनात आत्ता येणारा एक शब्द लिही. तो शब्द वापरून एक वाक्य तयार कर.
३) पुढील आवाज ऐकू येतो असे दोन शब्द प्रत्येक आवाजासाठी लिही. शब्दाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी असा कुठेही तो आवाज असेल तरी चालेल.
म, स, र, ह, क, न, अ. पे, सु, ता
४) तुला आत्ता दिसणाऱ्या पाच वस्तूंची नावे लिही.
५) तुला आवडणाऱ्या पाच माणसांची नावे लिही.
६) तुला आवडणाऱ्या पाच खाद्य पदार्थाची नावे लिही.
७) वर्गातील पाच वस्तूंची यादी कर.
८) घरातील पाच वस्तूंची यादी कर.
९) तू खेळतोस अशा पाच खेळांची यादी कर.
१०) तुझ्या दप्तरात असतात अशा पाच वस्तूंची यादी कर.
११) रस्त्यावरच्या पाच वाहनांची यादी कर.
१२) तुला खायला आवडतात असे पाच पदार्थ लिही.
१३) खालील शब्द वापरून प्रत्येकासाठी एक वाक्य तयार कर.
कपाट, दप्तर, जिलेबी, चेंडू, फळा
इयत्ता : दुसरी
🪭व्याकरण🪭
विद्यार्थ्यांच्या टप्प्यांमध्ये, शिकण्याच्या गतीमध्ये थोडाफार फरक असतो. तसेच काही घटकांची उजळणी दोन तीन वर्षे पुनःपुन्हा होणे दृढीकरणासाठी उपयोगी ठरते. हे लक्षात घेऊन व्याकरणातील काही घटकांविषयीचे तेच प्रश्न दोन किंवा तीन इयतांसाठी दिले आहेत.
📲विरामचिन्हे📲
🏆पूर्णविराम🏆
🪭योग्य ठिकाणी पूर्णविराम देऊन वाक्ये पुन्हा लिही🪭
१) मीना सकाळी उठली तिने दात घासले आणि अंघोळ केली तिने भाकरी खाल्ली ती शाळेत गेली
२) सुरेशची बकरी हरवली तो घाबरला आणि रडायला लागला झाडामागून बकरीचा आवाज आला सुरेशला आनंद झाला
३) लाल सिग्नल लागला सायकल थांबली रिक्षा थांबली बस थांबली सिग्नल हिरवा झाला सगळे निघून गेले
४) घंटा वाजली मधली सुट्टी झाली मुलांनी ताटे घेतली ती ओळीत उभी राहिली ताईंनी खिचड़ी दिली मुलांनी खिचडी खाल्ली
५) आजीचा मोबाईल वाजला रजियाने मोबाईल तिला नेऊन दिला आजी काकांशी बोलली मोबाईल अचानक बंद झाला काकांनी पुन्हा फोन केला
नातेसंबंध 📲शंकर चौरे सरांनी लिखित
🔲🔲🌈🌱🌱🌈🔲🔲
*👭नातेसंबंध सामान्यज्ञान👬*
*╰═❂═✺═༺☬༻═✺═❂═╯*
🤷♂️माझ्या आईचे बाबा माझे - आजोबा
🤷♀️माझा मावशीचे बाबा माझे - आजोबा
🤷♂️माझ्या मामाचे बाबा माझे - आजोबा
🤷♀️माझ्या आईची आई माझी - आजी
🤷♂️माझ्या मावशीची आई माझी - आजी
🤷♀️माझ्या मामाची आई माझी - आजी .
🤷♂️माझ्या आईची सासू माझी - आजी
🤷♀️माझ्या आईचे सासरे माझे - आजोबा
🤷♂️माझ्या आईची नणंद माझी - आत्या
🤷♀️माझ्या आईची वहिणी माझी - मामी
🤷♂️माझ्या आईची मुलगी माझी - बहीण
🤷♀️ माझ्या मावशीची मुलगी माझी - बहीण
🤷♂️ माझ्या आईचा मुलगा माझा - भाऊ
🤷♀️ माझ्या आईची बहिण माझी - मावशी
🤷♂️माझ्या मामाची बहिण माझी - मावशी
🤷♀️ माझ्या मावशीची बहिण माझी - मावशी
🤷♂️माझ्या आईचा भाऊ माझा - मामा
🤷♀️माझ्या मावशीचा भाऊ माझा - मामा
🤷♂️माझ्या मावशीचा मुलगा माझा - मावसभाऊ
🤷♀️माझ्या बहिणीचा मुलगा माझा - भाचा
🤷♂️माझ्या आईचे दीर माझा - काका
🤷♀️ माझ्या वडिलांचे बाबा माझे - आजोबा
🤷♂️माझ्या काकांचे वडिल माझे - आजोबा
🤷♀️माझ्या आत्याचे बाबा माझे - आजोबा
🤷♂️माझ्या बाबांची आई माझी - आजी
🤷♀️माझ्या काकांची आई माझी - आजी
🤷♂️माझ्या आत्याची आई माझी - आजी
🤷♀️माझ्या काकांचा मुलगा माझा - चुलतभाऊ
🤷♂️माझ्या काकांची मुलगी माझी - चुलतबहिण
🤷♀️ माझ्या आत्याचा मुलगा माझा - आतेभाऊ
🤷♂️माझ्या आत्याची मुलगी माझी - आतेबहिण
🤷♀️माझ्या बाबांचा भाऊ माझा - काका
🤷♂️माझ्या आत्याचा भाऊ माझा - काका
🤷♀️माझ्या बाबांची बहिण माझी - आत्या
========================
*✍️शंकर चौरे सर(पिंपळनेर)धुळे*
गृपला अॅड होण्यासाठी येथे क्लिक करा.
👇👇
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
Total 100 Words-महेश बन्ने सरांचे 🙏🙏🙏
👉 *Total 100 Words*
👉 *Opposite Words*
👉 *इंग्रजी शब्द - मराठी अर्थासह*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::
👉 *विद्यार्थ्यांना पाठवा*
संकलन
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
1 ते 100 मराठी अंक
🛑👆🏻1 ते 100 मराठी अंक या पध्दतीने शिकवा🤹🏻♀️ उजळणीचा सर्वात जास्त पहिलेला व्हिडिओ🤹🏻♂️स्वतः अनुभवलेला- मिळेल 100 % रिझल्ट🚀
➖➖➖➖➖➖➖➖
🛑👆🏻मजेशीर जनरल नॉलेजची प्रश्न आणि उत्तरे यातील 90% उत्तरे आपणास नाही येणार?
➖➖➖➖➖➖➖➖
🛑👆🏻ससा आणि कासव🐢🐰 AI वेगळी स्टोरी-वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून
➖➖➖➖➖➖➖➖
*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼🪀
https://chat.whatsapp.com/C4e07wKesQCKcFK7TaKPXW
🥏👇🏻टेलिग्राम ग्रुप👇🏻🥏
https://t.me/+SpoNizsh7-0zNGFl ===================
रविवार, ६ जुलै, २०२५
विद्यांजली पोर्टल
0️⃣1️⃣विद्यांजली पोर्टल संपूर्ण मार्गदर्शन*👇
https://youtu.be/PJ159W_Zo14?si=eRn3pOShEqB0Ucbc
🙏🙏🙏
*👉विद्यांजली पोर्टल लिंक*👇👇
https://vidyanjali.education.gov.in
⛹️♂️⛹️♂️⛹️♂️⛹️♂️
*0️⃣2️⃣विद्यांजली समस्या व मार्गदर्शन*
https://youtu.be/1o5jo1_cCws?si=8P61bNSx8gZyrTOL
🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद🙏
📙📘📗📕📚📙📘📗📕
*प्रशांत प्रल्हाद पेंधे*
शैक्षणिक क्रांती 200ग्रुप
https://chat.whatsapp.com/4k5ep5FCJ1293NA9vE2RzS
माझा पहिला group
*✍️वापर करा..*
*✍️जतन करा..*
*✍️इतरांनाही पाठवा..*
अपूर्णांक
🔰 *दि. 06 जूलै 2025*
🛑 *Live - सकाळी 6:00 वा.*
🔰 *माय व्हिजन - नवोदय 2026*
👉 *अपूर्णांक*
https://www.youtube.com/live/t8s3Wr3tN0M?si=rJi7qKSXZH5MihGg
👆 *वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून Class join करावा*
➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whats app group join करण्यासाठीं Link*👇
Gk - जनरल नॉलेज
🛑👆🏻मजेशीर जनरल नॉलेजची प्रश्न आणि उत्तरे यातील 90% उत्तरे आपणास नाही येणार?
➖➖➖➖➖➖➖➖
🛑👆🏻ससा आणि कासव🐢🐰 AI वेगळी स्टोरी-वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून
➖➖➖➖➖➖➖➖
🛑👆🏻माझ्या या दारातून इ.1ली-नवीन अभ्यासक्रमावर आधारित AI व्हिडिओ निर्मित कविता
➖➖➖➖➖➖➖➖
*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼🪀
https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt
🥏👇🏻टेलिग्राम ग्रुप👇🏻🥏https://t.me/+3aD84l2G_PdlZjE1
===================
गुरुपौर्णिमा📲आगळेवेगळे उपक्रम..
▫️ यावर्षीचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम करूया संस्मरणीय....*
*▫️ गुरुपौर्णिमा कार्यक्रम निमित्त शाळेत घेऊया हे आगळेवेगळे उपक्रम...*
*https://youtu.be/GyWqtPNSGew*
===================
प्रयोग-पृथ्वीचे फिरणे
*कृतींचा शनिवार/आनंददायी शनिवार* 👍
👇
*🌹प्रयोग-पृथ्वीचे फिरणे*
पृथ्वीचे फिरणे, दिवस रात्र, परिवलन परिभ्रमण संकल्पना, सूर्योदय सूर्यास्त, लीप वर्ष संकल्पना प्रयोगातून स्पष्टीकरण 👍👍👍
श्रीम. शोभा दळवी 👍
गुणाकार" या घटकावर सध्या विविध स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया
*📋दिवस 9 वा.*
*दिवस नवीन आजचा गणितातील प्रश्न नवीन👇*
*"गुणाकार" या घटकावर सध्या विविध स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया.*
*दररोज एक गणितातील महत्त्वाचा प्रश्न.*
*👉 स्पर्धा परीक्षेसाठी अति महत्त्वाचा प्रश्न*
*👇 आजचा महत्त्वाचा प्रश्न व त्याचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण खाली पाहा👇👇*
https://youtu.be/0bpjJl-OYpQ?si=R7RjaxhKrHXsurEo
*Target 🎯 SUCCESS📋*
*संपर्क -9673655213*
आनंदवारी-दिंडी
*शुद्ध नाही तुझी भावना...*
*देव कोठे आहे सांग ना...*
*देव कोठे आहे तर मानवाच्या अंतरी*
*आमच्या चिमुकल्यांच्या अंतरी*
*🚩🚩अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी गोष्ट म्हणजे वारी..!!🚩🚩*
या वारी मध्ये अनेक वारकरी शिस्तबद्ध पणे पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला जात असतात ,वाटे मध्ये नाचून ,अभंग गाऊन आयुष्यातील सर्व दुःख कष्ट विसरून परमेश्वराचे स्मरण करतात..
हा एक मोठा सोहळाच असतो याची अनुभूती देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा धुपरवाडी येथे दिनांक ५/०७/२०२५ रोजी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच या बरोबर नव भारत साक्षरता अभियान विषयी देखील संदेश देण्यात आला.
*सदर उपक्रमात सर्व विद्यार्थी , शिक्षिका व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले...*
What colours yours?
What colours
🔵What colour is your frock?❔
Answer➡️My frock is blue
⚫What colour is your hair?
Answer➡️My hair is black..
⚪What colour are your shoes?
Answer➡️My shoes are white.
💠What colour is the sky?
Answer➡️The sky is blue.
◽What colour is the milk?
Answer➡️The milk is white.
🟡What colour is this banana?
Answer➡️It is yellow.
🟢What colour are those mangoes?
Answer➡️Those mangoes. are green.
🔴What colour are these flowers?
Answer➡️These flowers are red
🟢What colour is the grass?
→The grass is green.
⬜What colour is that leaf?
→The leaf is green.
⚫What colour is the brinjal?
→The brinjal is violet.
🟢What colour is the custard apple❔
→The castard apple is green.
Is this a red pen?
Is that a red shirt?
Are these green trees?
Sandip Kulat 📲9763635463
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...









































